Posts

Showing posts from July, 2017

स्त्री-पुरूष सारखेच आहेत तर त्यांच्यात एवढे भेद का?

Image
पृथ्वीवरील सगळ्या देशांमध्ये सर्व समाजातील पुरुषासाठी 'मिस्टर' हे एकच संबोधन आहे. स्त्रियांच्या बाबतीत अविवाहित स्त्रिया आपल्या नावापुढे 'मिस' आणि विवाहित स्त्रिया आपल्या नावामागे 'मिसेस' या शब्दाचा प्रयोग करते. 'मिस्टर' संबोधनाने विवाहित आणि अविवाहित पुरुष ओळखता येत नाही. त्याउलट मात्र 'मिस लीना' आणि 'मिसेस बीना' यात कोण विवाहित आहे हे लगेच लक्षात येते. स्त्री विवाहित आहे की अविवाहित हे तिच्या नावातच सामावले आहे. विवाह स्त्रीसाठी नक्कीच महत्त्वाचा आहे. मात्र, पुरुषांच्या बाबतीत हे आढळत नाही.  विधवा आणि विधूर पुरुषांतही हेच दिसते. व‍िधवेला अंगावरील सर्वच अलंकार उतरवावे लागतात. इतकेच काय पण जीवनातील 'रंग'ही बाजूला ठेवावे लागतात. पण पुरुषाला मात्र कशाचीच बंदी नाही. काही समाजात तर विधवांनी मांसाहार करण्यावरही बंदी आहे.   जोडीदार मिळणे आणि त्याने सोडून जाणे याचे नियम दोघांसाठी भिन्न का? स्त्रीला बरेच काही त्यागावे लागते. असे का? तिच्या आसपासच वावरणारा पुरूष मात्र बंधनहीन आहे. असे का?   नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थस...

सर्वोच्च पदावरील व्यक्ती योग्यच असावी

Image
माणूस आणि पुंगीमध्ये इतकाच फरक आहे की, माणूस स्वतः बोलतो व पुंगी माणसाला वाजवावी लागते. पुंगी तशी पोकळ असते. त्यात कोणताही स्वर नसतो. ज्याच्या हातात पुंगी असते तो फूक मारून ती पुंगी वाजवितो. गेल्या तीन वर्षात आपल्या देशातील अनेक नेत्यांनी हे सिद्ध केले आहे, की ते राजकीय तज्ज्ञ नव्हे तर जत्रेेत मिळणारी कवडीमोल पुंगीच आहेत. पुंगी लहान मुलेही वाजवू शकतात. काही बडे नेते पुंगीप्रमाणे स्वतः वाजत नाहीत, तर शहनाई बनून मोठ्या थाटात समारंभात वाजतात. अशा पुंग्या आणि शहनाईटाईप नेते सत्तारुढ पक्षात आहेत; तसेच विरोधी पक्षात सुद्धा आहेत. त्यंाना हेही कळत नाही की, आता देशाची जनता अशा मुडमध्ये आहे की, सर्व सूर आणि बेसूर नेत्यांना फेकून देईल व शंख वाजवू लागेल. आता २५ जुलैला देशाला नवे राष्ट्रपती मिळतील. सत्तारूढ पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्यामध्ये देशाचे १४ वे राष्ट्रपती होण्याची योग्यता आहे की नाही या प्रश्‍नाला आता  काहीच महत्व नाही. त्यांचे कट्टर समर्थक त्यंानी सार्वजनिक आयुष्यात मामुली सुरुवात करून मिळविलेले यश व उपलब्धीचा प्रचार करतील. कॉंग्रेसने २००७ मध्ये प्रतिभात...

हंडीखोरांना चपराक

Image
दहीहंडी हा सण उरला नसून राजकारणात जागा करण्यासाठीचा मोठा इव्हेंट म्हणून त्याचा लौकिक वाढला आहे. जितेंद्र आव्हाड, सचिन अहिर, राम कदम, रवींद्र फाटक, बाळा नांदगावकर अशी काही नावे सांगता येतात, ज्यांनी दहीहंडीच्या बळावर राजकारणात जम बसवला आणि आमदारही झाले. राजकारण किंवा समाजकारण म्हणता येईल अशा किंवा त्यासाठी पूरक गोष्टी त्यांनी केल्या असल्या तरी दहीहंडीवाले हीच त्यांची ओळख राहिली आणि आजही आहे. त्यांच्यासकट बाकीच्या हंडीवाल्यांनीही हंडीचे थर वाढवून लोकप्रियता वाढवण्याचा प्रयत्न केला. परंतु या थरांच्या इर्षेमध्ये अनेक तरुण जायबंदी होतात, काहींचे मृत्यू होतात. त्याची पर्वा न बाळगता ही मंडळी बक्षिसाच्या रकमा आणि थरांची उंची वाढवत राहिली. त्याविरोधात प्रसारमाध्यमांनी कितीही आवाज उठवला तरी त्यांनी त्याची दखल घेतली नाही. शेवटी न्यायालयाने हस्तक्षेप केला. परंतु सरकारला वश करुन घेऊन न्यायालयाच्या आदेशातूनही पळवाट शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु अशा मंडळींना आता न्यायालयाने कात्रीत पकडले आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र सरकारही कोंडीत सापडले आहे. झुंडशाहीपुढे शरणागती पत्करून न्यायालयाच्या आद...

