स्त्री-पुरूष सारखेच आहेत तर त्यांच्यात एवढे भेद का?

Image
पृथ्वीवरील सगळ्या देशांमध्ये सर्व समाजातील पुरुषासाठी 'मिस्टर' हे एकच संबोधन आहे. स्त्रियांच्या बाबतीत अविवाहित स्त्रिया आपल्या नावापुढे 'मिस' आणि विवाहित स्त्रिया आपल्या नावामागे 'मिसेस' या शब्दाचा प्रयोग करते. 'मिस्टर' संबोधनाने विवाहित आणि अविवाहित पुरुष ओळखता येत नाही. त्याउलट मात्र 'मिस लीना' आणि 'मिसेस बीना' यात कोण विवाहित आहे हे लगेच लक्षात येते. स्त्री विवाहित आहे की अविवाहित हे तिच्या नावातच सामावले आहे. विवाह स्त्रीसाठी नक्कीच महत्त्वाचा आहे. मात्र, पुरुषांच्या बाबतीत हे आढळत नाही.  विधवा आणि विधूर पुरुषांतही हेच दिसते. व‍िधवेला अंगावरील सर्वच अलंकार उतरवावे लागतात. इतकेच काय पण जीवनातील 'रंग'ही बाजूला ठेवावे लागतात. पण पुरुषाला मात्र कशाचीच बंदी नाही. काही समाजात तर विधवांनी मांसाहार करण्यावरही बंदी आहे.   जोडीदार मिळणे आणि त्याने सोडून जाणे याचे नियम दोघांसाठी भिन्न का? स्त्रीला बरेच काही त्यागावे लागते. असे का? तिच्या आसपासच वावरणारा पुरूष मात्र बंधनहीन आहे. असे का?   नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थस...

वारीचे रंग : ग्लोबल वारी…

विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल  


ज्ञानेबा माउलीऽऽऽ … तुकारामऽऽऽ….

