स्त्री-पुरूष सारखेच आहेत तर त्यांच्यात एवढे भेद का?

Image
पृथ्वीवरील सगळ्या देशांमध्ये सर्व समाजातील पुरुषासाठी 'मिस्टर' हे एकच संबोधन आहे. स्त्रियांच्या बाबतीत अविवाहित स्त्रिया आपल्या नावापुढे 'मिस' आणि विवाहित स्त्रिया आपल्या नावामागे 'मिसेस' या शब्दाचा प्रयोग करते. 'मिस्टर' संबोधनाने विवाहित आणि अविवाहित पुरुष ओळखता येत नाही. त्याउलट मात्र 'मिस लीना' आणि 'मिसेस बीना' यात कोण विवाहित आहे हे लगेच लक्षात येते. स्त्री विवाहित आहे की अविवाहित हे तिच्या नावातच सामावले आहे. विवाह स्त्रीसाठी नक्कीच महत्त्वाचा आहे. मात्र, पुरुषांच्या बाबतीत हे आढळत नाही.  विधवा आणि विधूर पुरुषांतही हेच दिसते. व‍िधवेला अंगावरील सर्वच अलंकार उतरवावे लागतात. इतकेच काय पण जीवनातील 'रंग'ही बाजूला ठेवावे लागतात. पण पुरुषाला मात्र कशाचीच बंदी नाही. काही समाजात तर विधवांनी मांसाहार करण्यावरही बंदी आहे.   जोडीदार मिळणे आणि त्याने सोडून जाणे याचे नियम दोघांसाठी भिन्न का? स्त्रीला बरेच काही त्यागावे लागते. असे का? तिच्या आसपासच वावरणारा पुरूष मात्र बंधनहीन आहे. असे का?   नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थस...

स्वतः सत्यवादी बना, मगच धर्म आणि ईश्‍वराचा शोध घ्या!

स्वतः सत्यवादी बना, मगच धर्म आणि ईश्‍वराचा शोध घ्या!