मित्रों, तुमचा मोदींवर भरोसा नाय का?

Image
मोदींविषयी गोड बोलण्याशिवाय पर्याय नाही. तिळगूळ मिळेल न मिळेल, भारतावर संक्रांत आलेली असल्याने गोड बोलणे भाग आहे. सोशल मीडिया मात्र गोड बोलता बोलता खडे बोलही सुनावतो आहे. दिल बहलाने के लिए पहलाज का खयाल अच्छा है! पहलाज निहलानी यांनी सेन्सॉर बोर्डाला एव्हरेस्टवर नेले आहे. सेक्स, प्रेम वगैरे ‘पाप’ गोष्टींच्या संदर्भात कात्री लावून झाल्यानंतर अमर्त्य सेन यांच्यावरील माहितीपटात त्यांनी गाय, गुजरात,..इ शब्द वगळायला सांगितले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमर्त्य सेन यांच्यावरील माहितीपटात अमर्त्य सेन हे शब्द उच्चारता येणार आहेत, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत सोशल मीडियावर. पहलाजभैय्यांची कात्री एकीकडे तर दुसरीकडे काँग्रेसने इंदू सरकारवरून माजवलेले रणकंदन. मधुर भांडारकरचा नवा सिनेमा इंदू सरकार, इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीविषयी आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमधून इंदिरा गांधींची बदनामी करण्यात आलेली आहे, असा कांगावा करत काँग्रेसने मधुर भांडारकरच्या पत्रकार परिषदा बंद पाडल्या. मधुरने ही कटू आठवण सांगत ट्विटरवरुन त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी विचारले आहे राहुल गांधींना. राहुल गांधी अज...

अर्धी स्त्री, अर्धा पुरुष व अर्धा राक्षस

Image
हास्याचा मुखवटा लावून टीव्हीवर अश्लीलता पसवरणारा कपिल शर्मा सध्या आजारी आहे. तसेच तो नैराश्यात असल्याची अफवादेखील अाहे. आता तर हास्याच्या नावावर अश्लीलता वाढणे हा एक व्यवसाय झाला अाहे. कवी संमेलनदेखील याला अपवाद नाहीत. आख्यानांपासून ते संविधानापर्यंत महिलेला देवीचे रूप मानण्यात आले आहे. मात्र, वास्तविकतेत तिला दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. साहित्याचे क्षेत्र संवेदनशील लोकांचे मानले जाते, मात्र येथेदेखील एखाद्या महिला लेखिकेने काही धाडसी लिहिण्याचा प्रयत्न केला तर तिला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. पुरुषांच्या मनात नेहमी स्त्रियांसाठी तिरस्काराची एक खोली घर करून असतेच. एकेकाळी यशस्वी विनोदी अभिनेता मेहमूददेखील नैराश्यात गेले होते. ते झोप लागण्याच्या औषधी घेऊन दिवस-रात्र शूटिंग करत होते. कारण त्यांनी अनेक चित्रपटांशी करार केला होता. त्या वेळी अशा प्रकारच्या औषधीचे ट्रेंड नाव मेंड्रिक्स होते. परीक्षेच्या काळातदेखील काही विद्यार्थी अशा प्रकारच्या गोळ्या घेत होते. त्यानंतर अशा प्रकारच्या औषधींवर बंदी घालण्यात आली. खरं तर, जागे राहणेदेखील चांगले नाही. मात्र, आपली व्यवस्था न...

