स्त्री-पुरूष सारखेच आहेत तर त्यांच्यात एवढे भेद का?

Image
पृथ्वीवरील सगळ्या देशांमध्ये सर्व समाजातील पुरुषासाठी 'मिस्टर' हे एकच संबोधन आहे. स्त्रियांच्या बाबतीत अविवाहित स्त्रिया आपल्या नावापुढे 'मिस' आणि विवाहित स्त्रिया आपल्या नावामागे 'मिसेस' या शब्दाचा प्रयोग करते. 'मिस्टर' संबोधनाने विवाहित आणि अविवाहित पुरुष ओळखता येत नाही. त्याउलट मात्र 'मिस लीना' आणि 'मिसेस बीना' यात कोण विवाहित आहे हे लगेच लक्षात येते. स्त्री विवाहित आहे की अविवाहित हे तिच्या नावातच सामावले आहे. विवाह स्त्रीसाठी नक्कीच महत्त्वाचा आहे. मात्र, पुरुषांच्या बाबतीत हे आढळत नाही.  विधवा आणि विधूर पुरुषांतही हेच दिसते. व‍िधवेला अंगावरील सर्वच अलंकार उतरवावे लागतात. इतकेच काय पण जीवनातील 'रंग'ही बाजूला ठेवावे लागतात. पण पुरुषाला मात्र कशाचीच बंदी नाही. काही समाजात तर विधवांनी मांसाहार करण्यावरही बंदी आहे.   जोडीदार मिळणे आणि त्याने सोडून जाणे याचे नियम दोघांसाठी भिन्न का? स्त्रीला बरेच काही त्यागावे लागते. असे का? तिच्या आसपासच वावरणारा पुरूष मात्र बंधनहीन आहे. असे का?   नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थस...

शिक्षण घेणे हा आता व्यवहार झाला आहे

शिक्षण घेणे हा आता व्यवहार झाला आहे

पूर्वी शिक्षण, पदवी घेणे म्हणजे सरस्वतीची उपासना, सामाजिक प्रतिष्ठा व एक पवित्र जीवन पध्दती होती. शिक्षणाचे बाजारीकरण नव्हते. पण आज केजी पासून हजार खर्च, दहावी-बारावी क्‍लास फी 25 ते 50 हजार, पदवीचा वार्षिक खर्च 1.5 लाख रुपये. केजी ते पदवी पूर्ण होईपर्यंत अंदाजे 12 ते 15 लाख खर्च होतो. पदवी घेवून इंडस्ट्रीत ते हजाराची नोकरी ऑफर केली जाते व रोज दहा तास राबवून घेतले जाते. नोकरी नाही लागली तर सुशिक्षित बेकार, करिअर फेल अशी अवहेलना होते. सामाजिक प्रतिष्ठा तर पदवी धारकांना कधीच मिळत नाही, त्या उलट कमी शिकलेला लवकर उद्योग व्यवसायाला लागून रग्गड पैसा कमविणाऱ्याला समाजात मान व प्रतिष्ठा आहे. 12 ते 15 लाख शिक्षणावर खर्च करण्यापेक्षा त्याच पैशात खूप चांगला उद्योग उभा राहू शकतो. त्यातून महिना 20 – 25 हजार कमाई होऊ शकते शिवाय गुलामासारखे दुसऱ्याच्या कंपनीत राबणूक नाही, तुम्हीच स्वत:चे बॉस होता. तुमच्या ध्येयानुसार, संधी नुसार, कुवतीनुसार व्यवसाय हवा तेवढा वाढवता येतो. एका व्यवसायातून दुसऱ्या, दुसऱ्यातून तिसऱ्या व्यवसायात जाता येते. मराठी माणूस कर्ज काढून, जमिनी विकून मुलांच्या शिक्षणावर नको तेवढा खर्च करत आहेत. नेमके भविष्यात कोणत्या क्षेत्राला किती व कसा स्कोप आहे, आपल्या मुलांची नेहमी कुवत, इच्छा व स्पर्धेची तीव्रता याचा विचार केला जात नाही. सहा लाख मुलं स्पर्धा परीक्षा देतात पण पद फक्त जणांनाच मिळत मग बाकीच्यांचे काय? किती वेळ व पैसा बाकीचे वाया घालवतात. काय जीवन उपयोग ज्ञान शिक्षण मिळते त्यातून? लिहायला खेद वाटतो पण कटू सत्य आहे की शिक्षण हे आता पवित्र, उपासना किंवा प्रतिष्ठा मिळवून देणारे काम नसून तो आता एक व्यवहार झाला आहे म्हणून शिक्षणावर खर्च सुध्दा व्यवहारानेच करायला हवा. लाख खर्च करून आयुष्यातील वर्षे घालवून हजार पगार हा काय व्यवहार झाला का ? तेव्हा पालकांनी आपला सदविवेक व व्यवहार ज्ञान जागृत ठेवावे.
– प्रतिक गंगणे, पुणे  

PRABHAT E-PAPER LINK : http://www.dainikprabhat.com/%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3-%e0%a4%98%e0%a5%87%e0%a4%a3%e0%a5%87-%e0%a4%b9%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%b9%e0%a4%be/

Comments

Popular posts from this blog

अतिविचारांनी जगण्याचा तोल बिघडतो

श्रीमंतापेक्षा गरीबच जास्त दयाळू

माणूस सर्वांत जास्त एकाकी आणि असुरक्षित तरीही गर्विष्ठ