हास्याचा मुखवटा लावून टीव्हीवर अश्लीलता पसवरणारा कपिल शर्मा सध्या आजारी आहे. तसेच तो नैराश्यात असल्याची अफवादेखील अाहे. आता तर हास्याच्या नावावर अश्लीलता वाढणे हा एक व्यवसाय झाला अाहे. कवी संमेलनदेखील याला अपवाद नाहीत. आख्यानांपासून ते संविधानापर्यंत महिलेला देवीचे रूप मानण्यात आले आहे. मात्र, वास्तविकतेत तिला दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. साहित्याचे क्षेत्र संवेदनशील लोकांचे मानले जाते, मात्र येथेदेखील एखाद्या महिला लेखिकेने काही धाडसी लिहिण्याचा प्रयत्न केला तर तिला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. पुरुषांच्या मनात नेहमी स्त्रियांसाठी तिरस्काराची एक खोली घर करून असतेच.
एकेकाळी यशस्वी विनोदी अभिनेता मेहमूददेखील नैराश्यात गेले होते. ते झोप लागण्याच्या औषधी घेऊन दिवस-रात्र शूटिंग करत होते. कारण त्यांनी अनेक चित्रपटांशी करार केला होता. त्या वेळी अशा प्रकारच्या औषधीचे ट्रेंड नाव मेंड्रिक्स होते. परीक्षेच्या काळातदेखील काही विद्यार्थी अशा प्रकारच्या गोळ्या घेत होते. त्यानंतर अशा प्रकारच्या औषधींवर बंदी घालण्यात आली. खरं तर, जागे राहणेदेखील चांगले नाही. मात्र, आपली व्यवस्था नेहमी झोपलेली असते. चाटूगिरीच्या या काळात एक सरकारी वरिष्ठ अधिकाऱ्याने वक्तव्य केले की, घरात शौचालय बांधण्यासाठी पैसे नसले तर आपल्या पत्नीला विका. अशा अभद्र बोलणाऱ्या त्या अधिकाऱ्याला शिक्षा होईल का? शक्यता तर कमीच आहे. थॉमस हार्डी यांची कादंबरी मेयर आॅफ केस्टरब्रिजमध्ये पत्नीचा लिलाव करण्याचे एक दृश्य होते. कपिल शर्माच्या तमाशामध्ये काही पुरुष महिलांचा वेश धारण करून कार्यक्रम सादर करतात. दीर्घ काळ जर पुरुष महिलेच्या वेशात राहिला तर त्याच्या विचारावर प्रभाव पडतो का?
दिलीप कुमार यांना जास्त प्रमाणात ट्रॅजेडी भूमिका केल्यामुळे मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागला होता. कपिल शर्माचा तमाशा भावनेवर आधारित नसल्यामुळे तेथील पुरुषांवर काही परिणाम होणार नाही. अशा प्रकारच्या भूमिका करणारा कपिल मेहमूद यांच्या वंशाचाच दिसतो. स्त्रीच्या भूमिकेत प्रसिद्धी मिळवणाऱ्या एका व्यक्तीच्या जीवनावर एक मालिकादेखील आली आहे. भारतीय चित्रपटांचे जनक दादासाहेब फाळके यांनादेखील महिलेच्या भूमिकेसाठी एका पुरुषालाच घ्यावे लागले होते. त्याचे नाव सोळंके होते. त्यानंतर काही चित्रपटांत त्यांची मुलगी मंदाकिनी यांनी ही भूमिका केली हाेती. एक म्हण आहे, प्रत्येक पुरुषामध्ये अर्धी स्त्री, अर्धा पुरुष आणि अर्धा राक्षस असतो. जणू काही तो तिन्ही भूमिकांत सादर होतो. निदा फाजली म्हणतात, एका माणसांमध्ये दहा माणसे लपलेली असतात. रावणाची कल्पनादेखील अशी करण्यात आली आहे. मात्र, त्याच्या ज्ञानामुळे ते करण्यात अाले असावे. माझ्यातील एका स्त्रीने माझ्याकडून हे सगळे लिहून घेतल्याचे एकदा हरिवंशराय बच्चन म्हणाले होते. ग्वालियर येथील कवी पवन करण यांचा काव्यसंग्रह ‘स्त्री मेरे भीतर’चे नुकतेच प्रकाशन झाले आहे.
हजार वर्षांच्या मानवी इतिहासात स्त्रीविषयी बदलत्या भावनांचा संदर्भ सिमॉन द ब्यू यांच्या ‘सेकंड सेक्स’ या पुस्तकात दिसतो. या विषयावरील हे सर्वोत्कृष्ट पुस्तक मानले जाते. मात्र, सेक्सविषयी यात काही नाही. स्त्रियांना सेकंड सेक्स म्हणणे उल्लेखनीय आहे. याला पुरुषी दृष्टिकोनाचे प्रतीक मानले जाऊ शकते. उल्लेखनीय आहे की, कामसूत्राचे रचनाकार वात्स्यायनाची पत्नी आपल्या प्रियकरासोबत पळून गेली होती. माणसाचे मन न उलडणारे कोडे आहे आणि ते व्याख्येच्या पलीकडे आहे.
Comments
Post a Comment