स्त्री-पुरूष सारखेच आहेत तर त्यांच्यात एवढे भेद का?

Image
पृथ्वीवरील सगळ्या देशांमध्ये सर्व समाजातील पुरुषासाठी 'मिस्टर' हे एकच संबोधन आहे. स्त्रियांच्या बाबतीत अविवाहित स्त्रिया आपल्या नावापुढे 'मिस' आणि विवाहित स्त्रिया आपल्या नावामागे 'मिसेस' या शब्दाचा प्रयोग करते. 'मिस्टर' संबोधनाने विवाहित आणि अविवाहित पुरुष ओळखता येत नाही. त्याउलट मात्र 'मिस लीना' आणि 'मिसेस बीना' यात कोण विवाहित आहे हे लगेच लक्षात येते. स्त्री विवाहित आहे की अविवाहित हे तिच्या नावातच सामावले आहे. विवाह स्त्रीसाठी नक्कीच महत्त्वाचा आहे. मात्र, पुरुषांच्या बाबतीत हे आढळत नाही.  विधवा आणि विधूर पुरुषांतही हेच दिसते. व‍िधवेला अंगावरील सर्वच अलंकार उतरवावे लागतात. इतकेच काय पण जीवनातील 'रंग'ही बाजूला ठेवावे लागतात. पण पुरुषाला मात्र कशाचीच बंदी नाही. काही समाजात तर विधवांनी मांसाहार करण्यावरही बंदी आहे.   जोडीदार मिळणे आणि त्याने सोडून जाणे याचे नियम दोघांसाठी भिन्न का? स्त्रीला बरेच काही त्यागावे लागते. असे का? तिच्या आसपासच वावरणारा पुरूष मात्र बंधनहीन आहे. असे का?   नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थस...

