Posts

Showing posts from June, 2017

स्त्री-पुरूष सारखेच आहेत तर त्यांच्यात एवढे भेद का?

Image
पृथ्वीवरील सगळ्या देशांमध्ये सर्व समाजातील पुरुषासाठी 'मिस्टर' हे एकच संबोधन आहे. स्त्रियांच्या बाबतीत अविवाहित स्त्रिया आपल्या नावापुढे 'मिस' आणि विवाहित स्त्रिया आपल्या नावामागे 'मिसेस' या शब्दाचा प्रयोग करते. 'मिस्टर' संबोधनाने विवाहित आणि अविवाहित पुरुष ओळखता येत नाही. त्याउलट मात्र 'मिस लीना' आणि 'मिसेस बीना' यात कोण विवाहित आहे हे लगेच लक्षात येते. स्त्री विवाहित आहे की अविवाहित हे तिच्या नावातच सामावले आहे. विवाह स्त्रीसाठी नक्कीच महत्त्वाचा आहे. मात्र, पुरुषांच्या बाबतीत हे आढळत नाही.  विधवा आणि विधूर पुरुषांतही हेच दिसते. व‍िधवेला अंगावरील सर्वच अलंकार उतरवावे लागतात. इतकेच काय पण जीवनातील 'रंग'ही बाजूला ठेवावे लागतात. पण पुरुषाला मात्र कशाचीच बंदी नाही. काही समाजात तर विधवांनी मांसाहार करण्यावरही बंदी आहे.   जोडीदार मिळणे आणि त्याने सोडून जाणे याचे नियम दोघांसाठी भिन्न का? स्त्रीला बरेच काही त्यागावे लागते. असे का? तिच्या आसपासच वावरणारा पुरूष मात्र बंधनहीन आहे. असे का?   नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थस...

स्वतः सत्यवादी बना, मगच धर्म आणि ईश्‍वराचा शोध घ्या!

Image
स्वतः सत्यवादी बना, मगच धर्म आणि ईश्‍वराचा शोध घ्या! जगातील प्रत्येक माणूस कृत्रिमसत्याच्या आधारावर जगतो. पारंपरिक दृष्टीने कृत्रिम सत्या (मिथक)चा अर्थ होतो असत्य. पण हेही खरे आहे की, कोणीही असत्याच्या आधारावर जगू इच्छित नाही. पण प्रत्येक माणूस असाच विचार करतो की, तो सत्यवादी आहे व सत्यानेच जगत आहे. पण सत्याचेही अनेक प्रकार आहेत. काही वस्तू- आधारित सत्य असते तर काही आत्मापरक  असतात. तर काही तर्कावर आधारित असतात. तर काही अंतर्ज्ञानात्मक असतात. काही सांस्कृतिक तर काही सार्वभौम असतात. काही प्रमाणावर आधारित प्राचीन युनानी दार्शनिक असत्याला सत्याच्या स्वरूपात ओळखत होते. याला ‘मिथोज’ म्हणतात. या मिथोजने चमत्कार व कला निर्माण केल्या. युनानी दार्शनिकांनी लोगोरेजचेही प्रतिपादन केले आहे. या लोगोजमुळे विज्ञान आणि गणित तयार झाले. लोगोजने अशी व्याख्या केली की, सूर्य कसा उगवतो? आणि मूल कसे जन्म घेते? पण त्याने हे सांगितले नाही की, सूर्य का उगवतो? किंवा मूल का जन्म घेते? पृथ्वीवर माणसाचे अस्तित्व का आहे? आपल्या प्राचीन ऋषिमुनींनी मिथक या शब्दाला मिथ्या म्हणजे खोटे असा अर्थ दिला. त्यांन...

