Posts

Showing posts from August, 2017

स्त्री-पुरूष सारखेच आहेत तर त्यांच्यात एवढे भेद का?

Image
पृथ्वीवरील सगळ्या देशांमध्ये सर्व समाजातील पुरुषासाठी 'मिस्टर' हे एकच संबोधन आहे. स्त्रियांच्या बाबतीत अविवाहित स्त्रिया आपल्या नावापुढे 'मिस' आणि विवाहित स्त्रिया आपल्या नावामागे 'मिसेस' या शब्दाचा प्रयोग करते. 'मिस्टर' संबोधनाने विवाहित आणि अविवाहित पुरुष ओळखता येत नाही. त्याउलट मात्र 'मिस लीना' आणि 'मिसेस बीना' यात कोण विवाहित आहे हे लगेच लक्षात येते. स्त्री विवाहित आहे की अविवाहित हे तिच्या नावातच सामावले आहे. विवाह स्त्रीसाठी नक्कीच महत्त्वाचा आहे. मात्र, पुरुषांच्या बाबतीत हे आढळत नाही.  विधवा आणि विधूर पुरुषांतही हेच दिसते. व‍िधवेला अंगावरील सर्वच अलंकार उतरवावे लागतात. इतकेच काय पण जीवनातील 'रंग'ही बाजूला ठेवावे लागतात. पण पुरुषाला मात्र कशाचीच बंदी नाही. काही समाजात तर विधवांनी मांसाहार करण्यावरही बंदी आहे.   जोडीदार मिळणे आणि त्याने सोडून जाणे याचे नियम दोघांसाठी भिन्न का? स्त्रीला बरेच काही त्यागावे लागते. असे का? तिच्या आसपासच वावरणारा पुरूष मात्र बंधनहीन आहे. असे का?   नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थस...

धन्यवाद दैनिक ‘संध्यानंद’

Image

धन्यवाद दैनिक ‘संध्यानंद’

Image

धन्यवाद दैनिक ‘संध्यानंद’

Image
शनिवार, १२ ऑगस्ट २०१७

अनधिकृत फ्लेक्स व होर्डिंग्स काढण्यास कोण पुढाकार घेणार

Image
पुणे   11-08-2017

शीतल पेट्रोल पंपाच्या मागे बेकायदेशीर पार्किंग

Image
Aug 11 2017 : MaharashtraTimes (Pune) शीतल पेट्रोल पंपाच्या मागे बेकायदेशीर पार्किंग पुणे : शीतल पेट्रोल पंपाच्या मागे बेकायदेशीर पार्किंगमुळे आणि कचरा, धूळ व बेकायदेशीर टपरीमुळे रस्ता अरुंद झाला आहे. या रस्त्यावर गतिरोधकांची गरज आहे कारण रोज एक अपघात होत आहे. 42 क्षेत्रातील लोकांनी उतरण्यासाठी या ठिकाणी उतार केला आहे त्यामुळे बाईक, कार नियंत्रित करणे अवघड झाले आहे. एनआयबीएम क्षेत्रामध्ये प्रत्येक रस्त्यावर गतिरोधक आहे. सिग्नल जोडले तर उत्तम होईल. भारी रहदारीमुळे अशोका म्यूज किंवा पेट्रोल पंपाजवळील रस्ता ओलांडणे अवघड झाले आहे. Link online :  http://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/pune-local-news/illegal-parking-behind-soft-petrol-pump/articleshow/60012917.cms

शिक्षण घेणे हा आता व्यवहार झाला आहे

Image
शिक्षण घेणे हा आता व्यवहार झाला आहे पूर्वी शिक्षण, पदवी घेणे म्हणजे सरस्वतीची उपासना, सामाजिक प्रतिष्ठा व एक पवित्र जीवन पध्दती होती. शिक्षणाचे बाजारीकरण नव्हते. पण आज केजी पासून हजार खर्च, दहावी-बारावी क्‍लास फी 25 ते 50 हजार, पदवीचा वार्षिक खर्च 1.5 लाख रुपये. केजी ते पदवी पूर्ण होईपर्यंत अंदाजे 12 ते 15 लाख खर्च होतो. पदवी घेवून इंडस्ट्रीत ते हजाराची नोकरी ऑफर केली जाते व रोज दहा तास राबवून घेतले जाते. नोकरी नाही लागली तर सुशिक्षित बेकार, करिअर फेल अशी अवहेलना होते. सामाजिक प्रतिष्ठा तर पदवी धारकांना कधीच मिळत नाही, त्या उलट कमी शिकलेला लवकर उद्योग व्यवसायाला लागून रग्गड पैसा कमविणाऱ्याला समाजात मान व प्रतिष्ठा आहे. 12 ते 15 लाख शिक्षणावर खर्च करण्यापेक्षा त्याच पैशात खूप चांगला उद्योग उभा राहू शकतो. त्यातून महिना 20 – 25 हजार कमाई होऊ शकते शिवाय गुलामासारखे दुसऱ्याच्या कंपनीत राबणूक नाही, तुम्हीच स्वत:चे बॉस होता. तुमच्या ध्येयानुसार, संधी नुसार, कुवतीनुसार व्यवसाय हवा तेवढा वाढवता येतो. एका व्यवसायातून दुसऱ्या, दुसऱ्यातून तिसऱ्या व्यवसायात जाता ये...

