स्त्री-पुरूष सारखेच आहेत तर त्यांच्यात एवढे भेद का?

Image
पृथ्वीवरील सगळ्या देशांमध्ये सर्व समाजातील पुरुषासाठी 'मिस्टर' हे एकच संबोधन आहे. स्त्रियांच्या बाबतीत अविवाहित स्त्रिया आपल्या नावापुढे 'मिस' आणि विवाहित स्त्रिया आपल्या नावामागे 'मिसेस' या शब्दाचा प्रयोग करते. 'मिस्टर' संबोधनाने विवाहित आणि अविवाहित पुरुष ओळखता येत नाही. त्याउलट मात्र 'मिस लीना' आणि 'मिसेस बीना' यात कोण विवाहित आहे हे लगेच लक्षात येते. स्त्री विवाहित आहे की अविवाहित हे तिच्या नावातच सामावले आहे. विवाह स्त्रीसाठी नक्कीच महत्त्वाचा आहे. मात्र, पुरुषांच्या बाबतीत हे आढळत नाही.  विधवा आणि विधूर पुरुषांतही हेच दिसते. व‍िधवेला अंगावरील सर्वच अलंकार उतरवावे लागतात. इतकेच काय पण जीवनातील 'रंग'ही बाजूला ठेवावे लागतात. पण पुरुषाला मात्र कशाचीच बंदी नाही. काही समाजात तर विधवांनी मांसाहार करण्यावरही बंदी आहे.   जोडीदार मिळणे आणि त्याने सोडून जाणे याचे नियम दोघांसाठी भिन्न का? स्त्रीला बरेच काही त्यागावे लागते. असे का? तिच्या आसपासच वावरणारा पुरूष मात्र बंधनहीन आहे. असे का?   नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थस...

श्रीमंतापेक्षा गरीबच जास्त दयाळू

श्रीमंतापेक्षा गरीबच जास्त दयाळू  








आज सर्वांत जास्त नवधनाढ्य भारतात आहेत. धर्माच्या नावावर किंवा अनिश्‍चित भविष्याच्या भीतीमुळे हे लोक मंदिर, मशिद, दर्गा, चर्चला मोठ्या देणग्या देतील पण गरजू, गरीब मजुराला थोडीही जास्त मजुरी देत नाहीत. पूर्वीच्या तुलनेत दान-पुण्याच्या बाबतीत आज आपण खूपच मागे आहोत. हे खरे आहे की कोणाकडून बळजबरीने चॅरिटी करू नये. दान मनापासून केले पाहिजे. कारण जगातील एक तृतियांश गरीब भारतातच आहेत.