जगातील प्रत्येक माणूस कृत्रिमसत्याच्या आधारावर जगतो. पारंपरिक दृष्टीने कृत्रिम सत्या (मिथक)चा अर्थ होतो असत्य. पण हेही खरे आहे की, कोणीही असत्याच्या आधारावर जगू इच्छित नाही. पण प्रत्येक माणूस असाच विचार करतो की, तो सत्यवादी आहे व सत्यानेच जगत आहे.
पण सत्याचेही अनेक प्रकार आहेत. काही वस्तू- आधारित सत्य असते तर काही आत्मापरक  असतात. तर काही तर्कावर आधारित असतात. तर काही अंतर्ज्ञानात्मक असतात. काही सांस्कृतिक तर काही सार्वभौम असतात. काही प्रमाणावर आधारित प्राचीन युनानी दार्शनिक असत्याला सत्याच्या स्वरूपात ओळखत होते. याला ‘मिथोज’ म्हणतात. या मिथोजने चमत्कार व कला निर्माण केल्या. युनानी दार्शनिकांनी लोगोरेजचेही प्रतिपादन केले आहे. या लोगोजमुळे विज्ञान आणि गणित तयार झाले. लोगोजने अशी व्याख्या केली की, सूर्य कसा उगवतो? आणि मूल कसे जन्म घेते? पण त्याने हे सांगितले नाही की, सूर्य का उगवतो? किंवा मूल का जन्म घेते? पृथ्वीवर माणसाचे अस्तित्व का आहे? आपल्या प्राचीन ऋषिमुनींनी मिथक या शब्दाला मिथ्या म्हणजे खोटे असा अर्थ दिला. त्यांनी सत्य हे असत्यापासून दूर ठेवले होते. असत्य नेहमी एका विशिष्ट चौकटीतच असते. पण सत्य चौकटीच्या पलीकडे असते. मिथ्या म्हणजे खोटे हे एक भ्रांत असते. ते सुधारणे शक्य आहे. तर सत्य हर प्रकारे सत्यच असते. जगाची एक स्वतःची समजूत असते जी व्यक्ती आणि समुदायाला आपसांत जोडते. पुनर्जन्म, स्वर्ग-नर्क, देवदूत राक्षस्, पाप, पुण्य, सैतान आणि मोक्ष ही धार्मिक मिथके आहेत. ती आस्तित्वातच नाहित. मिथक शास्त्र म्हणजे मायथॉलॉजी म्हणजे अशा विचारांचा वाहक आहे. मिथक शास्त्रमर्यादा, प्रतीक व कर्मकांडापासून तयार होते जी व्यक्ती धर्माला ईश्‍वराच्या जीवनाचा अर्थ समजून घेण्यासाठी उत्सूक असते. पण ती जर स्वतःशी  प्रामाणिक नसेल तर तिचा शोध अनाठायी आहे. तिची मेहनत वाया जाईल. मग तो मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वारा कोठेही गेला तेथे कुुठेच त्याच्या मनात स्वतःच्या बाबतीतच खोटेपणा असेल तर तो जेथे जाईल तरी त्याला सत्य सापडणार नाही. सत्याच्या शोधाचा पहिला टप्पा हा आहे की, तो स्वतःच्या बाबतीत प्रामाणिक असावा. पण आपल्याला योग्य प्रकारे माहीतच नाही की, प्रामाणिक होणे म्हणजे खरे काय आहे?  एखादी विशिष्ट व्यक्तीच खोटे बोलत नाही किंवा एखादी पिढी खोटे बोलते असेही नाही. कोण्या एखाद्या शतकामध्ये माणूस स्वतःप्रती अप्रमाणिक झाला असेल  असेही नाही. या पृथ्वीवर हजारो वर्षांपासून माणूस खोटेपणा जपत आहे. खोटे बोलण्याची सवय आता इतकी जुनी झाली आहे की, आज  खोटेपणाचा संशय घेणेही अशक्य झाले आहे अनेक दिवसांपर्यंत ज्या वेळी एकच खोटी गोष्ट ऐकवण्यात येते पण नंतर तीच गोष्ट खरी भासू लागते. हजारो वर्षांपर्यंत ज्या वेळी एखादे खोटे प्रतिपादन करून त्याचे समर्थन होत असेल तर ते खोटे, खरे भासू लागते. हे आवश्यक नाही की खोटेपणा आपण शोधला आहे. परंतु परंपरांनी खोटेपणा हजारो वर्षांपासून विकसित केला आहे. आपण एकच खोटे विकसित केले नाही त्यामुळे  आपल्याला माहीतच नाही की, आपण खोटेपणाचे समर्थन करीत आहोत. पौराणिक शास्त्रांचे गाढे अभ्यासक आणि तज्ज्ञ देवदत्त वेदपाठक म्हणतात की मिथकांपासून आस्था तयार झाली व मिथक शास्त्रामुळे रीतिरिवाज तयार  झाले. प्राचीन काळात लोकांचा कुमारिका, उडणारे घोडे, मध्येच