महाराष्ट्रासह जगाला वेड लावणाऱ्या ‘सोनू’चा निर्माता सोलापूरचा पठ्ठ्या

Image
‘सोनू तुझा माझ्यावर भरवसा नाय काय’ या गाण्याचे लेखक व गायक अजय क्षीरसागर यांनी शनिवार दि. ५ ऑगस्ट २०१७ रोजी दै.सामना कार्यालयास भेट दिली. यावेळी आर्टीस्ट राम गंगणे यांच्याबरोबर ‘सोनू’फेम अजय क्षीरसागर...   ‘सोनू तुला माझ्यावर भरवसा नाय काय…’ या गाण्याने सध्या धुमाकूळ घातला आहे. खरं तर हे गाणं खुप वर्षांपासून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात वेगवेगळ्या स्वरुपात गायलं जातं आहे. मात्र सध्या जे गाणं लोकप्रिय झालंय, ते सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी गावातील अजय क्षीरसागर आणि त्यांची पत्नी भाग्यशाली क्षीरसागर यांनी बनवलंय. सध्या प्रत्येकाच्या मोबाईल, चौकाचौकात, एवढंच काय महाराष्ट्राच्या विधानसभेत देखील ‘सोनू तुला माझ्यावर भरवसा नाय काय’ हा प्रश्न गाण्यातून विचारला जातो आहे. या गाण्याच्या माध्यमातून विचारला जाणाऱ्या प्रश्नामुळे मुंबईतील खड्डयांचा प्रश्न यावर्षी पुन्हा चव्हाट्यावर आला आणि त्यावरुन मोठं राजकारणही झालं. मात्र, जानेवारी महिन्यात अजय क्षीरसागर यांनी हे गाणं बनवलं, तेव्हा या गाण्यावरुन एवढ महाभारत होईल याची कल्पनाही त्यांना नव्हती. ‘सोनू’ गाण्याचा जन्म…. ‘सो...

विजेच्या डीपीचा चक्क दरवाजाच चोरला

Image
http://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/pune-local-news/electrician-drove-a-huge-dp/articleshow/59890623.cms

वाहतूक नियमांचे काटेकोरपणेे पालन करायला हवे

Image
 

ग्राहकांच्या अपेक्षांमध्ये बदल होत आहे…

Image
जाहिराती करणाऱ्या लोकांचा एक सर्वसाधारण समज आहे, महिलांची आकर्षक छायाचित्रे छापलेल्या वस्तू विकल्या जातात. मग सॉफ्ट ड्रिंकपासून पेनांच्या जाहिरातींपर्यंत सगळीकडे तोकड्या कापड्यातल्या मॉडेल्सचा सर्रास वापर होताना दिसतो. प्रॉडक्‍ट्‌सशी स्त्रियांचा संबंध असो नसो, पुरुष ग्राहकाने त्या वस्तू घ्याव्या यासाठी बाईचा वापर हा जाहिराती बनवणाऱ्या मंडळींचा प्रचलित मार्ग असतो. त्यात बदल करावासा सहसा कुणाला वाटत नाही. पण, आता ग्राहकच या प्रचलित मार्गाला कंटाळले आहेत बहुदा. तोकड्या कापड्यातल्या मुली बघण्यात आता फारसं नावीन्य राहिलं नाहीये किंवा वस्तू विकत घेताना त्या जाहिरातीत बाई कशी दाखवली गेली आहे यापेक्षा त्या वस्तुचा दर्जा जास्त महत्त्वाचा असतो हे शहाणपण आलं असावं. कारण, काहीही असोत ग्राहक वेगळं काहीतरी म्हणतायत असं युनिव्हर्सिटी ऑ इलिनॉईसमधील जॉन विट्‍र्झ यांचं सर्वेक्षण सांगतंय. जवळपास 900 जाहिरातींचे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणात असे दिसून आले की पूर्वीप्रमाणे लोक आता सेक्‍श्युअल अपीलकडे बघून वस्तू खरेदी करत नाहीत. वस्तू खरेदी करतानाचे ग्राहकांचे निकष बदलले आहेत. नि...