आपल्या देशातील कहाण्या, किस्से, दानशूरांचा महिमा वर्णन करणार्‍या आहेत. दानशूर लोकांच्या हजारो गोष्टींचा त्यात समावेश आहे, फक्त श्रीमंत लोकच दानशूर असतात असे नाही तर त्यापेक्षा गरीबच जास्त दानशूर असल्याचा बर्‍याच वेळा अनुभव येतो. भारत प्राचीन काळापासूनच देश, समाज आणि जनहितासाठी रोज, ऋषी-मुनी इतकेच नव्हे तर सामान्य माणसंसुद्धा दान करण्यात तसुभरही मागे नाहीत. वेळ पडल्यास हे लोक आपले सर्वस्व दान करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. परंतु आता भूतकाळातील या गोष्टी केवळ मनाला खूश करण्यापुरत्याच मर्यादित राहिल्या आहेत. पूर्वी आपण, आपला देश, समाज असे. आता मात्र धर्म, जात, भाषा, प्रादेशिकता आणि राजनीती आपल्याला कोणत्या थराला नेईल हे सांगता येणार नाही. कारण मनात घृणा आणि मेंदूत शत्रुत्वाची भावना ठासून भरण्यात आली आहे. परस्परावर संशय घेण्याची प्रवृत्ती वाढत आहे. अशा स्थितीत कोण कोणाची कशी मदत करणार? आजच्या काळात जे लोक श्रीमंत आहेत ते आता जास्त धूर्त आणि चलाख झाले आहेत. आता ते एक लाखाचे दान करतात तर १० लाखाची पब्लिसिटी करून दामदुप्पट वसूलही करतात. ते आता स्वतः दान दक्षिणा करीत नाहीत. तर इतरांकडून करवितात. आपल्या देशातील सामान्य माणूस वारंवार धोका खातो, तरीही भावुकता, परोपकारिता दयाळूपणाचा त्याग करीत नाही. याच संस्कारामुळे सामान्य माणूस भलेही त्याचे कपडे फाटके असतील पण गरजूंसाठी खिशात जे काय असेल ते द्यायला मागेपुढे पाहत नाही. अमुक ठिकाणी अनोळखी माणसाचा उपाशी असल्यामुळे मृत्यू झाला याची भरपूर चर्चा होते. राजकारणातही असेच असते. सत्तारुढ व विरोधी पक्षातही या मुद्यावर रणकंदन माजते. आरोपप्रत्यारोप होतात पण कधी उपाशी कुटुंबांची एका तरी राजकीय नेत्याने मदत केली आहे का? हे श्रीमंत बनलेले बडे नेते जमिनीवर चालतानाही गुर्मीतच चालतात. त्यांना जनतेच्या कष्टाच्या कमाईवर घर, गाडी, कार्यालय सर्वत्र एअर कंडिशंन हवे. महाग खाद्य पदार्थही त्यांना फुकटात हवे असतात. याची संपत्ती दोन तीन वर्षांतच कित्येक पटीने वाढते, याच लोकांमध्ये दान करण्याच्या प्रवृत्तीचा अभाव असल्यामुळे जगात दानशूरतेच्या बाबतीत आपल्या देशाचा १३३ वा क्रमांक आहे. आपल्या देशासाठी सर्वांत लाजीरवाणी बाब आपले छोटे छोटे शेजारी देश नेपाळ, श्रीलंका, बांगला देश, अफगाणिस्तानच नव्हे तर पाकिस्तानसुद्धा दानाच्या बाबतीत आपल्या देशाच्या पुढे आहेत. कारण आपण दानशूर कर्ण, महर्षी दधीची, राजा हरिशचंद्र, दामाजीपंतांचा वारसा विसरलो आहोत. त्यातही विडंबना अशी, की गेल्या काही वर्षात इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशात कोट्यधीश, अब्जाधीशच नव्हे तर सर्वाधीश धनाढ्य लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पण हे लोक दानाच्या बाबतीत कोत्या मनाचे ठरले आहेत. कदाचित मीडियाने नेते,  अभिनेते या लोकांना अवासतव महत्त्व दिल्यामुळे असे होत असावे. आज सर्वांत जास्त नवधनाढ्य भारतात आहेत. धर्माच्या नावावर किंवा अनिश्‍चित भविष्याच्या भीतीमुळे हे लोक मंदिर, मशिद, दर्गा, चर्चला मोठ्या देणग्या देतील पण गरजू, गरीब मजुराला थोडीही जास्त मजुरी देत नाहीत. पूर्वीच्या तुलनेत दान-पुण्याच्या बाबतीत आज आपण खूपच मागे आहोत. हे खरे आहे की कोणाकडून बळजबरीने चॅरिटी करू नये. दान मनापासून केले पाहिजे. कारण जगातील एक तृतियांश गरीब भारतातच आहेत.