स्त्री-पुरूष सारखेच आहेत तर त्यांच्यात एवढे भेद का?

Image
पृथ्वीवरील सगळ्या देशांमध्ये सर्व समाजातील पुरुषासाठी 'मिस्टर' हे एकच संबोधन आहे. स्त्रियांच्या बाबतीत अविवाहित स्त्रिया आपल्या नावापुढे 'मिस' आणि विवाहित स्त्रिया आपल्या नावामागे 'मिसेस' या शब्दाचा प्रयोग करते. 'मिस्टर' संबोधनाने विवाहित आणि अविवाहित पुरुष ओळखता येत नाही. त्याउलट मात्र 'मिस लीना' आणि 'मिसेस बीना' यात कोण विवाहित आहे हे लगेच लक्षात येते. स्त्री विवाहित आहे की अविवाहित हे तिच्या नावातच सामावले आहे. विवाह स्त्रीसाठी नक्कीच महत्त्वाचा आहे. मात्र, पुरुषांच्या बाबतीत हे आढळत नाही.  विधवा आणि विधूर पुरुषांतही हेच दिसते. व‍िधवेला अंगावरील सर्वच अलंकार उतरवावे लागतात. इतकेच काय पण जीवनातील 'रंग'ही बाजूला ठेवावे लागतात. पण पुरुषाला मात्र कशाचीच बंदी नाही. काही समाजात तर विधवांनी मांसाहार करण्यावरही बंदी आहे.   जोडीदार मिळणे आणि त्याने सोडून जाणे याचे नियम दोघांसाठी भिन्न का? स्त्रीला बरेच काही त्यागावे लागते. असे का? तिच्या आसपासच वावरणारा पुरूष मात्र बंधनहीन आहे. असे का?   नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थस...

गांधीजींचा समाजवादच कल्याणकारी होईल


हिंसा आणि रक्तपात या आधारावर कोणतीही समस्या सुटू शकत नाही. भविष्यातही ते शक्य नाही. अहिंसा, प्रेम आणि सद्भावना याद्वारेच आपण समाजाचा विकास आणि उन्नतीची अपेक्षा करू शकतो. लोकशाही अहिंसेची प्रक्रिया आहे. लोकशाहीचे सत्य हेच आहे की, आपण योग्य प्रश्‍न व मतभेद चर्चेने व सहमतीने सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विरोधकांना नष्ट करून नव्हे.


