स्त्री-पुरूष सारखेच आहेत तर त्यांच्यात एवढे भेद का?

Image
पृथ्वीवरील सगळ्या देशांमध्ये सर्व समाजातील पुरुषासाठी 'मिस्टर' हे एकच संबोधन आहे. स्त्रियांच्या बाबतीत अविवाहित स्त्रिया आपल्या नावापुढे 'मिस' आणि विवाहित स्त्रिया आपल्या नावामागे 'मिसेस' या शब्दाचा प्रयोग करते. 'मिस्टर' संबोधनाने विवाहित आणि अविवाहित पुरुष ओळखता येत नाही. त्याउलट मात्र 'मिस लीना' आणि 'मिसेस बीना' यात कोण विवाहित आहे हे लगेच लक्षात येते. स्त्री विवाहित आहे की अविवाहित हे तिच्या नावातच सामावले आहे. विवाह स्त्रीसाठी नक्कीच महत्त्वाचा आहे. मात्र, पुरुषांच्या बाबतीत हे आढळत नाही.  विधवा आणि विधूर पुरुषांतही हेच दिसते. व‍िधवेला अंगावरील सर्वच अलंकार उतरवावे लागतात. इतकेच काय पण जीवनातील 'रंग'ही बाजूला ठेवावे लागतात. पण पुरुषाला मात्र कशाचीच बंदी नाही. काही समाजात तर विधवांनी मांसाहार करण्यावरही बंदी आहे.   जोडीदार मिळणे आणि त्याने सोडून जाणे याचे नियम दोघांसाठी भिन्न का? स्त्रीला बरेच काही त्यागावे लागते. असे का? तिच्या आसपासच वावरणारा पुरूष मात्र बंधनहीन आहे. असे का?   नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थस...

सकाळच्या ‘सरकारनामा’ वेबपोर्टलवरील ‘कन्नड प्रेमी मनसे’ या लेखाला सडेतोड उत्तर




सकाळच्या ‘सरकारनामा’ वेबपोर्टलवरील ‘कन्नड प्रेमी मनसे’ या तुषार खरात याच्या लेखाला सडेतोड उत्तर : या द्वेषपूर्ण लेखाला माझ्यासारख्या छोट्याश्या कार्यकर्त्या कडून उत्तर.......