रस्त्यांवर सर्वांचा समान हक्क

Image
रस्त्यांवर सर्वांचा समान हक्क देशातील सर्वच  शहरांमध्ये ट्रॅफिक जाम, वायुप्रदूषण, गोंगाट, रस्त्यावर अराजकतासदृश स्थिती आणि अपघात  असे वातावरण निर्माण झाले आहे. हे सामान्य जनतेच्या  आरोग्याच्या दृष्टीने मोठे आव्हान आहे. वास्तविक पाहता रस्त्यावर सर्वांचाच समान हक्क आहे. रस्ता फक्त ट्रक्स, कार ,टॅक्सी, बस किंवा ऑटो रिक्षांसाठीच नाही, तर सायकल चालविणारे व पायी चालणार्‍यांनाही रस्त्यावर तितकाच हक्क मिळायला हवा पण तसे होते का? घरून ऑफिस, बाजार, फॅक्टरी, शाळा आणि कॉलेजला जाणे-येणे सर्वांसाठीच आवश्यक आहे. व ही गरज कमीतकमी खर्चात व वेळात व कोणत्याही प्रकारचा वैताग न येता पूर्ण झाली पाहिजे. जनगणनेच्या ताज्या आकडेवारीनुसार असे निष्पन्न होते की, एक तृतीयांश लोक आपल्या कामावर पायी किंवा सायकलीने जातात. पण शहरातील रस्ते, सामान्य माणसासाठी, असामान्य बनले आहेत व हेच लोक जास्त  अपघातात सापडतात. १२% भारतीय पेट्रोलवर चालणारे दुचाकी वाहन वापरतात. तर ११% लोक सिटी बसमधून प्रवास करतात व फक्त ३% लोक कार वापरतात, देशातील सर्व मोठ्या शहरांमध्ये बहुतेक रस्त्यांवर कारचीच संख्या जास्त असत...

विसराळूपणाच्या आजाराकडे दुर्लक्ष

Image
विसराळूपणाच्या आजाराकडे दुर्लक्ष संपूर्ण जगात लोकसंख्येच्या कमीतकमी एक टक्का लोक या आजाराने त्रस्त आहेत; पण बहुतेक लोकांमध्ये या आजाराची लक्षणे गंभीर नसतात; पण चेहरासुद्घा ओळखता न येणारा हा आजार का होतो? याची दोन कारणे आहेत. एकतर मेंदूचा कोणता तरी भाग क्षतिग्रस्त होणे. साधारणपणे मोठा अपघात झाल्यास काही लोक अशा स्थितीत पोचतात की, ते कोणालाच ओळखू शकत नाहीत. असे म्हणतात की, या जगात आठवण ठेवणारे व आठवण विसरणारे असे दोन्ही प्रकारचे लोक आहेत. तसे हे नैतिक वाक्य आहे जे आठवण ठेवणार्‍या व विसरणार्‍या लोकांना चांगल्या किंवा वाईट नजरेने बघतात. यामागे विज्ञान आहे व विसराळूपणा एक प्रकारचा आजारच आहे; पण लोक याकडे गांभीर्याने पाहत नाहीत दुर्लक्षच करतात. तुम्हाला असे अनेक लोक भेटतील जे एकदा ऐकलेले विसरत नाहीत. बरेच लोक अनेक वर्षांनी भेटतात व आपल्याला नावासह ओळखतात. असे लोकही आहेत जे बालपणातील गाणी, घटना किंवा कविता मोठे झाल्यावर जशाच्या तशा म्हणून दाखवितात किंवा सांगतात; पण विसरणारे लोक इतकेच आश्‍चर्यकारक असतात. काही लोकांची नावे आठवत नाहीत तर काही लोक गावांची शहराची नावे विसरतात. बालपणात...

खरंच आपण माणसं सर्वश्रेष्ठ आहोत?

