स्त्री-पुरूष सारखेच आहेत तर त्यांच्यात एवढे भेद का?

Image
पृथ्वीवरील सगळ्या देशांमध्ये सर्व समाजातील पुरुषासाठी 'मिस्टर' हे एकच संबोधन आहे. स्त्रियांच्या बाबतीत अविवाहित स्त्रिया आपल्या नावापुढे 'मिस' आणि विवाहित स्त्रिया आपल्या नावामागे 'मिसेस' या शब्दाचा प्रयोग करते. 'मिस्टर' संबोधनाने विवाहित आणि अविवाहित पुरुष ओळखता येत नाही. त्याउलट मात्र 'मिस लीना' आणि 'मिसेस बीना' यात कोण विवाहित आहे हे लगेच लक्षात येते. स्त्री विवाहित आहे की अविवाहित हे तिच्या नावातच सामावले आहे. विवाह स्त्रीसाठी नक्कीच महत्त्वाचा आहे. मात्र, पुरुषांच्या बाबतीत हे आढळत नाही.  विधवा आणि विधूर पुरुषांतही हेच दिसते. व‍िधवेला अंगावरील सर्वच अलंकार उतरवावे लागतात. इतकेच काय पण जीवनातील 'रंग'ही बाजूला ठेवावे लागतात. पण पुरुषाला मात्र कशाचीच बंदी नाही. काही समाजात तर विधवांनी मांसाहार करण्यावरही बंदी आहे.   जोडीदार मिळणे आणि त्याने सोडून जाणे याचे नियम दोघांसाठी भिन्न का? स्त्रीला बरेच काही त्यागावे लागते. असे का? तिच्या आसपासच वावरणारा पुरूष मात्र बंधनहीन आहे. असे का?   नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थस...

पिढीजात अंतर असणारच!




आईबद्दल अनेकांनी लिहिलं, देवादिकांपासून ते साहित्यिकांपर्यंत सर्वानीच आईची महती गायिली आहे. ‘आई’ हा शब्द असेल तर त्या शब्दाचा अर्थ म्हणजे बाप आहे. तसे पाहिले तर बापच आईला अर्थ देतो. घरातल्या अर्थार्जनापासून ते घराला अर्थ म्हणजे महत्त्व इथपर्यंत अर्थ देण्याचं काम   बाप करतो. आणि वडिलांची माया आपल्यावर किती असते, त्याला मोजमाप नाही. मुलाला लहानाचे मोठे करताना तळहाताचा पाळणा आणि नेत्राचा दिवा करून लहानाचं मोठं केलेलं असतं. आपली मुलं उच्चपदस्थ व्हावीत. थोडक्यात टॉपला जावीत म्हणून रात्र न् दिवस बापच झुरत असतो. बाप म्हणजे आदरयुक्त भीती, बाप म्हणजे तटबंदी, समाज उन्हाचे चटके सहन करून, घरी आल्यानंतर बाप नावाच्या वटवृक्षाखाली ज्यांना बसण्याचं भाग्य लाभते त्यांना हे तोपर्यंत पटत नाही. 
 



जोपर्यंत तो स्वत: बाप होत नाही. मुलाचे अपराध पोटात घालून त्याच्यावर जीवापाड प्रेम करतो तचं नाव बाप. या जगातल्या प्रवेशापासून ते या अवस्थेपर्यंत बापाने घेतलेल्या त्रासाचा विचार करता बापाला परमेश्वर समजून आदर करावा. एवढं जरी नाही जमलं तरी चालेल कमीत कमी   त्यांना वृद्धाश्रमात तरी पाठवू नये. यासाठी बापानेही मुलं मोठी झाल्यावर आपण लहान व्हावं लागतं तेव्हाच मेळ बसतो.

Comments

Popular posts from this blog

अतिविचारांनी जगण्याचा तोल बिघडतो

श्रीमंतापेक्षा गरीबच जास्त दयाळू

माणूस सर्वांत जास्त एकाकी आणि असुरक्षित तरीही गर्विष्ठ