विभागलेले समुद्र, बोलणारे साप, चार मस्तके असलेले देवीदेवता आणि ८ हातांचे राक्षस यावर विश्‍वास होता. पण हा निव्वळ कल्पनाविलास होता. या गोष्टी वरवर तर्काच्या दृष्टीने खोट्या वाटत असतील पण काहाणीच्या चरित्राची पवित्रता स्पष्ट करते की, या गोष्टी दोषरहित पद्धतीने एका पिढीपासून  दुसर्‍या पिढीपर्यंत नेली आणि त्याच्या वैधतेला कोणी आव्हान देण्याचा प्रयत्न केला तर तो सहन केला जात नाही. कुमारी कन्या व दुभंगलेला समुद्र एक अशी सत्ता आहे जी निसर्गाच्या सत्तेपेक्षाही महान आहे ६ मस्तके असलेली एक देवता आणि आठ हातांचा एक राक्षस एका अशा ब्रह्मांडाचे चित्र प्रस्तुत करतो की, जेथे अनंत संभावना आहेत. मग ती चांगली असो की वाईट हे महत्त्वाचे नाही. मिथक शास्त्र ज्यावेळी लोकांची सांस्कृतिक गरज पूर्ण करू शकत नाही. त्या वेळी लोग ते मिथक मागे टाकून पुढे जातात. जोपर्यंत इजिप्तच्या लोकांना ओसिरीसद्वारे शासित परलोकावर विश्‍वास होता. तोपर्यंत हे लोक पिरमिड तयार करीत होते. जोपर्यंत ग्रीक लोकांना माझी शेरॉनवर विश्‍वास होता. तोपर्यंत ते प्रेताच्या तोंडात तांब्याची नाणी ठेवत होते. पण आज कोणीही ओसिरीस किंवा शेरॉनवर विश्‍वास ठेवत नाही. ही मोठी विडंबना आहे की, आपण तर्काला किती महत्त्व द्यावे? पण जीवन खरेपणावरच चालते प्रेमाचा कोणी तर्क करीत नाही. वेदना तार्किक नसतात. घृणा, महत्त्वाकांक्षा, क्रोध आणि मोह सुद्धा तर्काच्या पलीकडे आहेत. म्हणजे फक्त सत्यच शाश्‍वत आहे. इतकेच नव्हे तर सदाचार, नैतिकता आणि सौदर्यंशास्त्र सुद्धा तार्किक नाही. आजच्या काळात परिपूर्णतेच्या पलीकडे एक मिथक आहे. आज आपण या पृथ्वीवर कोठेही परिपूर्ण जग, परिपूर्ण मनुष्य किंवा एक परिपूर्ण कुटुंब होण्याचा पुरावा देवू शकत नाही. पण हे सगळे शास्त्रात दिलेले आहे. तरीसुद्धा प्रत्येकाला ते हवे असते व हीच इच्छा कला प्रेरित करते. साम्राज्य उभारते. क्रांतीची ठिणगी प्रज्वलित करते आणि नेत्यांना प्रेरणा देते. विष्णुपुराणातील माहितीनुसार एकदा भगवान शिव (शंकर) एका राक्षसाने केलेल्या घोर तपश्‍चर्येमुळे प्रसन्न झाले. त्यांनी राक्षसाला वरदान मागण्यास सांगितले. त्या वेळी राक्षसाने अशी शक्ती मागितली की, तो ज्याच्या डोक्यावर हात ठेवील तो जळून भस्म होईल. शंकरांनी तथास्तु म्हटले. पण यानंतर राक्षसाने भगवान शंकरांवरच हा वर पारखून पाहण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्ष भगवान शंकरालाच जीव वाचविण्यासाठी पळावे लागले. त्या वेळी भगवान शंकरांनी भगवान विष्णूंकडे मदतीची याचना केली. त्यावेळे भगवान विष्णूंनी मोहीनीचे रूप धारण करून स्वतःला राक्षसासमोर प्रस्तुत केले. राक्षसाने मोहिनीवर लट्ट होवून विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली. मोहिनीने होकार दिला. पण अशी अट घातली की, जसे मी नृत्य करते तसेच तुला करावे लागेल. असे म्हणून नृत्य करता करताच मोहिनीने स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला. राक्षसाने तसेच अनुकरण केले व स्वतःच जळून खाक झाला. या राक्षसाचे नाव भस्मासुर होते. बोध इतकाच की, कोणीही भस्मासुर होण्याचा प्रयत्न केला तर त्याचा नाश अटळ आहे

Comments

Popular posts from this blog

अतिविचारांनी जगण्याचा तोल बिघडतो

श्रीमंतापेक्षा गरीबच जास्त दयाळू

माणूस सर्वांत जास्त एकाकी आणि असुरक्षित तरीही गर्विष्ठ