सरकारनामा आणि सकाळ मध्ये प्रसिद्ध झालेला लेख वाचला आणि मनसे द्वेषाची परंपरा आपण कायम ठेवली हे बघून आनंद झाला. या अगोदर सरकारनामा मध्ये प्रसिद्ध झालेले लेख हे असल्याचं प्रकारचे होते ज्याला आमच्या फेसबुकीं भाषेत टिपिकल भक्त लेखणी असं म्हणतो. पण मी ते लेख वाचून काना-डोळा केला. पण आता थोडं अतीच झालं म्हणून हा लेख प्रपंच... बर त्यात वापरलेली शब्द संपदा उदा. मनसेचे बारसे, चेले, सेटिंग इतकी मस्त आहे कि आपण अगदीच भक्त लेवल वर जाऊन बसलात.
असो आता कन्नड प्रेमी मनसे  ह्या मथळ्या खाली लिहलेल्या लेखावर वर चर्चा करू पहिल्या दोन परिच्छेद मध्ये आपण नेतृत्व आणि कर्तृत्व यावर सडकून टीका केलीत खर तर तो मुद्दा आपण का मांडला हेच कळलं नाही. विषय घेतलाच म्हणून सांगतो तोच बेधडक पणा आजही आमच्या नेतृत्वात आहे आणि तो शेवट पर्यंत राहणार कारण कोणत्याही राजकीय मतपेटीच्या फायद्याचा विचार न करता आमचं नेतृत्व आज पर्यंत अश्या अनेक भूमिका बेधडक पणे मांडत आलय. यातून आपल्या लेखाची पार्श्वभूमी असलेली भूमिकाही त्याच बेधडकपणातून निघाली आहे.
आपण सीमाबांधवांचं विषय मांडताना असं म्हणालात कि राज यांनी केलेलं वक्तव्य हे कोणत्याही संवेदशील मराठी भाषकांच्या हृदयावर घाव घालणार होत आणि जे वाक्य मा. राजसाहेब कधी बोललेच नाहीत त्याचा दाखला पण देऊन आपण आपला राजद्वेषा मागचा अजेंडा स्पष्ट केलात. आपल्या माहिती साठी त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषेदेचे माहिती थोडक्यात सांगतो मराठी एकीकरण समितीचे लोक मा. राजसाहेबाना भेटायला आले होते त्याची बाजू एकूण घेतल्यानंतर राज साहेब म्हणाले कि गेली ५०-५६ वर्षे हा लढा देत आहोत किती वेळ आपण हा लढा ताणून धरणार. ५६ वर्षात यात काहीच फरक पडला नाही. आज आपली तिसरी पिढी तिथं चालू आहे. आपल्या या सगळ्या मागच्या भावना मी समजू शकतो पण प्रत्येक वेळा तिकडे किंवा इकडे काही घटना घडली कि आम्ही इकडे कर्नाटक सरकारच्या बसेस फोडतो तिकडचं सरकार आमच्या मराठी बांधवाची डोकी फोडत. आठवडाभर ह्याची चर्चा होते मग निवदेन, आश्वासन आणि एक दिवस विधान भवन बंद पडत मग सगळे विसरतात परत सहा महिन्यानी तेच घडत परत तेच तोडफोड तीच निवेदन हे किती वेळ चालू राहनार. त्यापेक्षा तुम्हाला जर पटत असेल तर आपण ह्या गोष्टीचा थोडा प्रॅक्टिकल विचार करू. तुम्हाला जर तिकडे फक्त महाराष्ट्रात यायचं आहे म्हणून जर विरोध होत असेल तर मी तिकडच्या मुखमंत्र्याशी बोलायला तयार आहे. ते जर तुमचा आणि मराठीचा योग्य तो सन्मान ठेवून, तिकडच्या नोकरी धंद्यात ज्या काही सुख सुविधा  मध्ये जर तुम्हाला सामावून घेणार असतील तर तिकडे राहायला काय हरकत आहे . इथे महाराष्ट्रात कुठे सगळं आलबेल आहे . इकडे आजही ११ कोटी जनता पाणी वीज रस्ते शेती ह्या मूलभूत प्रश्नावर आंदोलन करत आहे मग इथे येऊन नंतर तुम्हाला पच्छाताप नको व्हायला. कुठे तरी ह्या गोष्टी थांबायला हव्यात रोज उठून आंदोलन करून काही साध्य होणार नाही आणि झालाच असत तर त्याला ५६ वर्ष लागली नसती. मला तिथल्या सीमा बांधवाच्या भावना नक्की समजतात पण हे असच चालू राहण्या पेक्षा कुठे तरी आजच्या घडीला प्रॅक्टिकल विचार करणं गरजेचं आहे. आपण सन्मानानं महाराष्ट्रात परत आलात तर मला आणि महाराष्ट्राला आनंदच आहे.
पण इतकी स्पष्ट भूमिका मांडून हि आपल्या सारख्या पत्रकारांनी सीमाभागातील मराठी जनतेने आता महाराष्ट्रात येण्याच्या फंद्यात पडू नका जिथे आहात तिथेच  गुण्या गोविंदाने रहा इतकीच बातमी लावून उच्चाकन गाठले. बर झाले काय फक्त तिथले सिमा बांधव राज ठाकरेंवर नाराज झाले इथल्या मराठी माणसालाहि दुःख झाल थोडा बहुत मराठी वर्ग नाराज झाला. पण तिथल्या परिस्थितीत काही फरक पडला का अजिबात नाही .. आज ही तेच आंदोलने तेच आश्वासनं तीच डोकं फोडी चालू आहे. खरतर ज्यांना ह्या सगळ्याचा जाब आपण पत्रकारांनी विचाऱयाला हवा त्यांना कधी विचारला नाही. महाराष्ट्रात हा प्रश्न सोडवण्याची राजकीय इच्छा शक्ती सध्यातरी कोणत्याही नेत्याकडे दिसून येत नाही. निवडणूका आल्या कि सीमा भागात एकदा निर्धार मेळावा होतो विधान भवनात हल्ला बोल होतो मग सर्व सहमतीने ठराव पास होतो बाकी पुढची निडवडणूक येई पर्यंत काही नाही.
