कलीयुग आणि कयामत
आज जग कलीयुग बोधाने त्रस्त आहे. एक असे जग ज्यामध्ये भविष्याची कल्पना कमी आणि शंका जास्त आहेत. आपल्या देशात विनाशाकडे जाण्याचा ‘कलीयुग’ हा सिद्धांत प्रचलित आहे तर पाश्चिमात्य देशात कयामत ही कल्पना प्रचलित आहे. आपण कलीयुग आणि कयामत या कल्पनांना अंधविश्वास म्हणून टाळू शकत नाही.
आज जग कलीयुग बोधाने त्रस्त आहे. एक असे जग ज्यामध्ये भविष्याची कल्पना कमी आणि शंका जास्त आहेत. आपल्या देशात विनाशाकडे जाण्याचा ‘कलीयुग’ हा सिद्धांत प्रचलित आहे तर पाश्चिमात्य देशात कयामत ही कल्पना प्रचलित आहे. आपण कलीयुग आणि कयामत या कल्पनांना अंधविश्वास म्हणून टाळू शकत नाही.
कारण अंधविश्वासापासून दूर असल्याचा दावा करणारे विज्ञान भविष्याच्या बाबतीत विचार करते, ग्लोबल वॉर्मिंग आणि पर्यावरण आज परवलीचे शब्द बनले आहेत. भविष्यात दोन विशाल उल्कांची टक्कर होऊन एक दिवस अचानक पृथ्वी नष्ट होईल असेही विचार ऐकायला मिळतात. काही शास्त्रज्ञ तर या उल्कांची टक्कर झाल्यास कसा बचाव करता येईल यावर अहोरात्र अध्ययन करीत आहेत. आणखी एक भ्रामक कल्पना आहे की, इतर ग्रहावरील विकसित प्राणी उदा. एलियन्स पृथ्वीवर ताबा करतील किंवा तिचा विनाश करतील. तसेच अशीही भीती व्यक्त होत आहे की, आपणच तयार केलेली अण्वस्त्रे आपला विनाश करतील; पण आता एक नव्याच भीतीने जग हादरले आहे कारण, जगातील सर्वांत विद्वान शास्त्रज्ञ तसेच भौतिक आणि खगोलतज्ज्ञ स्टिङ्गन हॉकिंग यांनी अशी भीती व्यक्त केली आहे की, आता पृथ्वी ङ्गक्त १०० वर्षेच अस्तित्वात राहील. ही शंभर वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच पृथ्वीवरील जीवांची इतर ग्रहावर राहण्याची व्यवस्था करावी; पण हे नक्की आहे की, १०० वर्षांनंतर पृथ्वी नष्ट होईल. ही शंका खूपच गंभीर आहे. स्टिङ्गन हॉकिंग यांची ही शंका एक आगामी टीव्हीकार्यक्रमासंदर्भात संलग्न आहे. त्यात माणूस विनाशापासून कसा वाचू शकेल हे दाखविले जाणार आहे. त्यामुळे लोक हा टीव्ही कार्यक्रम प्रचार न मानता यावर गंभीरपणे विचार करू लागले आहेत. यामुळे आता अशी चर्चा सुरू झाली आहे की, माणसाला पृथ्वीव्यतिरिक्त कोठे वस्ती करता येईल? अशा प्रश्नांचे उत्तर देणे कठीण आहे. पृथ्वीच्या आसपास जे ग्रह आणि उपग्रह आहेत त्यात सध्या तरी एकही ग्रह आढळून आलेला नाही. जेथे पृथ्वीवरील लोक राहू शकतील. शास्त्रज्ञांनी काही राहण्यालायक ग्रह शोधले असेल तरी यापैकी काही ग्रह पृथ्वीपासून २० प्रकाशवर्ष दूर आहेत तर काही १०० पेक्षाही जास्त प्रकाशवर्ष दूर आहेत. जर आपण त्या ग्रहावर प्रकाशवेगाने गेलो तरी आपल्या अनेक पिढ्या रस्त्यातच मरण पावतील आणि सध्या तर आपण प्रकाशाच्या एक दशांश वेगाने जाण्याच्याही स्थितीत नाही आणि परग्रहावर नुसताच माणूस जाऊन चालणार नाही कारण, यामुळे काहीच ङ्गायदा होणार नाही. परग्रहावर माणसाची संपूर्ण इकोसिस्टीम न्यावी लागेल. त्यांच्या खाण्यापिण्याचे स्त्रोत शोधून ठेवावे लागतील. पृथ्वीवरील सर्व जीवजंतू, वृक्षवल्ली, जीवाणू विषाणू इ. सर्व शक्य नाही. असेही म्हटले जाते आहे की, स्टिङ्गन हॉकिंग यांनी ङ्गक्त १०० वर्षांची मुदतच दिली नाही तर पृथ्वीची एक्सपायरी तारीखसुद्धा दिली आहे. समजा आपण थोडावेळ हे खरे मानले तरी आपल्याजवळ पृथ्वीला आणखी जास्त सर्वोत्तम आणि चांगल्या प्रकारे राहण्यालायक बनविण्यासाठी १०० वर्षे आहेत. जर आतापासून आपण यासाठी प्रयत्न सुरू केले तर कदाचित या १०० वर्षांत कोणता ना कोणता मार्ग निश्चित सापडेल. बस इतकीच आशा आहे. ज्यावर आपली सभ्यता आज येथपर्यंत पोहचली आहे; पण आपण या बाबतीत नुसता विचारच करीत असतो. कदाचित हेच आपले भविष्य आहे. असो.