Image
खरंच आपण माणसं  सर्वश्रेष्ठ  आहोत ? माणसं पैशाने , कष्टानं केलेली मदत तर विसरतोच पण कोणी जीव वाचवला असेल तर ते ही विसरायला कमी करत नाही. फेसबुकवर एक अप्रतिम व्हिडिओ बघितला आणि अवाक झाले. त्यात एका वृद्ध कोळ्याच्या आणि एका  पेंगूइन  च्या मैत्रीची अनोखी गोष्ट होती. गोष्ट आहे ब्राझील मधली रिओ द जनेरो शहरातील! तिथं समुद्रात मासेमारी करणाऱ्या एका कोळ्याला एक दिवस एक छोटा  पेंगूइन  सापडला. तो तेलाने पूर्ण माखलेला होता आणि कदाचित त्यामुळे त्याला पाण्यात अडचण येत होती. आता भूगोलाच्या दृष्टीनं विचार केला तर पेंग्विन च्या सगळ्या कॉलनी किंवा वस्ती ही अगदी थंड , बर्फाळ प्रदेशातील , म्हणजेच अंटार्क्टिका मधील आणि ब्राझील कुठल्या कुठे दक्षिण अमेरिकेत साधारण 5000 मैल अंतरावर !! तो बिचारा एकटा पेंग्विन तिथे आलाच कसा हा एक प्रश्नच पण काही कारणाने , अपघाताने तो तिथे पोचला आणि या माणसाच्या हाती लागला. त्याने त्याला स्वतःच्या घरी आणलं , तेल वगैरे धुवून काढलं , अगदी छान अंघोळ घालून स्वच्छ केलं आणि त्या भुकेल्या जीवाला खाउपिऊ घालून त्याची काळजी घे...

गांधीजींचा समाजवादच कल्याणकारी होईल

Image
हिंसा आणि रक्तपात या आधारावर कोणतीही समस्या सुटू शकत नाही. भविष्यातही ते शक्य नाही. अहिंसा, प्रेम आणि सद्भावना याद्वारेच आपण समाजाचा विकास आणि उन्नतीची अपेक्षा करू शकतो. लोकशाही अहिंसेची प्रक्रिया आहे. लोकशाहीचे सत्य हेच आहे की, आपण योग्य प्रश्‍न व मतभेद चर्चेने व सहमतीने सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विरोधकांना नष्ट करून नव्हे. आपला देश स्वतंत्र झाला तेव्हापासून आपल्या देशांत समाजवाद या विषयावर चर्चा होत आहे. सर्वच राजकीय पक्ष समाजवादी समाज रचनेवर भर देतात. इतकेच नव्हे तर भांडवलदारी नेतेही समाजवादी असल्याचा आव आणतात. प्रोजोद नावाच्या विद्वानाने एक वेळ असे प्रदिपादन केले होते की, समाजवाद अशी हॅट आहे की, तिचा चेहरा मोहराचा बदलला आहे. कारण प्रत्येकालाच ती वापरण्याची हौस असते. पण महात्मा गांधींनी देशासमोर आदर्श भारतीय समाजवाद ठेवला होता व ‘सबै भूमी गोपाल की’ हाच खरा समाजवाद असल्याचे प्रतिपादन केले होते. परदेशांच्या अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक भांडवलाला अतिशय महत्व देण्यात आले आहे. जसा काही हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकारच आहे. कधी कधी त्याला दैवी आशीवार्दही मिळतो. या जगातील सर्वच वस...

पायी चालण्याची प्राचीन परंपरा

Image
आजच्या पिढीला पायी चालण्याचा कंटाळा आहे. पण आपल्या देशात पायी चालण्याची परंपरा प्राचीन म्हणजे वेदकाळापासून  प्रचलित आहे. वेदकाळात ज्यावेळी ऋषि-मुनींना एखादा नवा विचार सूचत असे त्यावेळी ते या विचाराचा प्रचार करण्यासाठी देशात पायी भ्रमण करीत असत. असे म्हणतात की, जो कितीही मेहनत केली तरी थकत नाही त्यालाच आयुष्यात चांगले यश मिळते. हातावर हात ठेवून बसणारा चांगला माणूसही आळशी, बेकार म्हणून ओळखला जातासे. कष्ट करणार्‍याला तर इंद्रसुद्धा मदत करतो. जो नुसता बसून राहतो त्याचे नशीब सुद्धा बसते व स्वत:च्या पायावर उभे राहणार्‍या लोकांचे नशीब खुलते. झोपणारा झोपलेलाच राहतो व जागृत माणूस पुढे निघून जातो. कारण तो सतत प्रगती करीत असतो. झोपलेला कलियुग आहे. झोपेतून जागे झालेला द्वापर युग आहे आणि जे उठून उभे राहिजे ते त्रेतायुग होय. पण कष्ट करणारा माणूस तर सत्य युगाचे प्रतीक आहे. वेदकालीन ऋषींचा हा जीवनक्रम कित्येक वर्षे सुरू होता. यानंतर भगवान बुद्धाने ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हा संदेश दिला व भिक्षुंना या संदेशाचा प्रचार करण्यासाठी चारही दिशांना जाण्याचे आदेश दिले. असाच उपदेश भगवान महावीरांनी के...

