विसराळूपणाच्या आजाराकडे दुर्लक्ष
संपूर्ण जगात लोकसंख्येच्या कमीतकमी एक टक्का लोक या आजाराने त्रस्त आहेत; पण बहुतेक लोकांमध्ये या आजाराची लक्षणे गंभीर नसतात; पण चेहरासुद्घा ओळखता न येणारा हा आजार का होतो? याची दोन कारणे आहेत. एकतर मेंदूचा कोणता तरी भाग क्षतिग्रस्त होणे. साधारणपणे मोठा अपघात झाल्यास काही लोक अशा स्थितीत पोचतात की, ते कोणालाच ओळखू शकत नाहीत.
असे म्हणतात की, या जगात आठवण ठेवणारे व आठवण विसरणारे असे दोन्ही प्रकारचे लोक आहेत. तसे हे नैतिक वाक्य आहे जे आठवण ठेवणार्या व विसरणार्या लोकांना चांगल्या किंवा वाईट नजरेने बघतात. यामागे विज्ञान आहे व विसराळूपणा एक प्रकारचा आजारच आहे; पण लोक याकडे गांभीर्याने पाहत नाहीत दुर्लक्षच करतात. तुम्हाला असे अनेक लोक भेटतील जे एकदा ऐकलेले विसरत नाहीत. बरेच लोक अनेक वर्षांनी भेटतात व आपल्याला नावासह ओळखतात. असे लोकही आहेत जे बालपणातील गाणी, घटना किंवा कविता मोठे झाल्यावर जशाच्या तशा म्हणून दाखवितात किंवा सांगतात; पण विसरणारे लोक इतकेच आश्चर्यकारक असतात. काही लोकांची नावे आठवत नाहीत तर काही लोक गावांची शहराची नावे विसरतात. बालपणातील उजळणी, मुळाक्षरे विसरणारे लोकही बरेच आहेत. पावकी, निमकी तसेच अडीचकी कालबाह्य झाली आहे. कारण ती आता कोणाच्या लक्षातच नाही. अनेक प्रकारचे आजार असतात. तेही लोक विसरू लागतात. विसराळूपणा हा एक प्रकारचा आजारच आहे. त्याला ‘प्रोसोपेजनोसिया’ असे म्हणतात. हा एक असा आजार आहे की, लोक इतरांचा चेहराही ओळखू शकत नाहीत. इतकेच काय; पण ते आपले आईबाप, भाऊबहिणीचाही चेहरा विसरतात. काही बाबतीत तर हे प्रकरण इतके गंभीर असते की, जर रुग्णाने स्वत:चा चेहरा आरशात पाहिला तर तो सुद्घा कदाचित आठवणार नाही. अर्थात या आजाराचे रुग्ण ङ्गारच कमी आढळून येतात; पण हा असाही आजार नाही जो क्वचितच काही लाख किंवा कोटी लोकांपैकी एकालाच होतो. अनेक प्रकारच्या शोधामध्ये शास्त्रज्ञांना आढळून आले आहे की, संपूर्ण जगात लोकसंख्येच्या कमीतकमी एक टक्का लोक या आजाराने त्रस्त आहेत; पण बहुतेक लोकांमध्ये या आजाराची लक्षणे गंभीर नसतात; पण चेहरासुद्घा ओळखता न येणारा हा आजार का होतो? याची दोन कारणे आहेत. एकतर मेंदूचा कोणता तरी भाग क्षतिग्रस्त होणे. साधारणपणे मोठा अपघात झाल्यास काही लोक अशा स्थितीत पोचतात की, ते कोणालाच ओळखू शकत नाहीत. मेंदूचे नुकसान झाल्यास अशी स्थिती निर्माण होते आणि ज्यावेळी मेंदूचा हा एक भाग बरा होतो तेव्हा त्याची ओळखण्याची क्षमता पुन्हा परत येते; पण काही लोकांचा हा आजार हळूहळू वाढत जातो. तशी ही बाब मेंदूशीच संलग्न आहे; पण याचे कारण काय आहे हे अद्याप कोणत्याही शास्त्रज्ञाला समजलेले नाही. यामुळेच या आजाराचा रुग्ण पूर्णपणे बरा करणे शक्य नसते. यामुळे जे लोक चेहरे ओळखत नाहीत त्यांना सर्व अनोळखीच भासतात. तरी या लोकांची समस्या मनोवैज्ञानिक इलाजाने कमी करणे शक्य आहे. यात रुग्णाला लोकांना त्यांची केशरचना, त्यांच्या त्वचेचा रंग आणि त्यांच्या चालीवरून कसे ओळखावे हे शिकविले जाते. असेही नाही की, ज्या लोकांना ही समस्या आहे त्यांच्यासाठी सर्वच मार्ग बंद होतात. या आजाराची विकीपिडियावर यादी पाहिली तर असे आढळून येईल की, ती अशा यशस्वी लोकांची यादी आहे जे कमीजास्त प्रमाणात या आजाराने त्रस्त होते. त्यात अभिनेते आणि शास्त्रज्ञांचासुद्घा समावेश आहे. हॉलिवूड अभिनेता ब्रँड पिटला हीच समस्या होती. तशीच ऍपल कंपनीचे सहसंस्थापक स्टिव्ह वॉजनईक यांचीही अशीच समस्या होती. आपली समस्या अशी आहे की, आपण अशा समस्या एका अक्षमतेच्या स्वरूपात पाहतो; पण ही अक्षमता नाही एक वेगळेपण आहे जी एक प्रकारची क्षमताच आहे. असे लोक समाजासाठी महत्त्वाचे बनू शकतात आणि मोठे उदाहरण बनू शकतात.