सध्या तरी दिल्लीच्या राजकारणात मोठा भूकंप झाल्यासारखे दिसत आहे. आम आदमी पक्ष (आप) मधील उलथापालथ या पक्षाच्या नेत्यांकडून उत्तर मागत आहे की, असेच राजकारण करायचे होते तर मग नवा पक्ष स्थापन करण्याची काय गरज होती? असे दिसत आहे की, ‘आप’ ची इमानदारी आणि नैतिकता संपुष्टात आली आहे. साडेचार वर्षांपूर्वी ज्या वेळी हा पक्ष स्थापन झाला त्या वेळी असे वाटत होते की, राजकीय क्षेत्रात एक नवी पहाट उगवली आहे. हा पक्ष आता इतर राजकीय पक्षांपेक्षा वेगळ्या पद्धतीने काम करेल. या पक्षात भ्र्रष्टाचाराचा नामोनिशाण नसेल व घराणेशाहीला स्थान नसेल. दिल्लीच्या जनतेने २०१५ मध्ये विधानसभा निवडणुकीत ‘आप’ला प्रचंड बहुमत दिले. या पक्षाला ७० पैकी ६७ जागा मिळाल्या. यानंतर या पक्षाने शेजारी राज्यात पाय पसरण्याचा प्रयत्न केला; पण हळूहळू ‘आप’ सुद्घा इतर राजकीय पक्षांच्या मार्गानेच वाटचाल करू लागला. या पक्षातही गटबाजी सुरू झाली. पार्टीच्या संस्थापक सदस्यांनासुद्धा बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. या पक्षाच्या आमदारा आणिमंत्र्यावर निरनिराळ्या प्रकारचे आरोप होऊ लागले; पण गेल्या काही दिवसांपूर्वी या पक्षात ज्या घडामोडी झाल्या तो एक प्रकारचा भूकंपच आहे कारण केजरीवाल सरकारमध्ये मंत्री असलेले कपिल मिश्रा यांनी पक्षाध्यक्ष आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरच दोन कोटी रु. ची लाच घेतल्याचा गंभीर आरोप केला. आरोप खरे आहेत की, खोटे हे तर चौकशी अंतीच स्पष्ट होईल; पण आता पक्षाचे काय होणार? पक्ष ङ्गुटेल का? नव्या राजकारणाचे स्वप्न पाहणार्या जनतेचे स्वप्न भंग पावणार का? ज्या वेळी देशातील सर्वच सरकारांविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. त्यावेळी असे प्रश्न उपस्थित होणारच! पंजाब आणि गोवा विधानसभा निवडणुकीत ‘आप’ चा जबरदस्त पराभव झाला व त्यानंतर पक्षात उलथापालथ सुरू झाली. जनतेला याचे उत्तर हवे आहे. जर असेच राजकारण करायचे होते तर बापूंच्या समाधीवर जाऊन शपथ तरी कशाला घेतली? दिल्लीतील रामलीला मैदानापासून तर जंतरमंतरपर्यंत मोर्चेे काढून देशवासीयांना जागरुक कशासाठी केले? या दोन वर्षांत देशाच्या जनतेत जागृती निर्माण झाली; पण आम आदमी पक्षाचे नेते निद्राधीन झाले. पद बळकावण्याच्या स्पर्धेत परस्परांना कमी लेखण्याची स्पर्धाच सुरू झाली. गेल्या दोन वर्षांमध्ये इतर कोणत्याही राजकीय पक्षामध्ये घडले नसेल ते आपमध्ये घडले. आपचे नेतेही स्वार्थला प्राधान्य देत आहेत. देशाला नाही. मग देशाचा वाली कोण?
Comments
Post a Comment