कलीयुग आणि कयामत

Image
कलीयुग आणि कयामत आज जग कलीयुग बोधाने त्रस्त आहे. एक असे जग ज्यामध्ये भविष्याची कल्पना कमी आणि शंका जास्त आहेत. आपल्या देशात विनाशाकडे जाण्याचा ‘कलीयुग’ हा सिद्धांत प्रचलित आहे तर पाश्‍चिमात्य देशात कयामत ही कल्पना प्रचलित आहे. आपण कलीयुग आणि कयामत या कल्पनांना अंधविश्‍वास म्हणून टाळू शकत नाही. आज जग कलीयुग बोधाने त्रस्त आहे. एक असे जग ज्यामध्ये भविष्याची कल्पना कमी आणि शंका जास्त आहेत. आपल्या देशात विनाशाकडे जाण्याचा ‘कलीयुग’ हा सिद्धांत प्रचलित आहे तर पाश्‍चिमात्य देशात कयामत ही कल्पना प्रचलित आहे. आपण कलीयुग आणि कयामत या कल्पनांना अंधविश्‍वास म्हणून टाळू शकत नाही. कारण अंधविश्‍वासापासून दूर असल्याचा दावा करणारे विज्ञान भविष्याच्या बाबतीत विचार करते, ग्लोबल वॉर्मिंग आणि पर्यावरण आज परवलीचे शब्द बनले आहेत. भविष्यात दोन विशाल उल्कांची टक्कर होऊन एक दिवस अचानक पृथ्वी नष्ट होईल असेही विचार ऐकायला मिळतात. काही शास्त्रज्ञ तर या उल्कांची टक्कर झाल्यास कसा बचाव करता येईल यावर अहोरात्र अध्ययन करीत आहेत. आणखी एक भ्रामक कल्पना आहे की, इतर ग्रहावरील विकसित  प्राणी उदा. एलियन्स...

मनुष्याने शुद्ध हेतू ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा

Image
मनुष्याने शुद्ध हेतू ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा

आपल्या देशात शिक्षण सर्वांत जास्त नफा देणारा व्यवसाय बनला आहे

Image
आपल्या देशात शिक्षण सर्वांत जास्त  नफा देणारा व्यवसाय बनला आहे ‘हिंदी मिडियम’ हा चित्रपट आपल्या खासदारांना दाखवायला हवा. चित्रपट निर्माते साकेत चौधरीच्या मा चित्रपटाचे संसदेशी घनिष्ठ नाते आहे. ४ ऑगस्ट २००९ रोजी संसदेमध्ये ‘राईट टू एज्युकेशन’ (शिक्षणाचा अधिकार) विधेयक मंजूर झाले होते. या विधेयकान्वये लोकांना शिक्षणाचा अधिकार मिळायला हवा होता; पण आज आपल्या देशात शिक्षण सर्वांत जास्त नफा देणारा व्यवसाय बनला आहे. ‘हिंदी मिडियम’ चित्रपटाच्या शेवटच्या दृश्यात जास्त क्रूरता आहे. हे वास्तविक व प्रामाणिक दृश्य आहे. इरफान इंग्रज व श्रीमंत समाजाच्या माध्यमातून देशाला नैतिकतेवर भाषण देतात; पण याच्या बदल्यात त्यांना टाळ्या नव्हे तर निरव शांतता मिळते. एक-दोन लोक इरफानच्या भाषणावर प्रतिक्रिया म्हणून खुर्चीवर हालचाल करतात पण त्यांच्या बायका त्यांचा हात धरून त्यांना पुन्हा खुर्चीवर बसवितात. याचा अर्थ असा की, नैतिक व प्रामाणिक भाषणे ऐकून भावनावश होऊ नये. आपण ज्या करारानुसार मोठ्या शाळांमध्ये आपल्या मुलांना प्रवेश मिळवून दिला आहे, तो भावनावश होऊन परत  घेऊ नये. तेच दृश्य आणि हॉलमध...