हा त्यांच्या चेहरा ओळखण्याचा नव्हे तर आपले उदार चेहरे स्वीकारण्याचा मुद्दा आहे. एक जुनी कहाणी आहे - स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान स्व. पं. जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे नवे सरकार स्थापन करीत होते. परराष्ट्र मंत्रालयामध्ये अशा लोकांची खूप कमतरता होती. ज्यांची राजदूत पदावर नोकरी करता येईल. त्यामुळे नेहरूजी सिव्हील सोसायटीच्या योग्य लोकांना राजदूत पद स्वीकारण्याचा आग्रह करीत होते. याच संदर्भात त्यांनी उत्तर प्रदेशाच्या अवध परिसरातील अवधच्या संस्थानिकाला बोलाविले. हे संस्थानिक नेहरूजीप्रमाणेच इंग्लंडमध्ये वाढलेले व शिकलेले होते. राजा नेहरूंची ऑङ्गर ऐकून नम्रतेने म्हणाला पंडितजी-मोठ्या मुश्किलीने मी, स्वत:च्या हाताने जेवायला शिकलो आहे. आता तुम्ही पुन्हा काटा चमच्याने जेवायला लावणार का? राजाचे हे उत्तर ऐकून नेहरूजी हसू लागले व म्हणाले- ठीक आहे. तुम्हाला तुम्हाला अशी एखादी जबाबदारी सोपविण्यात येईल जी देशातच राहून पूर्ण करता येईल. भेट घेतल्यानंतर परत जाण्यपूर्वी राजा नेहरूजींना म्हणाला. पंडितजी, तुम्ही लोकशाहीचे जे रोपटे युरोपमधून आणून भारतात लावले आहे ते काही काळानंतर विशाल वटवृक्ष होईल; पण जर येत्या २० वर्षांत संपूर्ण देशात आधुनिक शिक्षण सुरू केले नाही तर लोकांवर रडण्याची पाळी येईल. आता राजाने त्यावेळी म्हटलेले वाक्य आज ७० वर्षांनंतर खरे वाटत आहे. आज आपले राजकारण रिसॉर्टमध्येच कैद झाले आहे. तामीळनाडुमध्ये लोकसेवक असल्याचा आव आणणारे आमदार अंदाजे ७ दिवस एक समुद्र किनार्यावरील ‘गोल्डन वे रिसॉर्ट’मध्ये मुक्काम ठोकून होते. टीव्हीवर या रिसॉर्टचे ङ्गोटो दररोज प्रसारित होत होते. लक्झरी एसयुव्ही गाड्यातून येणारे जाणारे नेता मीडियापासून अशा प्रकारे तोंड लपवित होते की, न जाणो या राजकीय नाण्याची पोल तर उघड होणार नाही ना! जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा दावा करणारे हे नेते शेवटी रिसॉर्टमध्ये कशाला जातात?
तामीळनाडुचे प्रकरण ताजेच असताना पूर्वोत्तर राज्य नागालँडमध्ये रिसॉर्टचा नवा खेळ सुरू झाला. मुख्यमंत्री टी.आर. जेलीयांगविरुद्घ आमदारांची टीम काझीरंगा नॅशनल पार्कच्या एक रिसॉर्टमध्ये मुक्कामाला होती खासदार नेङ्गियु रियो यांची मुख्यमंत्री पदावर निवड करण्यासाठी रिसॉर्टवर बैठक झाली. आता तर रिसॉर्टचे हे राजकारण मनपापर्यंत पोहचले आहे. निकालानंतर जर दोनचार आमदार किंवा नगरसेवक कमी पडल्यास सर्वांत मोठा पक्ष रिसॉर्टवर घेऊन जातात. जनतेची बहुमूल्य मते मिळवून विजयी होणारे हे कथित लोकप्रतिनिधी लोकशाहीच्या संरक्षणासाठी रिसॉर्टमध्ये जातात व जनता रस्त्यावर आपल्या समस्यांसाठी संघर्ष करीत असते. शेवटी रिसॉर्टच्या राजकारणाला कसा आळा घालता येईल? निवडणूक आयोग आणि सामान्य जनतेकडे याची किल्ली आहे. निवडणूक आयोगाने कडक कायदा करून हॉर्स ट्रेडिंगच्या या रिसॉर्ट राजकारणाला आळा घालावा. यासाठी ‘राईट टू रिकॉल’चे महत्त्व वाटते. लोकप्रतिनिधी जर जनमताचा आदर करणार नाहीत तर त्यांना परत बोलावण्याचाही अधिकार हवाच! जनतेचे मत म्हणजे रिसॉर्ट नव्हे! सभागृहात जाण्यासाठी असते.
Comments
Post a Comment