आपला देश स्वतंत्र झाला तेव्हापासून आपल्या देशांत समाजवाद या विषयावर चर्चा होत आहे. सर्वच राजकीय पक्ष समाजवादी समाज रचनेवर भर देतात. इतकेच नव्हे तर भांडवलदारी नेतेही समाजवादी असल्याचा आव आणतात. प्रोजोद नावाच्या विद्वानाने एक वेळ असे प्रदिपादन केले होते की, समाजवाद अशी हॅट आहे की, तिचा चेहरा मोहराचा बदलला आहे. कारण प्रत्येकालाच ती वापरण्याची हौस असते. पण महात्मा गांधींनी देशासमोर आदर्श भारतीय समाजवाद ठेवला होता व ‘सबै भूमी गोपाल की’ हाच खरा समाजवाद असल्याचे प्रतिपादन केले होते.
परदेशांच्या अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक भांडवलाला अतिशय महत्व देण्यात आले आहे. जसा काही हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकारच आहे. कधी कधी त्याला दैवी आशीवार्दही मिळतो. या जगातील सर्वच वस्तू ही ईश्‍वराची देणगी आहे. त्याच्या कृपेच्या प्रसाद समजून आपण त्याचा वापर केला पाहिजे. आपली खासगी संपत्ती समजून नव्हे! आपल्या देशाच्या जमिनीचे क्षेत्रङ्गळ ३३ लाख चौ. किलोमीटर आहे. याचा अर्थ भारताची जमीन ८१ कोटी एकरापेक्षा जास्त आहे. आपल्या देशांत २० कोटीपेक्षा जास्त कुटुंबे आहेत. या हिशोबाने एका कुटुंबाला कमीत कमी ४ एकर जमीन तरी हवी! पण आज अशी स्थिती नाही काही मूठभर लोकांजवळ हजारो एकर जमीन आहे तर कोट्यवधी लोकांजवळ एक गुंठासुद्धा जमीन नाही. आपल्या संस्कृतीत दानाला विशेष महत्व आहे. आपल्याला उपजिविकेसाठी जितक्या ‘अन्न वस्त्र निवारा’ची गरज आहे तितकाच आपण वापर करायला हवा व बाकीचे समाजाला अर्पण केले पाहिजे. आपल्या दान, त्याग व सेवेला विशेष महत्व आहे.
प्राचीन काळी राजदरबारात संत, महात्मा, ऋृषि मुनीचा आदर सन्मान होत असे. गांधीचा मानव कल्याणावर अतूट विश्‍वास होता. त्यांच्या असा ठाम विश्‍वास होता की, जर संधी दिली तर माणूस दैवी गुणांचा स्वीकार करून प्रगती करू शकतो यासाठी गाधिंजी भांडवलदारांना सुधारण्याची अवश्य संधी देत असत. जेणे करून एक विश्‍वास म्हणून ते वागतील व समाजात सद्भावनेचे वातावरण निर्माण होईल. यामुळेच सर्वोदय समाजाची निर्मिती होऊ शकते. आपण नेहमी असा विचार करतो की, ट्रस्टीशीप ही कल्पनाच अतिशय कठीण आहे व सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेरची आहे. आपल्या समाजात मुलींचे पालनपोषण करून वाढवितात व ‘कन्यादान’ करून दुसर्‍या कुटुंबाच्या स्वाधीन करतात. हा ट्रस्टीशीपचाच आदर्श नमूना आहे. ज्यावेळी आपल्या घरात मुलगी जन्माला येेते त्यावेळी पासूनच आपल्याला माहीत असते की, ती मोठी झाल्यावर परकी होणार. तरीही आपण नि:स्वार्थी भावनेने, प्रेमाने आणि सतर्कतेने तिचे पालन पोषण करून शेवटी तिचे ‘कन्यादान’ केले जाते व हे पुण्याचे काम समजले जाते. लोकांची ही वागणूक ट्रस्टीशिपच्या भावनेने ओतप्रोेत आहे. ही भावना आपण व्यापक केली तर कुटुंबाच्या जागी समाज, गाव, देश आणि जगाचे ‘ट्रस्टी’ होण्याचा प्रयत्न केला तर ते अशक्य नाही. संधी मिळाली तर सामान्य माणूससुद्धा ईश्‍वरीय गुणांनी विभूषित होवू शकतो.
आजकाल असेही म्हटले जाते की, लोकशाही मार्गाने समाजवादाची स्थापना शक्य नाही. त्यासाठी एकाधिकारच हवा. मग मी लष्करशाही असो की कम्यूनिझम असो. गांधीजींनी देशाला स्वातंत्र मिळण्यापूर्वीच सांगितले होते की, शिस्त आणि विवेकयुक्त प्रजासत्ताक जगातील सर्वांत सुंदर व्यवस्था आहे. समाजवाद अतिशय शुद्ध आहे. पण ते प्राप्त करण्याची साधनेसुद्धा शुद्धच असायला हवीत. महात्माजींनी उद्देश आणि पूर्तता कधीच वेगळी मानली नाही.‘साधन शुद्धी’ त्यांच्या ‘बीज मंत्र’ होता त्याच्याद्वारेच गांधीजींनी भारताला शेकडो वर्षांच्या परकीय गुलामीच्या बेडीतून मुक्त केले. मग आपण आता हिंसा, रक्तपात आणि हुकूमशाही मार्गाने देशात समाजवाद आणू शकू का? जगाला दिवसेंदिवस असा अनुभव येत आहे की, हिंसा आणि रक्तपात या आधारावर कोणतीही समस्या सुटू शकत नाही. भविष्यातही ते शक्य नाही. अहिंसा, प्रेम आणि सद्भावना याद्वारेच आपण समाजाचा विकास आणि उन्नतीची अपेक्षा करू शकतो. लोकशाही अहिंसेची प्रक्रिया आहे.
लोकशाहीचे सत्य हेच आहे की, आपण योग्य प्रश्‍न व मतभेद चर्चेने व सहमतीने सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विरोधाकांना नष्ट करून नव्हे; ‘सबै भूमी गोपाल की’ ही निव्वळ कोरी कल्पना नाही. महात्मा गांधी नंतर आचार्य विनोबा भावे, विदर्भाचे नारायणराव जवरे इ. शेकडोंनी भूदान व ग्रामदान चळवळीद्वारे हा प्राचीन आदर्श चांगल्याप्रकारे राबविला. ते लोकांना समजून सांगत की, हवा आणि पाण्याप्रमाणेच धरतीसुद्धा सर्वांची आहे. त्यावर सर्वांचा समान अधिकार असला पाहिजे. प्रत्येकाला भूमातेची सेवा करण्याची संधी मिळाली पाहिजे. प्रत्येक माणसाने समाजाचा विश्‍वस्त असल्यासारखा आर्थिक व्यवहार करावा, हाच गांधी मार्ग आहे.

विनोबाजींच्या प्रयत्नाने भूदान यज्ञ चळवळीत ४५ लाख एकर जमीन मिळाली होती. त्यापैकी सुमारे १५ लाख एकर जमीन भूमिहीन मजुरांना जागीच वितरित करण्यात आली होती व इतके मोठे काम सरकार किंवा कायद्याच्या मदतीवीना झाले. भूदान यज्ञ आंदोलनामध्ये दीड लाख गावे सामील झाली होती. ही ङ्गार मोठी अहिंसक भीती होती. आपल्या देशात ‘गांधीवादी समाजवाद’च कल्याणकारी होईल. महात्माजींनी यालाच सर्वोदय हे नाव दिले होते.


Comments

Popular posts from this blog

अतिविचारांनी जगण्याचा तोल बिघडतो

श्रीमंतापेक्षा गरीबच जास्त दयाळू

माणूस सर्वांत जास्त एकाकी आणि असुरक्षित तरीही गर्विष्ठ