स्त्री-पुरूष सारखेच आहेत तर त्यांच्यात एवढे भेद का?

Image
पृथ्वीवरील सगळ्या देशांमध्ये सर्व समाजातील पुरुषासाठी 'मिस्टर' हे एकच संबोधन आहे. स्त्रियांच्या बाबतीत अविवाहित स्त्रिया आपल्या नावापुढे 'मिस' आणि विवाहित स्त्रिया आपल्या नावामागे 'मिसेस' या शब्दाचा प्रयोग करते. 'मिस्टर' संबोधनाने विवाहित आणि अविवाहित पुरुष ओळखता येत नाही. त्याउलट मात्र 'मिस लीना' आणि 'मिसेस बीना' यात कोण विवाहित आहे हे लगेच लक्षात येते. स्त्री विवाहित आहे की अविवाहित हे तिच्या नावातच सामावले आहे. विवाह स्त्रीसाठी नक्कीच महत्त्वाचा आहे. मात्र, पुरुषांच्या बाबतीत हे आढळत नाही.  विधवा आणि विधूर पुरुषांतही हेच दिसते. व‍िधवेला अंगावरील सर्वच अलंकार उतरवावे लागतात. इतकेच काय पण जीवनातील 'रंग'ही बाजूला ठेवावे लागतात. पण पुरुषाला मात्र कशाचीच बंदी नाही. काही समाजात तर विधवांनी मांसाहार करण्यावरही बंदी आहे.   जोडीदार मिळणे आणि त्याने सोडून जाणे याचे नियम दोघांसाठी भिन्न का? स्त्रीला बरेच काही त्यागावे लागते. असे का? तिच्या आसपासच वावरणारा पुरूष मात्र बंधनहीन आहे. असे का?   नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थस...

माणूस सर्वांत जास्त एकाकी आणि असुरक्षित तरीही गर्विष्ठ

माणूस सर्वांत जास्त एकाकी आणि असुरक्षित तरीही गर्विष्ठ



जगात सर्वांत असुरक्षित आणि एकाकी असेल तो माणूस आहे; परंतु तरीही सर्वांत गर्विष्ठ आहे. माणूस स्वभावाने सर्व सद्गुण आणि दुर्गुणांचा जन्मदाता आहे. तो असा एक प्राणी आहे, जो रात्रीही स्वर्गाच्या पायर्‍यांवरच झोपतो. तो केवळ भ्रमावर जगतो. त्याच्या मनात व्यक्तिवाद, कुटुंबवाद, जातीवाद आणि उपदेशवाद ठासून भरला आहे. 