असे राहता येईल तुम्हाला येणाऱ्या ताण - तणावापासून दूर

Image
असे राहता येईल तुम्हाला येणाऱ्या ताण - तणावापासून दूर आजच्या अत्यंत धावपळीच्या, जबाबदारीच्या काळात ताण येणं अगदी साहजिक आहे, अशावेळेस आपण स्वतःच्या आवडीनिवडी सुद्धा विसरतो. म्हणूनच इतरांच्या आवडीनिवडी जपताना, कामं करताना स्वतःसाठी वेळ काढणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. जर खरोखरीच तुम्ही स्वतःसाठी वेळ काढू इच्छित असाल तर खाली दिलेल्या टिप्स लक्षपूर्वक वाचा. वेळेनुसार काम करा सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही एक यादी तयार करा व त्यामध्ये कोणत्या कामाला कधी, किती वेळ द्यायचा याचं नियोजन करा. कामाच्या वेळेस कामच करा, थोडा वेळ आरामही जरूर करा. रिकाम्या वेळात तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी करू शकता. इतरांची मदत घ्या समजा तुम्हीच सर्वांना मदत करत असाल, तर अशावेळेस इतरांची मदत घेणं तुम्हाला थोडंसं अवघडल्यासारखं वाटू शकतं. मात्र, त्याची सवय करून घ्या. यामुळे तुमचा बराचसा ताण कमी होईल व तुम्ही अधिक दर्जेदार कामं करू शकाल. सुट्टीचं नियोजन करा ऑफिसमधील कामाचा ताण कमी होताच काही दिवसांची सुट्टी घ्या व या सुट्टीत आप्तेष्टांबरोबर कुठेतरी फिरायला जा. यामुळे एका नव्या, वेगळ्या वातावरणात गेल्...

केव्हा शांत राहावे?

Image
केव्हा शांत राहावे? १ संताप किंवा प्रचंड राग आलेला असेल तेव्हा शांत राहा. २ सगळी वस्तुस्थिती माहिती नसेल तेव्हा शांत राहा. ३ जेव्हा तुम्ही वस्तुस्थितीची पडताळणी केलेली नसेलतेव्हा शांत राहा. ४ जेव्हा तुमचे शब्द दुर्बल व्य्नतीला घायाळ करणारे असतात तेव्हा शांत राहा. ५ जेव्हा दुसर्‍याचे ऐकून घेण्याची गरज असते तेव्हा शांत राहा. ६ जेव्हा चांगल्या गोष्टींची खेळखंडोबा करण्याची उर्मी येते तेव्हा शांत राहा. ७ जेव्हा चुकीच्या गोष्टींवर विनोद करण्याची इच्छा होतेतेव्हा शांत राहा. ८ जेव्हा आपल्या बोलण्याची नंतर लाज वाटू शकतेअशावेळी शांत राहा . ९ जेव्हा तुमच्या शब्दातून चुकीचा संदेश जाणार असतोतेव्हा शांत राहा. १० जेव्हा त्या विषयाशी तुमचा संबंध नसेल त्यावेळी शांत राहा. ११ जेव्हा तुमच्यावर सरसकट खोटे बोलण्याची वेळ येतेतेव्हा शांत राहा. १२ जेव्हा तुमचे शब्द अन्य कुणाची तरी प्रतिष्ठा डागाळणार असतात तेव्हा शांत राहा.   १३ जर तुमच्या शब्दांमुळे मैत्रीत दुरावा येणार असेलअशावेळी शांत राहा. १४ तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल अशावेळी शांत राहा. १५ जर तु...