यातच आम्हाला नवीन गाजर दिल जात कि हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. जर हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे तर मग पुढील काही घटना घडताना आपण निवडून दिलेले ४८ खासदार झोपा काढत होते काय १) बेळगावात कर्नाटक सरकारच विधान भवन उभा राहील त्याच उदघाटनला राष्ट्रपती येणार होते २) बेळगाव शहराचं नामकरण बेळगावी कस झालं ३) बेळगाव महानगरपालिका याच मुद्द्यावर बरखास्त का झाली ४) बसेस वर जय महाराष्ट्र लिहलं  म्हणून बसेसला  कर्नाटकात बंदी घालण्यात आली. बर ह्या चालू असंलेल्या केसला आपल्या सरकारचे सरकारी वकील (त्या वेळेच्या परीस्थिती नुसार ) अनेक वेळा गैरहजर होते याला जबाबदार कोण? कुणी तरी सरकार किंवा विरोधी पक्षांनी ह्याला आजपर्यँत जाब विचारला का ? पण ज्यांनी ह्या सगळ्या गोष्टीना बगल देऊन प्रॅक्टिकल विचार करून एक भूमिका मांडली त्यांना मात्र इतक्या वर्ष नंतर आपल्या सारखे प्रत्रकार नेहमी  आरोपीच्या पिंजर्‍यात उभा करतात.
या सगळ्याचा कहर म्हणून आपण परवाच कन्नड रक्षक वेदिकेने हिंदी भाषेच्या विरोधातील कार्यक्रमाला हजेरी लावली म्हणून अगदी दहशत वाद्याच्या मांडीला मांडी लावून बसलात असा उल्लेख केला.  त्याच संघटनेनं महाराष्ट्रातील भाषा अस्मिता जपणार्‍या मनसे आणि शिवसेनेला तसेच मराठी बोला चळवळ या संघटनेला आमंत्रित केलं होत. शिवसेनेंन या कार्यक्रमाला हजेरी लावली नसली तरी मनसे आणि चळवळीतील कार्यकर्ते हजर होते . आपल्या म्हणण्यानुसार ती हजेरी  मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार होता. पण आपण हे विसरलात कि त्या गोलमेज परिषेदेत गेलेले आमचे नेते संदीप देशपांडे काय कन्नड मध्ये नाही बोलले त्यांनी बोलताना इंग्रजी आणी मराठी दोन्ही भाषेचा उत्तम वापर केला. इतक्या वर्षान नंतर ती संघटना जर हिंदीच्या विरोधात लढ़ण्यासाठी आपल्याला आमंत्रित करत असेल आणि यातून जर वाद सोडून जर आपल्यात सवांद सुरु होत असेल तर बिघडलं कुठं ?  उद्या आपल्या पाठींब्यामुळे हिंदी विरोधी लढ्याच्या बदल्यात तिकडे होणारे वाद जर संपले तर  सगळे प्रश्नच सुटतील ना आणि संदीप देशपांडे यांनी हाच मुद्दा तिथ मांडला कि आम्ही उत्तरेतून  येणार्‍या हिंदी आक्रमणाला दक्षिणेच महाराष्ट्र प्रवेशद्वार बनून विरोध करेल. त्या बदल्यात आपल्यात जे काही सीमा वाद आहेत ते आपण आमचे मुख्यमंत्री आणि तुमचे मुख्यमंत्री बसून सामंजस्याने सोडवू. हीच जर भूमिका जर त्या संघटनेला पटली असेल तर आपलं त्या गोलमेज परिषेदला हजेरी लावण सार्थकी लागेल.  कारण दक्षिणेकडे सरकार किती हि बदलो त्याची भाषा अस्मिता तसूभर हि कमी होणार नाही . याच गोष्टीला आपण पाठींबा दिला आणि मराठीचा मुद्दा आपणही लावून धरला तर भविष्यात दोन्हीही मुद्दे आपल्यासाठी फायदयाचे ठरणार आहे.
असोत आमचा पाय खोलात रुतवयाचा कि सुसाट टाकायचा याचा विचार गेल्या ३० वर्षे महाराष्ट्च्या राजकारणाला वाहून घेतलेल्या आमच्या नेत्याला नक्कीच माहिती आहे.

तुषार दादा इथून पुढे मराठी विषयक अथवा मराठी पक्षविषयक बोलताना जरा संभाळून रे बाबा. काय माहितीये का मलाही लेखाद्वारे बोलता येतंय रे ? बाकी तू समजदार असशिलच! लेख जर झोंबला असेल तर खाली फोन नंबर दिलाच आहे. 


प्रतिक राम गंगणे
७२७६३१४१४२/८२०८८७४५००
तूर्तास जय महाराष्ट्र.........


काय आहे तुषार खरातचा लेख : http://pratikgangane.blogspot.com/2017/07/blog-post_23.html


Comments

Popular posts from this blog

अतिविचारांनी जगण्याचा तोल बिघडतो

श्रीमंतापेक्षा गरीबच जास्त दयाळू

माणूस सर्वांत जास्त एकाकी आणि असुरक्षित तरीही गर्विष्ठ