जगात सर्वांत असुरक्षित आणि एकाकी असेल तो माणूस आहे; परंतु तरीही सर्वांत गर्विष्ठ आहे. माणूस स्वभावाने सर्व सद्गुण आणि दुर्गुणांचा जन्मदाता आहे. तो असा एक प्राणी आहे, जो रात्रीही स्वर्गाच्या पायर्‍यांवरच झोपतो. तो केवळ भ्रमावर जगतो. त्याच्या मनात व्यक्तिवाद, कुटुंबवाद, जातीवाद आणि उपदेशवाद ठासून भरला आहे. तो वाघ-सिंहाप्रमाणे डरकाळ्या फोडतो तर गिधाडाप्रमाणे भिऊन पळतोसुद्धा. माणसाचे एक रूप सरकारी कर्मचारी आहे. तो स्वत:लाच सरकार समजतो. वाघासारखा आवाज असला तरी तो बकरीसारखा मँ मँ सुद्धा करतो हीच त्याची ऐपत आहे. खून करूनही हात न धुण्याची त्याची सवय आहे; पण मालकाला पाहताच शेपूट हलविण्याची त्याची नियत आहे. घाणीच्या बैलाप्रमाणे चक्कर मारणे हेच त्याचे नशीब आहे. सरकारी दुकानात दोन प्रकारचा माल मिळतो. एक आयएसआय या सरकारी मान्यतेचा आणि दुसरा गरिबांचा ‘जोरू छाप’ सरकारी मान्यतेचा. हा २४ तास चौकीदारी करतो व याची ड्युटी बेडरूमपासून बाथरूमपर्यंत कोठेही लावू शकता. कारण तो जेथेही राहील ‘ऑफिस ऑर्डर’ चेच काम करील. तो नोकरी मिळविण्यासाठी ऑफिसात हेलपाटे घालील, साहेबांच्या घरी जाईल. शिफारस करणार्‍यांचा पत्ता आणेल. मंदिरात दक्षिणासुद्धा देईल. बायका-मुलांचे भाग्य घडविल. दिवसा चहा आणि रात्री दारूसुद्धा पाजेल; पण नोकरी मिळताच तो सरकारी जावई होईल आणि राग ‘वसंत बहार’ होईल. तो पहिल्याच दिवशी कामावर रुजू झाल्यावर बकरी-मेंढीसारखा वागेल पण दिवसेंदिवस चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत वाढत पौर्णिमेचा चंद्र होईल व ‘हम करे सो कायदा’ असे वागेल. स्त्री असेल तर साडी, पुरुष असेल तर पोशाखाचा रंग बदलत जाईल.
तो खुर्चीवरही अशा प्रकारे बसेल का? ती त्याच्या बापाचीच आहे. त्या खुर्चीवर फक्त त्याचाच अधिकार आहे. तो त्याच्याकडे येणार्‍याचे ऐकेल, पाहील, समजून घेईल, पण १५ दिवस, महिन्यातच चांगल्या चांगल्यांना उपदेश करायला सुरुवात करेल. घटनेत कलम ३११ असूनही सरकारी कर्मचार्‍याला कोणीही नोकरीवरून काढू शकत नाही, कारण ते साम दाम दंड भेद अशा सर्वच प्रकाराचा पद्धतशीर वापर करतात, प्रसंगी नागडे होतील व तरीही काम झाले नाही तर ईश्‍वराचे भजन सुरू करतील. तरीही ‘देवता’ प्रसन्न झाली नाही तर कोर्टात जातील व तेथेही सुनावणी झाली नाही तर मुलाबाळासह सहकुटुंब ‘साहेबा’च्या घरी जातील. सरकारी कर्मचारी असे घोंगडे आहे की, एकाला ते नको असते तर दुसरा सोडत नाही. सरकारी कर्मचारी देवयोनीचा प्रतिनिधी मानला जातो; कारण तो अजरामर असतो. सुरक्षा कवच कुंडल घालून तो कार्यालयात येतो. तो जसा जसा नोकरीच्या राजपथावर पुढे जाईल तसा त्याचा धर्म, इमान, संबंध बदलत जाईल. ही सरकारी नोकरी नेहमी नोकरशाही व लालफिता शाहीच्या स्वरूपात ओळखली जाते. सन १९५९ मध्ये पहिला वेतन आयोग लागू झाला. त्यावेळी १७ लाख जनसेवक होते. यानंतर १९७१ पर्यंत ही संख्या २९ लाख झाली. १९८४ मध्ये तिसरा वेतन आयोग लागू झाला. त्यावेळी जनसेवकांची संख्या ३७ लाख व त्यानंतर १९९१ मध्ये ही संख्या ४० लाख झाली. ध्वनी प्रकाशापेक्षाही जास्त वेगाने चालणारे आणि लोकसंख्येपेक्षाही जास्त जन्मदर असलेली ही जात त्यावेळी एका वर्षात किमान ६००० कोटींचे चारा-पानी घेत होती.