सकाळच्या ‘सरकारनामा’ वेबपोर्टलवरील ‘कन्नड प्रेमी मनसे’ या लेखाला सडेतोड उत्तर

Image
सकाळच्या ‘सरकारनामा’ वेबपोर्टलवरील ‘कन्नड प्रेमी मनसे’ या तुषार खरात याच्या लेखाला सडेतोड उत्तर : या द्वेषपूर्ण लेखाला माझ्यासारख्या छोट्याश्या कार्यकर्त्या कडून उत्तर....... सरकारनामा आणि सकाळ मध्ये प्रसिद्ध झालेला लेख वाचला आणि मनसे द्वेषाची परंपरा आपण कायम ठेवली हे बघून आनंद झाला. या अगोदर सरकारनामा मध्ये प्रसिद्ध झालेले लेख हे असल्याचं प्रकारचे होते ज्याला आमच्या फेसबुकीं भाषेत टिपिकल भक्त लेखणी असं म्हणतो. पण मी ते लेख वाचून काना-डोळा केला. पण आता थोडं अतीच झालं म्हणून हा लेख प्रपंच... बर त्यात वापरलेली शब्द संपदा उदा. मनसेचे बारसे, चेले, सेटिंग इतकी मस्त आहे कि आपण अगदीच भक्त लेवल वर जाऊन बसलात. असो आता कन्नड प्रेमी मनसे  ह्या मथळ्या खाली लिहलेल्या लेखावर वर चर्चा करू पहिल्या दोन परिच्छेद मध्ये आपण नेतृत्व आणि कर्तृत्व यावर सडकून टीका केलीत खर तर तो मुद्दा आपण का मांडला हेच कळलं नाही. विषय घेतलाच म्हणून सांगतो तोच बेधडक पणा आजही आमच्या नेतृत्वात आहे आणि तो शेवट पर्यंत राहणार कारण कोणत्याही राजकीय मतपेटीच्या फायद्याचा विचार न करता आमचं नेतृत्व आज पर्यंत अश्या अनेक...

कन्नडप्रेमी मनसे !

Image
कन्नडप्रेमी मनसे ! एखाद्या दहशतवादी संघटनेपेक्षाही कमी वाटणार नाही, इतका राग मराठी माणसांचा या 'कन्नड रक्षक वेदिके'वर आहे. अशा या मराठीद्वेष्ट्या संघटनेच्या मांडीला मांडी लावून मनसेचा एक पदाधिकारी बसतो, हे तमाम मराठी माणसांच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे. राज व त्यांच्या मनसेचे राजकीय डावपेच नक्की काय आहेत, हे तेच जाणो. पण सीमाभागातील व महाराष्ट्रातील जनतेला हा असला बेधडकपणा आजिबात आवडणार नाही. त्यातून मनसेचा पाय आणखी खोलात गेला तरी नवल वाटायला नको. स ध्या गटांगळ्या खात असलेल्या 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'ला नवसंजिवणी देण्यासाठी राज ठाकरे केविलवाणे प्रयत्न करीत आहेत. मनसेचे बारसे घातल्यापासूनच राज यांनी खास आपल्या बेधडक शैलीत पक्षाची बांधणी केली. हा बेधडकपणा मराठी माणसांनीही डोक्यावर घेतला. त्यामुळे राजकीय डावपेच, नियोजन, पक्ष बांधणी अशा बाबींचा अभाव असतानाही पक्ष वाढला, फोफावला. सुरूवातीची सात - आठ वर्षे स्वतः राज ठाकरे आणि त्यांचे शिलेदार सातव्या आस्मानावर होते. त्यामुळे त्यांच्या बेधडकपणाचा वारू महाराष्ट्राच्या मातीत चौखूर झेपा घेऊ लागला. पण ...

भारतात जन्म होणे भाग्याचे

Image
भारतात जन्म होणे भाग्याचे रामकथा अगदी उत्तम प्रकारे ऐका आणि ती मनात उतरविल्यानंतर स्वत:मध्ये सुधारणा करा. आपली संस्कृती म्हणते की, आयुष्याच्या शेवटच्या क्षणाला जी इच्छा असेल ती पुढच्या जन्मात पूर्ण होते. त्यामुळे आयुष्याचा शेवट आल्यास मनात शुभ विचार करायला हवेत. रामकथा असा महत्त्वाचा संदेश देते की, माणसाला वेळेच्या मर्यादेचे भान असावे. वेळेची बचत करा. आपण चार प्रकारे वेळेची बचत करू शकतो. आपण भाग्यशाली आहोत की, भारतात आपला जन्म झाला. कारण आपण वेद, शास्त्र आणि पुराणांच्या भूमीत जन्म घेतला आहे. आपली पृथ्वी, समाज, परिवाराला साधूसंन्यासी आणि ऋषीमुनींचा स्पर्श झाला आहे. आपण या बाबतीत भाग्यशाली आहोत की, आपल्यावर गुरुची कृपा आहे. संत गोस्वामी तुलसीदास यांनी ‘रामचरीतमानस’ स्वरूपात भारतीय संस्कृतीला असा एक अद्भुत ग्रंथ दिला की, या ग्रंथामुळे वेद सोपे झाले. आपल्याला उपनिषद समजले. आज आपल्या धर्म-अध्यात्माच्या मार्गात ज्या अडचणी आहेत, त्या ‘रामचरीतमानस’ मुळे सोेप्या झाल्या आहेत. संत तुलसीदास यांना हा ग्रंथ लिहिण्यासाठी २ वर्ष ७ महिने आणि २६ दिवस लागले होते. त्यांनी हा ग्रंथ संवत १६३१ मध्ये...