अतिविचारांनी जगण्याचा तोल बिघडतो

Image
अतिविचारांनी जगण्याचा तोल बिघडतो काहीतरी घडते आणि मग आपण त्याचा नको तितका विचार करत बसतो. आपल्या आयुष्यात अनेकदा असे घडते. कुठल्याही गोष्टीचा अतिरेकी विचार करण्यामुळे  आपल्यालाच मानसिक आणि शारीरीक त्रास होतो. अनेकदा त्यातून निर्माण  झालेली भीती आपल्या मनात खोलवर रुजून बसते. तुम्ही त्या गोष्टीचा विचार झटकून टाकल्याखेरीज भीती मनातून  दूर होत नाही. उगाचच नको त्या गोष्टीचा अनावश्यक विचार करत बसण्यामुळे  अनेकजण दुःखी असतात. आनंदी राहायचे असेल तर उगाच विचार करत बसणे टाळले पाहिजे. कारण, आपण जसा विचार करतो तितके गंभीर किंवा वाईट कधीच घडत नसते. पण आपले मन असे असते की ते वाईट घडण्याची शक्यता गृहित धरूनच जास्त विचार करत राहते. अतिरेकी विचाराचे धोके लक्षात घेतले, तर उगाच विचार करत बसणे आपल्याला टाळता येऊ शकते.  १.  अतिविचारांमुळे  समस्या ही आहे तशीच राहते. अनेकदा समस्या गंभीर बनते. जोपर्यंत तुम्ही मनातून विचार काढून टाकत नाही, तोपर्यंत स्वस्थता लाभत नाही. २.  समस्या सोडवण्यातील सृजनशील कौशल्य...

विद्यार्थ्यांमध्ये राजकारण बदलण्याची शक्ती

Image
विद्यार्थ्यांमध्ये राजकारण बदलण्याची शक्ती सुमारे ४० वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी २५ जून १९७६ रोजी देशात आणीबाणी लागू केली होती. त्यासाठी असे कारण देण्यात आले होते की, विद्यार्थी शाळा, कॉलेजांना दांडी मारतात. मजूर व्यवस्थित काम करीत नाहीत इतकेच काय सैनिक व पोलीसही आदेश मानत नव्हते. विरोधकांचा समाजवादावर विश्‍वास नव्हता. देशात अराजकतेची स्थिती निर्माण होऊ नये म्हणून आणीबाणी लागू करावी लागली.  आजची राजकीय स्थिती पाहून असे वाटू लागले आहे की, ४० वर्षांपूर्वी इंदिराजींचे जे विचार होते तेच आजच्या भारतीय जनता पक्ष (भाजप) नेत्यांचे आहेत का? आपल्या देशाची सर्वांत मोठी ‘व्होटबँक’ आज विद्यार्थीच आहेत. देशातील ४२ कोटी मतदार १८ ते ३५ वयोगटातील आहेत. ९ कोटी मतदार कॉलेज विद्यार्थी आहेत तर १२ कोटी तरुण मतदार रजिस्टर्ड बेरोजगार आहेत. याचा अर्थ असा की, विद्यार्थ्यांमध्ये देशाचे राजकारण बदलण्याची ताकद आहे. आज राजकीय संघर्षावर कोणीच बोलत नाही. पोलीस प्रशासन, कायदा किंवा कोर्टात कोणीही देशद्रोह किंवा देशभक्तीची व्याख्या का करीत नाही आणि जर आहे ती व्याख्या योग्य असेल तर याच्य...

देश भ्रष्टाचारापासून मुक्त हवाच

Image
देश भ्रष्टाचारापासून मुक्त हवाच देशातील १२५ कोटी लोकांची इच्छा आहे की, देश भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त व्हावा. या संदर्भात पंतप्रधान मोदींनी ‘खाणार नाही व खाऊ देणार नाही,’ असे बाणेदार वक्तव्य  केले होते. त्याचे नेहमी उदाहरण दिले जाते. कारण पंतप्रधान मोदींच्या तीन वर्षाच्या कारकिर्दीत एकही घोटाळा उघडकीस आला नाही. परंतु दरम्यान प्रशासनांशी संलग्न मोठे लोक भ्रष्टाचारात अडकल्याचे दिसून आले. सीबीआयचे माजी निदेशक रणजीत सिन्हा यांच्यावर भ्रष्टाचाराच्या बड्या आरोपीच्या सतत संपर्कात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सीबीआयचेच एक माजी प्रमुख ए.पी.सिंग यांच्या विरुद्धसुध्दा एफआयआर नोंदविण्यात आली आहे. अहमदाबाद येथील प्रवर्तन निदेशालयाचे माजी निदेशक जे.पी.सिंग यांना झालेली अटक हे ताजे उदाहरण आहे. जे.पी.सिंग क्रिकेट सट्टेबाजी आणि मनी लॉंड्रिंगचे आरोपी हवाला व्यावसायिक अफरोज याच्याशी संबंधित ५००० कोटी रु. प्रकरणात अडकले आहेत. जे.पी.सिंग यांच्यावर या प्रकरणात १५ कोटी रु. ची लाच घेतल्याचा आरोप आहे. काही दिवसापूर्वी छत्तीसगढचे मुख्य सचिव बी.एल.अग्रवाल यांनाही सीबीआयने नुकतीच अटक केली आहे...

