स्त्री-पुरूष सारखेच आहेत तर त्यांच्यात एवढे भेद का?

Image
पृथ्वीवरील सगळ्या देशांमध्ये सर्व समाजातील पुरुषासाठी 'मिस्टर' हे एकच संबोधन आहे. स्त्रियांच्या बाबतीत अविवाहित स्त्रिया आपल्या नावापुढे 'मिस' आणि विवाहित स्त्रिया आपल्या नावामागे 'मिसेस' या शब्दाचा प्रयोग करते. 'मिस्टर' संबोधनाने विवाहित आणि अविवाहित पुरुष ओळखता येत नाही. त्याउलट मात्र 'मिस लीना' आणि 'मिसेस बीना' यात कोण विवाहित आहे हे लगेच लक्षात येते. स्त्री विवाहित आहे की अविवाहित हे तिच्या नावातच सामावले आहे. विवाह स्त्रीसाठी नक्कीच महत्त्वाचा आहे. मात्र, पुरुषांच्या बाबतीत हे आढळत नाही.  विधवा आणि विधूर पुरुषांतही हेच दिसते. व‍िधवेला अंगावरील सर्वच अलंकार उतरवावे लागतात. इतकेच काय पण जीवनातील 'रंग'ही बाजूला ठेवावे लागतात. पण पुरुषाला मात्र कशाचीच बंदी नाही. काही समाजात तर विधवांनी मांसाहार करण्यावरही बंदी आहे.   जोडीदार मिळणे आणि त्याने सोडून जाणे याचे नियम दोघांसाठी भिन्न का? स्त्रीला बरेच काही त्यागावे लागते. असे का? तिच्या आसपासच वावरणारा पुरूष मात्र बंधनहीन आहे. असे का?   नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थस...