हे शब्द सगळा आसमंत दुमदुमून टाकतात. हे शब्द कानावर आले तरी एक चैतन्य निर्माण होते. लहान मुले देखील या शब्दांवर ताल धरतात… विठ्ठल विठ्ठल म्हणताना त्या पांडुरंगाची ऊर्जा आपल्या शरीरात भिनते आणि एका वेगळ्याच ओढीने पायांमध्ये बळ निर्माण होते. वारकऱ्यांमधील चैतन्य पाहिल्यावर हे खरोखरच लक्षात येते. वर्षानुवर्षे, शतकानुशतके वारी पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करीत आहे. करीत राहणार आहे. हे होत असताना वारीत मा आमूलाग्र बदल झाले आहे. पिढ्या बदलल्या, वारी बदलली, त्यातील परंपरा तीच असली तरी वारीतील अनेक गोष्टीतमध्ये विधायक सुधारणा झाल्या आहेत. वारीतील शेतकरी आता अशिक्षित राहिलेला नाही. त्यात जसा गावाकडचा वर्ग आहे, तसेच पुण्या-मुंबईतील आयटी क्षेत्रातील व्यक्तीही आहेत. पदवीधर आहेत, उच्चशिक्षित आहेत, इतकेच नाही तर आता वारीत परदेशी पाहुणेही दिसू लागले आहेत. वारीमध्ये जवळपास 30 ते 40 टक्के तरुण वर्ग आलेला आहे. त्यामुळे वारी ग्लोबल झाली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही; पण असेही म्हणता येणार नाही. कारण वारीतील मान्यवरांनी देखील वारीचे ग्लोबलायझेशन स्वीकारले आहे. माउलींचा वारीचा रथ बॅटरीवर चालवण्याचा प्रयत्न मध्यंतरी झाला, त्यात थोडा बदल करणे आवश्‍यक होते, तो प्रयत्न अयशस्वी झाला असे म्हणता येणार नाही, कारण त्यात अजून प्रयोग होतच आहेत. या रथांवर आता सीसीटीव्ही बसवले आहेत, त्यामुळे वारीच्या सगळ्याच गोष्टींवर “नजर’ ठेवणे शक्‍य झाले आहे. याबरोबरच माउलींच्या आणि तुकोबांच्या पादुकांचे दर्शन सर्वांना सहज व्हावे यासाठी देखील रथाच्या बाजूला टीव्ही ठेवलेले असतात.
प्रत्येक वारकऱ्याकडे आता मोबाइल आले आहेत. त्यामुळे पूर्वी वारीला जाणारी व्यक्ती महिन्यांनीच घरी जायची आणि घरच्यांची भेट होत असे. मधल्या काळात कोणतेच संपर्काचे साधन नसायचे. आता तसे नाही. प्रत्येक ठिकाणी फोटो काढणे आणि व्हॉट्‌स-ऍपला शेअर करणे, एफबी वापरणे हे आता त्यांच्यासाठीही अशक्‍यप्राय राहिलेले नाही. वारीचे चित्रीकरण आता फोटोंपुरते मर्यादित राहिलेले नाही. दूरचित्रवाणीच्या प्रत्येक वाहिन्या विशेषतः मराठी- वारीच्या प्रस्थानापासून आषाढी एकादशीला होणाऱ्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या शाही पूजेपर्यंत “लाइव्ह’ चित्रीकरण करतात. त्यामुळे वारीचे महत्त्व जगभर पोहोचले आहे.
वारीतील अनेक गोष्टी “टेक्‍नोसॅव्ही’ झाल्या आहेत. अनेकांकडे टॅब, लॅपटॉप तर असतातच; त्यामुळे इंटरनेटचा मुक्त वापर या काळात होत असतो. वारीचा मार्ग, वारीतील खेळ, अभंग, वारीतील शिस्त, वारीतील उभे आणि आडवे रिंगण या सगळ्याच गोष्टी आता आपण सहज अनुभवू शकतो. वारीचे हे “ग्लोबलायजेशन’ हे खरोखरच निखळ आहे.
वारीची शिस्त हा एक अभ्यासाचाच विषय आहे. त्यात कुठेही दंगल नाही, मारामारी नाही, वाद नाहीत, मानापानावरून रुसवे नाहीत. कोणत्याही बंदोबस्ताची गरज नाही. सगळे काही “विठ्ठल’रूप आणि माउली-तुकोबांच्या आत्मियतेचे दर्शन… हा विठ्ठल माझा आहे, ही माउली माझी आहे, तुकोबा माझे आहेत आणि ही वारी माझी आहे… हाच एक भाव सगळीकडे असतो. वारी ग्लोबल झाली काय किंवा वारीचे ड्रोनमधून शूटिंग होत असले काय, “आम्हाला कशाचेच काही नसते, ओढ असते ती फक्त आणि फक्त विठ्ठल भेटीची आणि बरोबर असतात माउली-तुकोबा…!
चोखामेळांनी आपल्या अभंगात म्हटलेच आहे की- 
आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण 
वेदांचे वचन न कळे आम्हा ।। 
आगमाची आढी निगमाचा भेद 
शास्त्रांचा संवाद न कळे आम्हा ।। 
योग याग तप अष्टांग साधन 
नकळेची दान व्रत तप ।। 
चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा 
गाईन केशवा नाम तुझे ।।
खरं आहे, वेद-पुराण असो, शास्त्रसंवाद असो… काही कळले नाही तरी चालेल, तसेच अगदी तुमच्या मुठीत इंटरनेट असो… आम्हाला कशाचेच काही नाही. फक्त “माझा भोळा भाव, विठ्ठलाच्या चरणी’ आहे, हेच वारीचे खरे ग्लोबलायझेशन आहे, असेच म्हणावे लागेल.

Comments

Popular posts from this blog

अतिविचारांनी जगण्याचा तोल बिघडतो

श्रीमंतापेक्षा गरीबच जास्त दयाळू

माणूस सर्वांत जास्त एकाकी आणि असुरक्षित तरीही गर्विष्ठ