सर्वोच्च पदावरील व्यक्ती योग्यच असावी



माणूस आणि पुंगीमध्ये इतकाच फरक आहे की, माणूस स्वतः बोलतो व पुंगी माणसाला वाजवावी लागते. पुंगी तशी पोकळ असते. त्यात कोणताही स्वर नसतो. ज्याच्या हातात पुंगी असते तो फूक मारून ती पुंगी वाजवितो. गेल्या तीन वर्षात आपल्या देशातील अनेक नेत्यांनी हे सिद्ध केले आहे, की ते राजकीय तज्ज्ञ नव्हे तर जत्रेेत मिळणारी कवडीमोल पुंगीच आहेत.
पुंगी लहान मुलेही वाजवू शकतात. काही बडे नेते पुंगीप्रमाणे स्वतः वाजत नाहीत, तर शहनाई बनून मोठ्या थाटात समारंभात वाजतात. अशा पुंग्या आणि शहनाईटाईप नेते सत्तारुढ पक्षात आहेत; तसेच विरोधी पक्षात सुद्धा आहेत. त्यंाना हेही कळत नाही की, आता देशाची जनता अशा मुडमध्ये आहे की, सर्व सूर आणि बेसूर नेत्यांना फेकून देईल व शंख वाजवू लागेल. आता २५ जुलैला देशाला नवे राष्ट्रपती मिळतील. सत्तारूढ पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्यामध्ये देशाचे १४ वे राष्ट्रपती होण्याची योग्यता आहे की नाही या प्रश्‍नाला आता  काहीच महत्व नाही. त्यांचे कट्टर समर्थक त्यंानी सार्वजनिक आयुष्यात मामुली सुरुवात करून मिळविलेले यश व उपलब्धीचा प्रचार करतील. कॉंग्रेसने २००७ मध्ये प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिल्यानंतर त्यांच्याबाबत झालेल्या वादग्रस्त वक्तव्याची ज्याप्रकारे उत्तरे दिली तोच मार्ग आता सत्तारूढ पक्ष अवलंबण्याची शक्यता आहे. त्यावेळी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अचानक प्रतिभाताई पाटील यांच्या नावाची घोषणा केली. त्यावेळी एका इंग्रजी दैनिकाने प्रतिभाताई पाटील यांचा भूतकाळ उकरून काढला व त्यांच्या साखर व्यापार, सहकारी बँक आणि खासगी शिक्षण संस्थांमधील त्यांच्या संशयास्पद व्यवहाराची माहिती उघडकीस आणली होती. त्यावेळी ही माहिती व बातम्या दडपण्यासाठी कॉंग्रेस पक्षाचे एक वरिष्ठ नेते ‘आंब्याची पेटी’ घेऊन त्या दैनिकाच्या संपादकांच्या घरी गेले होते. त्यांनी कबूल केले की, तुमच्या बातम्या खर्‍या आहेत. आता त्या चांगल्या आहेत की वाईट यात काय अर्थ आहे. कारण आता २५ जुलैला राष्ट्रपती पदावर विराजमान होणारच आहेत. मग त्यांना बदनाम करण्याचा काय फायदा? असो, ही जुनी गोष्ट झाली. राजकीय अनुभवाच्या बाबतीत रामनाथ कोविंद प्रतिभाताई पाटील यांच्या तुलनेत कमी पडू शकतील. पण त्यांची शैक्षणिक पात्रता नक्कीच जास्त आहे. कायद्याच्या दृष्टीने त्यांचे रेकॉर्ड उत्तम आहे आणि वैयक्तिक आणि कौटुंबिक पातळीवर त्यांची इमानदारी वादातीत आहे. त्यांच्या स्वभावात किंवा अतिरिक्त गुणांमध्ये अशी कोणतीही त्रुटी नाही ज्यामुळे जनतेला ते राष्ट्रपती बनल्यास खेद वाटेल. तरीही असा प्रश्‍न विचारला जाऊ शकतो की, राष्ट्रपती होण्यासाठी अतिरिक्त गुण असणेच पुरेसे आहे का ? असे नसेल तर ती व्यक्ती राष्ट्रपतीपदासाठी योग्य ठरणार नाही का? आपल्या देशाच्या आतापर्यंतच्या राष्ट्रपतींच्या योग्यतेची पाहणी केली तर त्यांची शैक्षणिक योग्यता, सामाजिक किंवा राजकीय पृष्ठभूमीचे कोणतेही पॅटर्न दिसत नाही. आपल्याला डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यासारखे विराट बौद्धिक व्यक्तिमत्व असलेले राष्ट्रपती लाभले तर ज्ञानी जैलसिंह यांच्यासारखे ४ थी इयत्ता उत्तीर्ण अल्पशिक्षित राष्ट्रपतीही लाभले. डॉ. राजेंद्र प्रसाद, प्रणव मुखर्जी आणि आर व्यंकटरमण यांच्या सारखे महान नेते, एन. संजीव रेड्डी, व्ही.व्ही. गिरी आणि डॉ. शंकरदयाल शर्मा यांच्यासारखे सामान्य नेतेही राष्ट्रपतीपदावर विराजमान झाले. डॉ. झाकिर हुसेन यांच्यासारखे प्रशंसनीय मुस्लिम व्यक्तिमत्त्व, फखरुद्दिन अली अहमद यांच्यासारख्या मुस्लिम नेत्यांनीही राष्ट्रपती पद भूषविले त्यांना आपण विसरुच शकत नाही.