पायी चालण्याची प्राचीन परंपरा


आजच्या पिढीला पायी चालण्याचा कंटाळा आहे. पण आपल्या देशात पायी चालण्याची परंपरा प्राचीन म्हणजे वेदकाळापासून  प्रचलित आहे. वेदकाळात ज्यावेळी ऋषि-मुनींना एखादा नवा विचार सूचत असे त्यावेळी ते या विचाराचा प्रचार करण्यासाठी देशात पायी भ्रमण करीत असत.
असे म्हणतात की, जो कितीही मेहनत केली तरी थकत नाही त्यालाच आयुष्यात चांगले यश मिळते. हातावर हात ठेवून बसणारा चांगला माणूसही आळशी, बेकार म्हणून ओळखला जातासे. कष्ट करणार्‍याला तर इंद्रसुद्धा मदत करतो. जो नुसता बसून राहतो त्याचे नशीब सुद्धा बसते व स्वत:च्या पायावर उभे राहणार्‍या लोकांचे नशीब खुलते. झोपणारा झोपलेलाच राहतो व जागृत माणूस पुढे निघून जातो. कारण तो सतत प्रगती करीत असतो. झोपलेला कलियुग आहे. झोपेतून जागे झालेला द्वापर युग आहे आणि जे उठून उभे राहिजे ते त्रेतायुग होय. पण कष्ट करणारा माणूस तर सत्य युगाचे प्रतीक आहे. वेदकालीन ऋषींचा हा जीवनक्रम कित्येक वर्षे सुरू होता. यानंतर भगवान बुद्धाने ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हा संदेश दिला व भिक्षुंना या संदेशाचा प्रचार करण्यासाठी चारही दिशांना जाण्याचे आदेश दिले. असाच उपदेश भगवान महावीरांनी केला. पुरुषां सोबत स्त्रियासुद्धा धर्मप्रचारासाठी पैदल निघाल्या. शंकराचार्य व रामानुजाचार्य यांनीही याच परंपरेचे अनुकरण केले. त्यांच्या शिष्यांनी देशभर पदयात्रा केली. भगवान येशु आणि महंमद पैगंबर यांनी शिष्यांना अशाच सूचना केल्या. त्यांचे अनुयायी चारी दिशांना फिरत होते. अतिशय त्रास होत असूनही त्यांनी विचाराचा प्रचार केला.
वर्तमान काळात महात्मा गांधीनी ‘सर्वोदय’ हा नवा आदर्श जगाच्या समोर ठेवला. ‘सर्व जगहिताय-सर्वजन सुखाय’ त्यानंतर विनोबा भावे यांनी हजारो मैल पायी चालून भूदान व ग्रामदान हा यज्ञ सुरू केला. हे दोन्ही आंदोलन सर्वोदयच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. विनोबा भावे सुद्धा ‘चरैवेती चरैवेती’ या प्राचीन आदेशाचेच पालन करीत होते. ऊन, थंडी, पावसाळा त्यांची पदयात्रा रोखू शकली नाही. पदयात्रा सुरूच होती. ज्यावेळी लोक त्यांना थांबायला सांगत त्यावेळी ते उत्तर देत - सूर्य देव त्यांचा दैनंदिन नित्यक्रम चालू ठेवतात. मग मी तरी का थांबू? जुन्या जमान्यात तीर्थयात्रा पयीच करीत असत व तेच खरे  पुण्य समजले जात असे. पायी चालल्यामुळे शारीरिक श्रम होत असत आणि लोकांशी संपर्कही होत असे. शारीरिक व मानसिक तपस्या किंवा संयमाची अनुभव सुद्धा मिळत असे. पण आता सर्व लहानमोठ्या तीर्थांपर्यंत पक्के रस्ते तयार झाले आहेत. आता तर अनेक देशात विमानाने प्रवास करता येतो.  हेलिपॅड तयार झाले.  बद्रीनाथमध्ये अग मंदिरासमोर कार किंवा बसने जाणे शक्य झाले आहे. इतर तीर्थ क्षेत्रावरही जाण्यासाठी आता पक्के रस्ते आहेत. मंदिरे आता तीर्थक्षेत्र राहिली नसून ती पर्यटक  स्थळे बनली आहेत. आता मंदिरात सुद्धा पैशाचाच खेळ  चालतो. जो जास्त रक्कम देईल. त्याला चटकन् ईश्‍वराचे दर्शन घडवून आणतात. श्रीमंतांसाठी तीर्थ स्थान आता पर्यटन स्थळ बनले आहे.
आपल्या नेत्यांना मात्र विमानाने प्रवास करणे फारच आवडते. त्यामुळे रस्त्यावर ते लोकांना भेटू शकत नाहीत. गांधींजी रेल्वेच्या तिसर्‍या श्रेणीच्या डब्यातूनच नेहमी प्रवास करीत असतं. व त्यांचा हजारो लोकांशी संपर्क संभाषण होत असे. याचा फायदा घेऊन बापुंंनी हरिजनांच्या कल्याणासाठी निधीही गोळा करीत असत अशा प्रकारे वर्षभरात ‘हरिजन फंडात’ अनेक लाख रूपये जमा होत असत. बापुंची पायी दांडी-यात्रा कित्येक दृष्टीने ऐतिहासिक आहे. ज्या दिवशी महात्मा गांधी साबरमती आश्रमापासून त्यांच्या ८० सहकार्‍यांसह पायी चालत निघाले. त्यावेळी संपूर्ण देशात जनजागृतीची मोठी लाट निर्माण झाली. त्यांची पदयात्रा जशी जशी दांडीच्या दिशेने कूच करीत होती, देशातील आबालवृद्ध या मीठाच्या सत्याग्रहात सामील झाले. कार, रेल्वे किंवा विमानाने प्रवास केला  असता तर असे वातावरण तयार झालेच नसते. बापूंना त्यांचे पाय जमिनीवर ठेवायचे होते. त्यांना हवेत उडायचे नव्हते. याचा अर्थ असा नाही आज सर्वप्रकारच्या सुविधा असूनही आपण पायीच चालावे व आपण रेल्वे, बस, विमानाचा वापरच करू नये. पण याचा आपणविचारपूर्वक वापर केला आहे.
विनोबाजी पदयात्रेविषयी नेहमी म्हणत की, पायी चालल्यामुळे लहान मोठ्या सर्व गावांशी संपर्क होतो. लोकांचे विचार जाणून घेता येतात. मला जमीन  मागायची आहे व ती भूमिहिनांना द्यायची आहे. हे हवेतून प्रवास केल्यामुळे माझा हा हेतू साध्य होणार नाही. ते म्हणत, मी विज्ञानाच्या विरोधी नाही. त्याचा फायदा नक्कीच घेईन. पण विज्ञान आपला नोकर व्हावा मालक नको! पदयात्रेचे अंतर्गत महत्त्व आधात्मिक आहे. जो नेहमी चालत असतो. कष्ट करण्यात मग्न असतो तोच प्रगती करतो. जगात उत्पादनाद्वारेच समृद्धीकडे वाटचाल करता येते. पण इतकेच पुरेसे नाही. आध्यात्माकडेही वाटचाल केली पाहिजे. जर त्याच्यासमोर भीषण अडचणी असल्या तराही त्याने त्याचे धैर्य, साहस व श्रद्धेवर अटळ राहावे. १९४६मध्ये बापु बंगालमधील नोआखाली जिल्ह्यातील गावागावांतून अनवाणी फिरत होते. त्यावेळी त्यांना काट्याकुट्याच्या रस्त्यावर चालण्यासाठी शक्ती सोबतच मानसिक व आध्यात्मिक शक्ती मिळत असे. नोआखालीमध्ये ज्यावेळी हिंदू-मुसलमानांमध्ये दंगली झाल्या व रक्ताचे पाट वाहत होते. अशा भयानक प्रसंगी सुद्धा महात्माजी गावोगावी पदयात्राच करीत होते व रामनामाच्या आधारावर त्यांना श्रमपरिहाराची अनुभूती होत असे.

Comments

Popular posts from this blog

अतिविचारांनी जगण्याचा तोल बिघडतो

श्रीमंतापेक्षा गरीबच जास्त दयाळू

माणूस सर्वांत जास्त एकाकी आणि असुरक्षित तरीही गर्विष्ठ