स्त्री-पुरूष सारखेच आहेत तर त्यांच्यात एवढे भेद का?

Image
पृथ्वीवरील सगळ्या देशांमध्ये सर्व समाजातील पुरुषासाठी 'मिस्टर' हे एकच संबोधन आहे. स्त्रियांच्या बाबतीत अविवाहित स्त्रिया आपल्या नावापुढे 'मिस' आणि विवाहित स्त्रिया आपल्या नावामागे 'मिसेस' या शब्दाचा प्रयोग करते. 'मिस्टर' संबोधनाने विवाहित आणि अविवाहित पुरुष ओळखता येत नाही. त्याउलट मात्र 'मिस लीना' आणि 'मिसेस बीना' यात कोण विवाहित आहे हे लगेच लक्षात येते. स्त्री विवाहित आहे की अविवाहित हे तिच्या नावातच सामावले आहे. विवाह स्त्रीसाठी नक्कीच महत्त्वाचा आहे. मात्र, पुरुषांच्या बाबतीत हे आढळत नाही.  विधवा आणि विधूर पुरुषांतही हेच दिसते. व‍िधवेला अंगावरील सर्वच अलंकार उतरवावे लागतात. इतकेच काय पण जीवनातील 'रंग'ही बाजूला ठेवावे लागतात. पण पुरुषाला मात्र कशाचीच बंदी नाही. काही समाजात तर विधवांनी मांसाहार करण्यावरही बंदी आहे.   जोडीदार मिळणे आणि त्याने सोडून जाणे याचे नियम दोघांसाठी भिन्न का? स्त्रीला बरेच काही त्यागावे लागते. असे का? तिच्या आसपासच वावरणारा पुरूष मात्र बंधनहीन आहे. असे का?   नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थस...

भारतात जन्म होणे भाग्याचे

भारतात जन्म होणे भाग्याचे



रामकथा अगदी उत्तम प्रकारे ऐका आणि ती मनात उतरविल्यानंतर स्वत:मध्ये सुधारणा करा. आपली संस्कृती म्हणते की, आयुष्याच्या शेवटच्या क्षणाला जी इच्छा असेल ती पुढच्या जन्मात पूर्ण होते. त्यामुळे आयुष्याचा शेवट आल्यास मनात शुभ विचार करायला हवेत. रामकथा असा महत्त्वाचा संदेश देते की, माणसाला वेळेच्या मर्यादेचे भान असावे. वेळेची बचत करा. आपण चार प्रकारे वेळेची बचत करू शकतो.