हे उदाहरण फक्त सरकारी कर्मचार्‍याचाच आहे. देशातील २६ राज्ये व केंद्रशासित प्रदेशाची आपापली कर्मचारी वाहिनी आहे. जो ५० ते ६०% सरकारी माल गट्ट करतात या सरकारी प्राण्यांचे दुसरे रूप असे आहे की, सरकारी कर्मचारी वर्षाच्या ३६५ दिवसांपैकी २०० दिवस भरपगारी सुट्ट्या उपभोगतात व १६५ दिवस काम केल्यासारखे दाखवतात. त्यांना १०४ दिवस आठवड्याची सुट्टी, १८ दिवसांची राजपत्रित सुट्टी, दोन दिवस ऐच्छिक सुट्टी, ३० दिवसांची संचित सुट्टी, १२ दिवसांची आकस्मिक सुट्टी आणि निम्म्या वेतनाची ३० दिवसांची ‘सिक लिव्ह’ मिळते. नाना प्रकारचे वेतन, निवास, प्रवास भत्ते, भविष्य निधी, पेंशन, ग्रॅच्युइटी व इतर अनेक सुविधा असतात. सरकारी नोकर ईश्‍वरालाही घाबरत नाही. त्याला फक्त ‘कॉन्फिडेन्सियल ओन्ली’ लिहिणारे, ट्रान्सफर करणारे, निवेदन देणारे अधिकारी व वेतन भत्ते वाटणारे कॅशिअर हवेत. मोठमोठ्या कार्यालयामध्ये क्लर्क म्हणजे कारकुनाचा मोठा दबदबा असतो. कारण जो ‘पैसा’ देतो त्याचे ‘पापी पेट’ त्यालाच ओळखते. सरकारी मेंढ्यांची अशी नियत आहे की, त्यांचा अकाली मृत्यू होत नाही.
मोठमोठी महामारी, तूफान, वादळ त्याच्यावरून स्पर्श न करता निघून जातात. आता तर तो वेतन घेतो पण काम करीत नाही. कारण त्याला प्रत्येक अर्जावर, फाईलवर ‘वजन’ हवे असते. तो वरची कमाई चौफेर बघूनच घेतो आणि जुन्या, रद्द केलेल्या नोटाही बदलून घेतो. सरकारी कर्मचारी म्हणजे पब्लिक सर्व्हंट. म्हणजे जनतेच्या या नोकराची कोणतीही जात नसते. तो सर्वांचा असतो पण काम पडल्यास कायद्याची अवलाद बनतो. हल्दीरामप्रमाणे बोलतो. तो ‘जीवस्य योजनम’ प्रमाणेही होतो. तो आपल्या युक्ती-प्रयुक्तीपासून सावध आहे; पण इतरांच्या बाबतीत अज्ञानी व बापूजींच्या तीन माकडांसारखा आहे. तो या माकडाप्रमाणे कान, डोळे, तोंड बंद ठेवतो. बहुजन हिताय-बहुजन सुखाय जपत त्याला हेही कळत नाही हा दिशा मंत्र कोठून निघाला आहे. त्याला आपल्या पगाराशिवाय काहीच आठवत नाही. कारण त्याची अक्कल फक्त त्याच्यासाठीच काम करते. तो इतरांना त्याच्या घराचा पत्ताही देत नाही.
हा मध्यमवर्गीय प्राणी नेहमी त्रिशंकूप्रमाणे जमीन व आकाशादरम्यान लटकत असतो. तो कधीच कात टाकत नाही व दंश केल्याशिवाय राहतही नाही. सरकारी नोकर एक अशी मानसिकता व मशिनरी प्रवृत्ती आहे की, ज्याच्यापुढे सर्व वेद-पुराण, पीर-पैगंबर, समाजवाद, भांडवलवाद, पाणी भरतात. सुख सुविधा, स्वसंरक्षण आणि वेळेनुसार पलटी खाणे त्याची खास सवय आहे. तो संविधानाची शपथ घेऊन नोकरी करतो. अखेर सरकारी कर्मचारी आणि बारमाही कर्मचार्‍यांमध्ये कोणता फरक आहे? दुसर्‍याचे दु:ख हेच त्याचे सुख असते. त्याच्या फाईलवरच्या नोट्स बदलत नसतात.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अतिविचारांनी जगण्याचा तोल बिघडतो

श्रीमंतापेक्षा गरीबच जास्त दयाळू