गरिबांच्या समस्या सोडविण्यात सर्व सरकारे अपयशी

Image
गरिबांच्या समस्या सोडविण्यात सर्व सरकारे अपयशी कोणत्याही देशाच्या किंवा राज्याच्या नागरिकाची सरकारकडून, त्याच्या जीवाची, मालमत्तेची सुरक्षा व्हावी एवढीच माफक अपेक्षा असते. त्याला भौतिक आणि सामाजिक इन्फ्रास्ट्रक्चर मिळावे आणि त्याला आर्थिक व राजकीय अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हमीची अपेक्षा असते. त्यामुळे त्याला निदान सन्मानाने जगता येईल. गेल्या ७० वर्षांमध्ये आपल्या देशात जितकी सरकारे स्थापन झाली त्या सगळ्यांकडून एवढीच माफक अपेक्षा होती. घटना तयार करणार्‍या आपल्या नेत्यांनी याची फार काळजी घेतली नाही. त्यामुळे त्यांनी सामाजिक, आर्थिक न्याय व संधीची समानता आणि वैयक्तिक सन्मानाची चर्चा केली. सार्वभौमिक मूळ वेतन म्हणजे ‘युनिव्हर्सल बेसिक इन्कम’ याची आधारित देशातच नव्हे तर जगभर चर्चा झाली आहे. युनिव्हर्सल बेसिक इन्कमचा अर्थ एक असा  इन्कम जो सर्वांसाठी आहे आणि विनाअट त्यांच्या खात्यावर जमा होतो. हे उत्पन्न संबंधित नागरिकापर्यंत पोहोचविणेसुद्धा सोपे आहे. एका दृष्टीने युबीआयचा राजकीय लाभ व त्याची नैतिक प्रेरणा स्पष्ट आहे; पण जर ती एखाद्या मोठ्या योजनेचा भाग नसेल तर त्याचे विपरित परि...

वेळीच व्हा वेगळे

Image
वेळीच व्हा वेगळे रिलेशनशिप कधी-कधी डोकेदुखी ठरू शकतात. चुकीच्या व्यक्तीसोबतच नातं घातक तर ठरतच शिवाय तुमच्या आयुष्यावर खोलवर परिणाम करतं. बॉलिवूडच्या रोमँटीक सिनेमांचा आपल्या मनावर इतका खोलवर परिणाम झालाय की, जर आपल्याला आनंदी राहायचं असेल तर रिलेशनशिप शिवाय पर्याय नाही असं आपल्याला वाटू लागलंय. त्यातूनच मग एखाद्याविषयी आकर्षण वाटू लागलं की आपण रिलेशनशिपची वाट धरतो. पण ही रिलेशनशिप कधी-कधी डोकेदुखी ठरू शकतात. चुकीच्या व्यक्तीसोबतच नातं घातक तर ठरतच शिवाय तुमच्या आयुष्यावर खोलवर परिणाम करतं. अशा रिलेशनशिपमधून बाहेर पडताना खालील गोष्टी लक्षात ठेवा... चुकीच्या वागण्याचं समर्थन नको : बऱ्याचदा आपलं नातं नेमकं कसं आहे याबद्दल आपला गोंधळ उडालेला असतो. म्हणजे कधी सुदृढ वाटणारं नातं कधी फारच वाईट वळण घेतं. पण जर तुमचा जोडीदार तुम्हाला शिवीगाळ करत करत असेल, तुमचा शारीरिक किंवा मानसिक दुरूपयोग करत असेल तर वेळीच मागे फिरा. अशावेळी जोडीदाराच्या वागण्याचं समर्थन न करता हे नातं घातक आहे हे मनाशी पक्क करा. यातून बाहेर येण्यासाठी मनाची तयारी करा. संवाद साधून मार्ग काढा : ...

