Posts

स्त्री-पुरूष सारखेच आहेत तर त्यांच्यात एवढे भेद का?

Image
पृथ्वीवरील सगळ्या देशांमध्ये सर्व समाजातील पुरुषासाठी 'मिस्टर' हे एकच संबोधन आहे. स्त्रियांच्या बाबतीत अविवाहित स्त्रिया आपल्या नावापुढे 'मिस' आणि विवाहित स्त्रिया आपल्या नावामागे 'मिसेस' या शब्दाचा प्रयोग करते. 'मिस्टर' संबोधनाने विवाहित आणि अविवाहित पुरुष ओळखता येत नाही. त्याउलट मात्र 'मिस लीना' आणि 'मिसेस बीना' यात कोण विवाहित आहे हे लगेच लक्षात येते. स्त्री विवाहित आहे की अविवाहित हे तिच्या नावातच सामावले आहे. विवाह स्त्रीसाठी नक्कीच महत्त्वाचा आहे. मात्र, पुरुषांच्या बाबतीत हे आढळत नाही.  विधवा आणि विधूर पुरुषांतही हेच दिसते. व‍िधवेला अंगावरील सर्वच अलंकार उतरवावे लागतात. इतकेच काय पण जीवनातील 'रंग'ही बाजूला ठेवावे लागतात. पण पुरुषाला मात्र कशाचीच बंदी नाही. काही समाजात तर विधवांनी मांसाहार करण्यावरही बंदी आहे.   जोडीदार मिळणे आणि त्याने सोडून जाणे याचे नियम दोघांसाठी भिन्न का? स्त्रीला बरेच काही त्यागावे लागते. असे का? तिच्या आसपासच वावरणारा पुरूष मात्र बंधनहीन आहे. असे का?   नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थस...

‘थर्टी फस्ट’चा बेभान जल्लोष करण्यापूर्वी...

Image
2018 चे स्वागत करण्यासाठी तरूणाई सज्ज झाली आहे. तरूण-तरूणींची ‘थर्टी फस्ट’ची प्लॅनींग सुरू झाली आहे. तरूणांनो तुम्ही जर मौज-मजा म्हणून किंवा मित्राच्या आग्रहास्तव मद्यपान, धुम्रपान करून नववर्षाचे स्वागत करत असाल, तर थांबा! कारण हा तुमचा क्षणाचा आनंद तुमच्या आयुष्याचं ‘वाटोळं’ करू शकतो. त्यामुळे तरूणांनो यापासून थोडं दूरच रहा, हे तुमच्यासाठी आणि तुमच्या आरोग्यासाठी हानीकारक आहे. त्यामुळे नववर्षाचे स्वागत करा, पण जरा सांभाळून!  ठरवलं असेल ना तुम्ही, थर्टी फस्टला खूप धमाल करायची, दरवर्षीपेक्षा काहीतरी हटकेच करायचं, किती लवकर संपलं ना हे वर्ष! त्याला निरोप द्यायचा तर जंगी प्लॅनिंग करायलाच हवं. काही दिवसांवर आलाय थर्टी फस्ट. फुल्ल कल्ला करायचा आणि सॉलिड एन्जॉय करायचं प्लानिंग असेल तुमचं! एन्जॉय...! करा, मस्त मज्जा...!! पण एक मिनिटं... थर्टी फस्ट आणि कोरडं? तुम्हीही ठरवलय का की यंदा थर्टी फस्टला ‘ते’ ही हवंच म्हणून...! ठरवा हवं ती दारू प्यायची की नाही यावर तात्विक चर्चा नाही करत आता. आता मुद्दा थोडासा वेगळा आहे. थर्टी फस्टची पार्टी संपली की घरी परत येताना कसे याल तुम्ह...

मराठी माणसावर हात उचलण्याची हिम्मत होतेच कशी ?

Image
मराठी माणसावर हात उचलण्याची हिम्मत होतेच कशी ?  हल्ले- प्रतिहल्ले चालले तर मुंबईत अशांतता होईल. त्याचा उद्योगधंद्यावर परिणाम वाईट होईल. फेरीवाल्यांकडून जो मार खालला तो मनसेच्या कार्यकर्त्यांनी नव्हे तर मराठी माणसाने खाल्ला आहे असे म्हणावे लागेल.  मुंबईतील एल्फिस्टन रेल्वेस्थानकावरील पूल कोसळल्यापासून फेरीवाल्यांविरोधात राज ठाकरे यांच्या मनसेंने फेरीवाला हटावची जी मोहीम सुरू केली, ती अद्याप थांबलेली नाही. मराठी विरूद्ध अमराठी हा जुनाच वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मराठीच्या मुद्यावर तर राज खूपच आक्रमक झालेले दिसतात. एकीकडे आपला नेता रणांगणात उतरा असा आदेश देतो. मात्र मनसैनिक पूर्ण तयारीनिशी लढण्यासाठी रणांगणात उतरत नसल्याने शत्रू पक्षासमोर घायाळ होताना दिसत आहे. काहीही असो मराठी माणसावर हात उचलण्याची हिम्मत होतेच कशी ? ती ही मुंबईत. मराठी माणूस रक्तबंबाळ होतो हे चित्र मराठी माणसाला पाहून काय वाटले...

राज तू खचू नकोस!

Image
एक डाव हरला तरी त्यात काय एवढं ..? कुणीतरी जिंकलंच की हे ही नसे थोड ... संधी मिळेल तुलाही, लगेच हिरमसु नकोस, आयुष्य खुप सुंदर आहे, राज तू फक्त खचु नकोस... सूर्य रोजच उगवतो, त्याच नव्...

धन्यवाद दैनिक ‘संध्यानंद

Image

धन्यवाद दैनिक ‘संध्यानंद’

Image

धन्यवाद दैनिक ‘संध्यानंद’

Image