स्त्री-पुरूष सारखेच आहेत तर त्यांच्यात एवढे भेद का?

Image
पृथ्वीवरील सगळ्या देशांमध्ये सर्व समाजातील पुरुषासाठी 'मिस्टर' हे एकच संबोधन आहे. स्त्रियांच्या बाबतीत अविवाहित स्त्रिया आपल्या नावापुढे 'मिस' आणि विवाहित स्त्रिया आपल्या नावामागे 'मिसेस' या शब्दाचा प्रयोग करते. 'मिस्टर' संबोधनाने विवाहित आणि अविवाहित पुरुष ओळखता येत नाही. त्याउलट मात्र 'मिस लीना' आणि 'मिसेस बीना' यात कोण विवाहित आहे हे लगेच लक्षात येते. स्त्री विवाहित आहे की अविवाहित हे तिच्या नावातच सामावले आहे. विवाह स्त्रीसाठी नक्कीच महत्त्वाचा आहे. मात्र, पुरुषांच्या बाबतीत हे आढळत नाही.  विधवा आणि विधूर पुरुषांतही हेच दिसते. व‍िधवेला अंगावरील सर्वच अलंकार उतरवावे लागतात. इतकेच काय पण जीवनातील 'रंग'ही बाजूला ठेवावे लागतात. पण पुरुषाला मात्र कशाचीच बंदी नाही. काही समाजात तर विधवांनी मांसाहार करण्यावरही बंदी आहे.   जोडीदार मिळणे आणि त्याने सोडून जाणे याचे नियम दोघांसाठी भिन्न का? स्त्रीला बरेच काही त्यागावे लागते. असे का? तिच्या आसपासच वावरणारा पुरूष मात्र बंधनहीन आहे. असे का?   नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थस...

असे राहता येईल तुम्हाला येणाऱ्या ताण - तणावापासून दूर

असे राहता येईल तुम्हाला येणाऱ्या ताण - तणावापासून दूर




आजच्या अत्यंत धावपळीच्या, जबाबदारीच्या काळात ताण येणं अगदी साहजिक आहे, अशावेळेस आपण स्वतःच्या आवडीनिवडी सुद्धा विसरतो. म्हणूनच इतरांच्या आवडीनिवडी जपताना, कामं करताना स्वतःसाठी वेळ काढणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. जर खरोखरीच तुम्ही स्वतःसाठी वेळ काढू इच्छित असाल तर खाली दिलेल्या टिप्स लक्षपूर्वक वाचा.
वेळेनुसार काम करा
सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही एक यादी तयार करा व त्यामध्ये कोणत्या कामाला कधी, किती वेळ द्यायचा याचं नियोजन करा. कामाच्या वेळेस कामच करा, थोडा वेळ आरामही जरूर करा. रिकाम्या वेळात तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी करू शकता.
इतरांची मदत घ्या
समजा तुम्हीच सर्वांना मदत करत असाल, तर अशावेळेस इतरांची मदत घेणं तुम्हाला थोडंसं अवघडल्यासारखं वाटू शकतं. मात्र, त्याची सवय करून घ्या. यामुळे तुमचा बराचसा ताण कमी होईल व तुम्ही अधिक दर्जेदार कामं करू शकाल.
सुट्टीचं नियोजन करा
ऑफिसमधील कामाचा ताण कमी होताच काही दिवसांची सुट्टी घ्या व या सुट्टीत आप्तेष्टांबरोबर कुठेतरी फिरायला जा. यामुळे एका नव्या, वेगळ्या वातावरणात गेल्यामुळे मन प्रसन्न होईल व मनावरील ताण आपोआप नाहीसा होईल.
व्यायामाकडे दुर्लक्ष नको
रोजचं काही ना काही वेगळं काम असतं, म्हणून आपण व्यायामाची टाळाटाळ करतो. यामुळे चिडचिड होणं अगदी साहजिक आहे, पण काही मिनिटं स्वतःला द्या व व्यायाम करा. यामुळे तन व मन प्रसन्न व निरोगी राहण्यास निश्‍चितपणे मदत होईल.
आवडीच्या गोष्टींना वेळ द्या
स्वतःच्या मनाप्रमाणे जगायला सगळ्यांनाच आवडतं, म्हणून स्वतःसाठी दिवसातील काही वेळ काढा. अगदी निवांत बाल्कनीत बसून चहा पिणं, हे सुद्धा अनेकांचं स्वप्न असू शकतं, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. छोट्या-छोट्या गोष्टींमधील आनंद शोधा व तो मिळविण्यासाठी प्रयत्न करा.

Comments

Popular posts from this blog

अतिविचारांनी जगण्याचा तोल बिघडतो

श्रीमंतापेक्षा गरीबच जास्त दयाळू

माणूस सर्वांत जास्त एकाकी आणि असुरक्षित तरीही गर्विष्ठ