सर्वांसाठी आवश्यक पॅनकार्ड

Image
सर्वांसाठी आवश्यक पॅनकार्ड पॅनकार्ड म्हणजे काय : पॅन, अर्थात पर्मनन्ट अकाउन्ट नंबर हा भारतीय नागरिकाची ओळख आहे. या १० आकडी क्रमांकामध्ये काही आकडे तर काही अक्षरे असतात. भारतीय आयकर कायदा, १९६१ अंतर्गत पॅन सर्व भारतीयांना दिला जातो. पॅन आयकर विभाग देतो. यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष करमंडळांतर्गत तरतूद आहे. भारतीयांप्रमाणे पॅन परदेशी नागरिकांनाही देण्यात येतो. मात्र, त्यासाठी वैध व्हिसा आणि काही शर्तींची पूर्तता करणे आवश्यक असते. वब्हंशी आर्थिक व्यवहार करताना पॅन असणे गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीचा पॅन ही केवळ त्या व्यक्तीचीच ओळख असते. पॅन क्रमांक कसा तयार होतो : पॅन क्रमांकातील सर्व अक्षरे इंग्रजीत असतात. आयकर कायदा कलम १३९ए अंतर्गत दिला जाणाऱ्या पॅनमध्ये पहिले पाच डिजिट ही अक्षरे असतात, त्यानंतरचे चार डिजिट हे आकडे असतात तर शेवटचे डि‌जिट हे पुन्हा अक्षर असते. पहिल्या पाच अक्षरांतील शेवटचे (पाचवे) अक्षर हे पॅनधारक व्यक्तीच्या आडनावातील पहिले अक्षर किंवा मंडळाच्या नावातील किंवा कंपनीच्या नावातील पहिले अक्षर असते तर चौथे अक्षर हे ती व्यक्ती कोण आहे ते दर्शवते. हे चौथे ...

माणूस सर्वांत जास्त एकाकी आणि असुरक्षित तरीही गर्विष्ठ

Image
माणूस सर्वांत जास्त एकाकी आणि असुरक्षित तरीही गर्विष्ठ जगात सर्वांत असुरक्षित आणि एकाकी असेल तो माणूस आहे; परंतु तरीही सर्वांत गर्विष्ठ आहे. माणूस स्वभावाने सर्व सद्गुण आणि दुर्गुणांचा जन्मदाता आहे. तो असा एक प्राणी आहे, जो रात्रीही स्वर्गाच्या पायर्‍यांवरच झोपतो. तो केवळ भ्रमावर जगतो. त्याच्या मनात व्यक्तिवाद, कुटुंबवाद, जातीवाद आणि उपदेशवाद ठासून भरला आहे.  जगात सर्वांत असुरक्षित आणि एकाकी असेल तो माणूस आहे; परंतु तरीही सर्वांत गर्विष्ठ आहे. माणूस स्वभावाने सर्व सद्गुण आणि दुर्गुणांचा जन्मदाता आहे. तो असा एक प्राणी आहे, जो रात्रीही स्वर्गाच्या पायर्‍यांवरच झोपतो. तो केवळ भ्रमावर जगतो. त्याच्या मनात व्यक्तिवाद, कुटुंबवाद, जातीवाद आणि उपदेशवाद ठासून भरला आहे. तो वाघ-सिंहाप्रमाणे डरकाळ्या फोडतो तर गिधाडाप्रमाणे भिऊन पळतोसुद्धा. माणसाचे एक रूप सरकारी कर्मचारी आहे. तो स्वत:लाच सरकार समजतो. वाघासारखा आवाज असला तरी तो बकरीसारखा मँ मँ सुद्धा करतो हीच त्याची ऐपत आहे. खून करूनही हात न धुण्याची त्याची सवय आहे; पण मालकाला पाहताच शेपूट हलविण्याची त्याची नियत आहे. घाणीच्या बैलाप्रमा...