स्त्री-पुरूष सारखेच आहेत तर त्यांच्यात एवढे भेद का?

Image
पृथ्वीवरील सगळ्या देशांमध्ये सर्व समाजातील पुरुषासाठी 'मिस्टर' हे एकच संबोधन आहे. स्त्रियांच्या बाबतीत अविवाहित स्त्रिया आपल्या नावापुढे 'मिस' आणि विवाहित स्त्रिया आपल्या नावामागे 'मिसेस' या शब्दाचा प्रयोग करते. 'मिस्टर' संबोधनाने विवाहित आणि अविवाहित पुरुष ओळखता येत नाही. त्याउलट मात्र 'मिस लीना' आणि 'मिसेस बीना' यात कोण विवाहित आहे हे लगेच लक्षात येते. स्त्री विवाहित आहे की अविवाहित हे तिच्या नावातच सामावले आहे. विवाह स्त्रीसाठी नक्कीच महत्त्वाचा आहे. मात्र, पुरुषांच्या बाबतीत हे आढळत नाही.  विधवा आणि विधूर पुरुषांतही हेच दिसते. व‍िधवेला अंगावरील सर्वच अलंकार उतरवावे लागतात. इतकेच काय पण जीवनातील 'रंग'ही बाजूला ठेवावे लागतात. पण पुरुषाला मात्र कशाचीच बंदी नाही. काही समाजात तर विधवांनी मांसाहार करण्यावरही बंदी आहे.   जोडीदार मिळणे आणि त्याने सोडून जाणे याचे नियम दोघांसाठी भिन्न का? स्त्रीला बरेच काही त्यागावे लागते. असे का? तिच्या आसपासच वावरणारा पुरूष मात्र बंधनहीन आहे. असे का?   नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थस...

अतिविचारांनी जगण्याचा तोल बिघडतो

अतिविचारांनी जगण्याचा तोल बिघडतो




काहीतरी घडते आणि मग आपण त्याचा नको तितका विचार करत बसतो. आपल्या आयुष्यात अनेकदा असे घडते. कुठल्याही गोष्टीचा अतिरेकी विचार करण्यामुळे  आपल्यालाच मानसिक आणि शारीरीक त्रास होतो. अनेकदा त्यातून निर्माण  झालेली भीती आपल्या मनात खोलवर रुजून बसते. तुम्ही त्या गोष्टीचा विचार झटकून टाकल्याखेरीज भीती मनातून  दूर होत नाही. उगाचच नको त्या गोष्टीचा अनावश्यक विचार करत बसण्यामुळे  अनेकजण दुःखी असतात. आनंदी राहायचे असेल तर उगाच विचार करत बसणे टाळले पाहिजे. कारण, आपण जसा विचार करतो तितके गंभीर किंवा वाईट कधीच घडत नसते. पण आपले मन असे असते की ते वाईट घडण्याची शक्यता गृहित धरूनच जास्त विचार करत राहते. अतिरेकी विचाराचे धोके लक्षात घेतले, तर उगाच विचार करत बसणे आपल्याला टाळता येऊ शकते. 

१.  अतिविचारांमुळे  समस्या ही आहे तशीच राहते. अनेकदा समस्या गंभीर बनते. जोपर्यंत तुम्ही मनातून विचार काढून टाकत नाही, तोपर्यंत स्वस्थता लाभत नाही.

२.  समस्या सोडवण्यातील सृजनशील कौशल्य समस्येच्या अतिविचारांमुळे कमी  होत जाते. अतिविचारांमुळे  वैचारिक सृजनशीलता कमी होते.

३. अतिविचारांमुळे माणूस सतत चिंताग्रस्त राहतो. त्यातून मनात सतत नकारात्मक विचार येतात. भविष्याबाबतही त्याचे मन नकारात्मक बनते.

४.  सतत नकारात्मक विचारात राहण्यामुळे वेळ वाया जातो. हातून चांगल्या गोष्टी घडत नाहीत. आपल्या आयुष्यात काही चांगले घडू शकते, आपल्याकडेचांगले गुण, कौशल्ये आणि गुणवत्ता आहे हे माणूस विसरून जातो.

५.  आयुष्यात चांगले करण्याचे बळ अतिविचारांमुळे वाया जाते. चांगल्या गोष्टींऐवजी तुमचे लक्ष नकारात्मकाकडे  जाते.

६.  अतिविचारांमुळे नसलेल्या समस्यांविषयी मनात विचारचक्र सुरू राहते. जर असे झाले तर किंवा तसे झाले तर काय होईल अशा न घडणाऱ्या  घटनांबाबत विचार सुरू होतात.

७.  काहीवेळा अतिविचारांमुळे व्य्नती संताप व्य्नत करते. तिला भीती वाटते. तिच्या मनात मत्सर, द्वेष, नकारात्मक  भावना निर्माण होतात. त्यामुळे  जगताना कधीही कुठल्याच गोष्टीबद्दल अतिविचार करू नये. टोकाचा विचार तर कधीच करू नये. कारण,आपल्या आयुष्यात टोकाच्या घटना घडण्याची शक्यता फारच कमी असते.

Comments

Popular posts from this blog

श्रीमंतापेक्षा गरीबच जास्त दयाळू

माणूस सर्वांत जास्त एकाकी आणि असुरक्षित तरीही गर्विष्ठ