सध्या आपल्या देशात मुकेश अंबानी सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहे. ते देशातील सर्वांत मोठी इंडस्ट्री रिलायन्सचे चेअरमन आहेत. त्यांचा व्यवसाय अडीच लाख कोटीचा आहे. २०१६ मध्ये रिलायन्सचा महसूल ४४ मिलियन डॉलर म्हणजे २,६९,००० कोटी रु. होता. त्यांचा अतिशय महागडा महाल आहे. या महालाची किंमत ६,६७३ कोटी रु. आहे. हा महाल ५७० फूट उंच, व २७ मजल्यांचा आहे. या घरात ६०० लोक काम करतात. त्यात बाग, जिम इ. सोबतच चक्क तीन हेलिपॅड आहे. ते इमारतीच्या छतावरच बांधले आहेत. या इमारतीत ५० लोक आरामात बसू शकतील असे चित्रपट गृह आहे. मुकेश अंबानीकडे १६८ आलिशान कार आहेत. त्यात महागडी कार मसिर्र्र्डीज मेबॅक असून या कारची किंमत साडेपाच कोटी रु. आहे. यापेक्षा जास्त महाग कार ११ कोटीची मर्सिडीज वेंझ आहे. त्यात त्यांनी लाखो रुपये खर्चून हवे तसे आरामदायक बदल केले आहेत. याशिवाय मुकेश अंबानीचे स्वतःच्या मालकीचे जेट विमान आहे. याची किंमत २२० कोटी रु. आहे. त्यात १९ प्रवासी बसून प्रवास करू शकतात. याशिवाय त्यांच्याकडे एक बोईंग जेट विमान आहे. त्याची किंमत ३३० कोटी रु. आहे. शिवाय २४२ कोटीचे एक कार्पोरेट जेट विमानसुद्धा आहे. मुकेश अंबानीने पत्नी नीताला हे विमान वाढदिवसाची भेट म्हणून दिले होते. ज्या मुंबई शहरात मुकेश अंबानी राहतात. त्या मुंबईत १३० अती धनाढ्य लोक राहतात. ‘न्यू वर्ल्ड वेल्थ’च्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या वार्षिक अहवालामध्ये भारतीयांची एकूण संपत्ती ४१५ लाख कोटींची असल्याचे नमूद करण्यात आले आहे. आज आपल्या देशात २,६४,००० कोट्यधीश व ९५ अब्जाधीश आहेत. तरीही आपला देश श्रीमंतीच्या बाबतीत जगात ८ व्या क्रमांकावर आहे. कोट्यधीशचा अर्थ त्याची संपत्ती कमीत कमी ६,७०० कोटीपेक्षा जास्त रकमेची संपत्ती असणे होय! याचे कारण आपला देश स्वतंत्र झाला तरी देशाचा कारभार ब्रिटीशांच्या पद्धतीनेच चालतो. त्यामुळे स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली तरी आपल्या देशात आजही ३२ कोटी लोकांना मूलभूत सुविधासुद्धा उपलब्ध नाहीत. लॉर्ड मेकॉलेच्या ब्रिटिश शिक्षण पद्धतीने आपल्या देशात फक्त क्लर्क तयार केले. आज हेच सरकार क्लर्क भ्रष्ट व्यवस्थेचे नट बोल्ट आहेत. हे नट बोल्ट टाईट केले नाहीत तर व्यवस्थेची मशिनरी जाम होते. सरकारी निर्णय क्लर्कच टाईप करतात व ते कायदे होतात.  पूर्वी जेव्हा क्लर्क टाईप करीत असे त्यावेळी टाईपरायटरचा आवाज येत असे. पण आता कॉम्प्युटरच्या स्क्रिनवर शब्द पसरतात पण आवाज होत नाही. क्लर्क ऑफिसमध्ये दिवसभर आपल्या अधिकार्‍यांचा राग सहन करतो व संध्याकाळी घरी परतल्यावर पत्नी, मुलाबाळावर त्याचा वचपा काढतो. हे चित्र कधी बदलणार?

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अतिविचारांनी जगण्याचा तोल बिघडतो

माणूस सर्वांत जास्त एकाकी आणि असुरक्षित तरीही गर्विष्ठ