परराष्ट्र सेवेतून आलेले के. आर. नारायण आणि महान अणुशास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांनाही जनतेने राष्ट्रपती पदाची शान वाढविताना पाहिले. आपल्यासाठी ही अभिमानाची बाब आहे की, यापैकी असे एकही व्यक्तिमत्त्व नाही की ज्यांनी राष्ट्रपतीपदाची प्रतिष्ठा वाढविली नाही. फक्त दोनच अपवाद म्हणता येतील, फखरुद्दीन अली अहमद यांनी इंदिरा गांधी सरकारच्या अध्यादेशावर न वाचताच सही केली होती तर ज्ञानी जैलसिंह यांनी राष्ट्रपती भवनाचा राजीव गांधी यांच्या विरुद्ध वापर होऊ दिला. गेल्या ५० वर्षातील आपल्या देशाच्या नव्या पिढीलाही कदाचित आठवत असेल की, व्ही. व्ही. गिरी (वराहगिरी व्यंकट गिरी) राष्ट्रपती पदावर विराजमान झाले. त्यांची कामगार नेत्याची पार्श्‍वभूमी होती; पण हे तथ्यही नाकारता येत नाही त्यांचा इंदिरा गांधीनी कॉंग्रेसचे विभाजन करताना महत्त्वाचे प्यादे म्हणून वापर केला होता. सर्वांत जास्त वादातीत आणि लोकप्रिय राष्ट्रपती म्हणून सर्वांत अग्रक्रमावर डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचेच नाव आहे. बिहारमध्ये त्यांचा योग्य वेळी हस्तक्षेप आणि काही न्यायालयीन नियुक्त्यांच्या बाबतीत त्यांनी कठोर भूमिका घेतल्यामुळेच नव्हे तर गुजरातमध्ये झालेल्या दंगलीनंतर त्यांच्या शांत स्वभावाच्या पण प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे व प्रभावामुळे ते सर्वमान्य राष्ट्रपती ठरले. हा काळ असा होता की, देशाच्या सरहद्दीवर युद्धसदृश्य स्थिती होती. वेंकटरमण आणि डॉ. शंकरदयाल शर्मा यांनी राजकीय अस्थिरता आणि अल्पकालिक सरकारांच्या काळात देश मजबूत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. के. आर. नारायणन यांनी या पदाची नैतिक आणि बौद्धिक प्रतिष्ठा अशाप्रकारे वाढविली, की त्यांची तुलना डॉ. एस. राधाकृष्णन यांच्याशीच करता येईल. वाजपेयी सरकारचा संसदेत फक्त एका मताने पराभव झाल्यानंतर कामचलाऊ हंगामी सरकारच्या स्वरूपात पदावर असताना सुरू झालेले कारगिल युद्धाच्या वेळी के. आर. नारायणन यांचा आत्मविश्‍वास प्रशंसनीय होता. आपल्या राष्ट्रपतीच्या इतिहासाचा संबंध शैक्षणिक पात्रता, राजकीय पार्श्‍वभूमी, जात, धर्म किंवा सामाजिक पृष्ठभूमीशी नाही. थोडक्यात सांगायचे तर राष्ट्रपती पदासाठी त्यांच्या कामगिरीलाच प्राधान्य देण्यात आले. वास्तविक पाहता हा वेगळाच गुण होता. एपीजे अब्दुल कलाम, व्यंकटरमण आणि के. आर. नारायणन यांची स्वतःची खास प्रतिमा होती. तर व्ही. व्ही. गिरी, फखरुद्दिन अली अहमद आणि प्रतिभाताई पाटलांमध्ये याचा अभाव होता संविधानामध्ये राज्यपालापेक्षा राष्ट्रपती पद कमी महत्त्वाचे आहे. कमीत कमी एक राज्यपाल राजकीय खेळ तर खेळूच शकतो व राष्ट्रपती शासन लागू असेल तर आपल्या अधिकाराचा वापर करू शकतो. राष्ट्रनिर्मात्यांची अशी अपेक्षा होती की, राष्ट्रपती संरक्षक हा संविधानाचे प्रतीक म्हणून काम करणारा असावा असे असले तरी कितीही राजकारण केले तरी राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद सर्व देशाच्या सन्मानाचे अधिकारी आहेत. ते त्यांच्याविषयी शंका घेणार्‍यांना आश्‍चर्यचकित करतील यात शंका वाटत नाही.
ज्ञानी जैलसिंह यांचे शालेय शिक्षण कमी असले तरी त्यांची समयसूचकता आणि त्यांची राजकीय समज जबरदस्त होती. फेब्रुवारी १९८७ मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती जिया उल हक भारतात आले. त्यावेळी त्यांचा उद्देश फक्त भारत-पाकिस्तान दरम्यान होणारा किके्रटच्या सामना पाहणे हाच होता. पण त्यांचा खरा उद्देश ‘ऑपरेशन ब्रास टॅक्स’ च्या पार्श्‍वभूमीत आपले तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना शांत करणे हाच होता. त्यावेळी जिया उल हक यांनी आपले राष्ट्रपती जैलसिंग यांना उद्देशून असा टोमणा मारला की, आता त्यांच्या देशात सुद्धा जुनोजो यांच्या स्वरूपात एक पंतप्रधान आहेत ते जैलसिंह यांच्याप्रमाणेच नामधारी आहेत. त्यावेळी ज्ञानी जैलसिंग यांनी त्यांना असे चटपटीत उत्तर दिले की, जिया उल हक चाट पडले. जैलसिंग म्हणाले की, फरक इतकाच आहे की, मी फक्त पाच वर्षासाठी राष्ट्रपती पदावर आहे. पण तुम्ही तुम्हाला वाटेल तितकी वर्षे राष्ट्रपती पदावर राहू शकता. पण त्याच वर्षी जुलैमध्ये ज्ञान जॅलसिंग राष्ट्रपती पदावरून मुक्त झाले पण जिया उल हक राष्ट्रपतीपदाला चिकटून बसले. शेवटी विमान अपघात होऊन त्यांचा मृत्यू होईपर्यंत ते राष्ट्रपती पदावरच होते.

Comments

Popular posts from this blog

अतिविचारांनी जगण्याचा तोल बिघडतो

श्रीमंतापेक्षा गरीबच जास्त दयाळू

माणूस सर्वांत जास्त एकाकी आणि असुरक्षित तरीही गर्विष्ठ