आपण भाग्यशाली आहोत की, भारतात आपला जन्म झाला. कारण आपण वेद, शास्त्र आणि पुराणांच्या भूमीत जन्म घेतला आहे. आपली पृथ्वी, समाज, परिवाराला साधूसंन्यासी आणि ऋषीमुनींचा स्पर्श झाला आहे. आपण या बाबतीत भाग्यशाली आहोत की, आपल्यावर गुरुची कृपा आहे. संत गोस्वामी तुलसीदास यांनी ‘रामचरीतमानस’ स्वरूपात भारतीय संस्कृतीला असा एक अद्भुत ग्रंथ दिला की, या ग्रंथामुळे वेद सोपे झाले. आपल्याला उपनिषद समजले. आज आपल्या धर्म-अध्यात्माच्या मार्गात ज्या अडचणी आहेत, त्या ‘रामचरीतमानस’ मुळे सोेप्या झाल्या आहेत. संत तुलसीदास यांना हा ग्रंथ लिहिण्यासाठी २ वर्ष ७ महिने आणि २६ दिवस लागले होते. त्यांनी हा ग्रंथ संवत १६३१ मध्ये लिहिला व चैत्र शुद्ध. नवमी म्हणजे रामनवमीला मंगळवारी अयोध्येत प्रकाशित झाला होता, त्यांच्या वडिलांचे नाव आत्माराम दुबे असे होते. तुलसीदास यांनी आपल्या आयुष्याच्या सुरुवातीपासूनच सर्वांना शिकवण दिली की, ईश्‍वरी जगात तुम्हाला काय मिळाले, काय नाही हे पाहिलं जात नाही, तर तुम्ही जगाला काय दिले, काय देत आहात याचा हिशेब घेतला जातो. श्री रामचरितमानसचे दर्शन, फिलॉसॉफी, विचार, सिद्धांत, नीती व शब्दांची रचना अत्यंत अद्भुत आहे. कारण तुलसीदास रामकथा जगले, त्यांचे तुलसी रामायण आपल्याला जगणे शिकविते. देशाच्या काळ-स्थितीनुसार संपूर्ण रामायण त्यंानी ७ भागात विभाजित करून त्यांना बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, लंकाकांड आणि उत्तरकांड अशी नावे दिली. बालकांडामध्ये भगवान श्रीरामांची बाललीला आहे.
त्यात जीवनाच्या सहजतेचा अर्थ काय हे शिकविले आहे. अयोध्याकांडामध्ये आपण आयुष्याचा दुसरा टप्पा म्हणजे सत्य पाहतो. अरण्यकांडामध्ये श्रीरामाचा वनवास सुरू होतो. वडिलांची आज्ञा पालन करण्यासाठी श्रीराम, भगवती सीता आणि भाऊ लक्ष्मणासोबत वनात जातात. हे एक प्रकारचे संतुलनकांड आहे. रावणाकडून सीताहरण, हनुमानासारखे मित्र याची जाणीव अरण्य म्हणजे संतुलनकांड करून देते. किष्किंधाकांडामध्ये संघर्षाचे वर्णन आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात समस्या, संघर्ष उद्भवणारच. खुद्द ईश्‍वराचा अवतार असलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांनाही संघर्ष करावाच लागला. सुंदरकांड यशोगाथा आहे. जीवनात यश कसे संपादन करावे व ते कसे टिकवावे हे सुंदरकांड शिकविते. लंकाकांडामध्ये संकल्पाचे वर्णन आहे. श्रीराम व रावणामध्ये युद्ध होते. राम म्हणजे सत्याचाच विजय होतो व रावणाचा अहंकारामुळे मृत्यू होतो. उत्तरकांड म्हणजे समर्पण आहे. त्यात आयुष्यात उद्भवणार्‍या सर्व समस्यांवर उपाय सापडतो. तुम्ही श्रीरामकथा श्रवण कराल तर पाच गोष्टी तुमच्या जीवनात एकत्रच येतील. पहिली गोष्ट तुमचे तीन दोष दूर होतील. प्रत्येक माणसात तीन दोष असतात. मन, वचन आणि कर्माचे दोष. मनुष्याचीदु:खे तीन प्रकारची असतात. जन्म, म्हातारपण आणि मृत्यू. यासोबतच रामकथा ऐकल्याने दारिद्य्राचा नाश होतो. माणसाचे तीन प्रकारचे दारिद्य्र असते. फक्त पैसाच नव्हे तर मनाची सुद्धा दरिद्रता असते. कधी आजारी पडणे, कधी समस्या निर्माण होेणे किंवा काही लोक कर्मदरिद्री आसतात. ज्यांच्या आयुष्यात चांगले लोग येतच नाहीत, त्यांना दरिद्रीच म्हणतात.
यासाठी आपण आयुष्यात नेहमी असा प्रयत्न करावा की, आपल्या आसपास किंवा इष्टमित्र हे लोक तुम्हाला कदाचित साधे, सरळ वाटतील. रामकथा ऐकल्याने पापांचे निवारण होते. शास्त्रात तीन प्रकारची पापे सांगितली आहेत. ही तीन पापे दैहिक, दैविक आणि भौतिक आहेत. रामकथा ऐकल्याने ही तीन पापे नष्ट होतात. कलियुगाची जी वाईट स्थिती आहे, ती रामकथा दूर करते. कलियुग आपला मेंदू किंवा बुद्धीमध्ये प्रवेश करतो. आपण विपरित विचार करतो हा कलियुगाचा परिणाम आहे. आपण उलटाच विचार करू लागतो आणि सगळेच उलटे घडते. आपल्याकडे जगण्याची पद्घत आहे; पण जगण्याची कला नाही. हा कलियुगाचाच परिणाम आहे. माणसाची जबान शब्दांनी परिपूर्ण आहे; पण मन कोरडे आहे. हेच कलियुग आहे. लोकांनी मोठमोठ्या इमारती बांधल्या; पण मनमंदिराचा पाया कोरडाच राहिला. रामकथा ऐकल्याने कलियुगातील हे तीन दोष नष्ट होतात.
संत तुलसीदास म्हणतात की, रामकथा केवळ बुद्धिने ऐकू नका, तर ती मनात उतरवा आणि इतरांनाही ऐकवा. रामकथा अगदी उत्तम प्रकारे ऐका आणि ती मनात उतरविल्यानंतर स्वत:मध्ये सुधारणा करा. आपली संस्कृती म्हणते की, आयुष्याच्या शेवटच्या क्षणाला जी इच्छा असेल ती पुढच्या जन्मात पूर्ण होते. त्यामुळे आयुष्याचा शेवट आल्यास मनात शुभ विचार करायला हवेत. रामकथा असा महत्त्वाचा संदेश देते की, माणसाला वेळेच्या मर्यादेचे भान असावे. वेळेची बचत करा. आपण चार प्रकारे वेळेची बचत करू शकतो. आपल्या आत निरंतरता ठेवा, इतरांची निंदा करू नका, झोपेवर नियंत्रण ठेवा आणि वेळप्रसंगानुसार  ‘नाही’ म्हणायला शिका. जे लोक नकार देऊ शकत नाहीत, त्यंाचा वेळ इतर लोक खातात. संकोच करणारे लोक जास्त वेळ वाया घालवितात. वेळ वाचवायचा असेल तर ‘नाही’ म्हणायला शिकावेच लागेल. रामकथा दर्शविते की, सुख आणि दु:ख काहीही नसते. माणूस कसा आहे यावरच सगळे अवलंबून असते. जर कोणी त्याच्या पद्धतीने दु:खी असेल तर त्याला स्वर्गातही दु:खाचीच अनुभूती होईल आणि जर तो त्याच्या पद्धतीने सुखी असेल तर नरकामध्येही त्याला सुखाची अनुभूती होईल. सुख आणि दु:ख हा आपल्या मनाच्या अवस्थेचा खेळ आहे.

Comments

Popular posts from this blog

अतिविचारांनी जगण्याचा तोल बिघडतो

श्रीमंतापेक्षा गरीबच जास्त दयाळू

माणूस सर्वांत जास्त एकाकी आणि असुरक्षित तरीही गर्विष्ठ