स्त्री-पुरूष सारखेच आहेत तर त्यांच्यात एवढे भेद का?

Image
पृथ्वीवरील सगळ्या देशांमध्ये सर्व समाजातील पुरुषासाठी 'मिस्टर' हे एकच संबोधन आहे. स्त्रियांच्या बाबतीत अविवाहित स्त्रिया आपल्या नावापुढे 'मिस' आणि विवाहित स्त्रिया आपल्या नावामागे 'मिसेस' या शब्दाचा प्रयोग करते. 'मिस्टर' संबोधनाने विवाहित आणि अविवाहित पुरुष ओळखता येत नाही. त्याउलट मात्र 'मिस लीना' आणि 'मिसेस बीना' यात कोण विवाहित आहे हे लगेच लक्षात येते. स्त्री विवाहित आहे की अविवाहित हे तिच्या नावातच सामावले आहे. विवाह स्त्रीसाठी नक्कीच महत्त्वाचा आहे. मात्र, पुरुषांच्या बाबतीत हे आढळत नाही.  विधवा आणि विधूर पुरुषांतही हेच दिसते. व‍िधवेला अंगावरील सर्वच अलंकार उतरवावे लागतात. इतकेच काय पण जीवनातील 'रंग'ही बाजूला ठेवावे लागतात. पण पुरुषाला मात्र कशाचीच बंदी नाही. काही समाजात तर विधवांनी मांसाहार करण्यावरही बंदी आहे.   जोडीदार मिळणे आणि त्याने सोडून जाणे याचे नियम दोघांसाठी भिन्न का? स्त्रीला बरेच काही त्यागावे लागते. असे का? तिच्या आसपासच वावरणारा पुरूष मात्र बंधनहीन आहे. असे का?   नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थस...

ग्राहकांच्या अपेक्षांमध्ये बदल होत आहे…







जाहिराती करणाऱ्या लोकांचा एक सर्वसाधारण समज आहे, महिलांची आकर्षक छायाचित्रे छापलेल्या वस्तू विकल्या जातात. मग सॉफ्ट ड्रिंकपासून पेनांच्या जाहिरातींपर्यंत सगळीकडे तोकड्या कापड्यातल्या मॉडेल्सचा सर्रास वापर होताना दिसतो. प्रॉडक्‍ट्‌सशी स्त्रियांचा संबंध असो नसो, पुरुष ग्राहकाने त्या वस्तू घ्याव्या यासाठी बाईचा वापर हा जाहिराती बनवणाऱ्या मंडळींचा प्रचलित मार्ग असतो. त्यात बदल करावासा सहसा कुणाला वाटत नाही. पण, आता ग्राहकच या प्रचलित मार्गाला कंटाळले आहेत बहुदा.

तोकड्या कापड्यातल्या मुली बघण्यात आता फारसं नावीन्य राहिलं नाहीये किंवा वस्तू विकत घेताना त्या जाहिरातीत बाई कशी दाखवली गेली आहे यापेक्षा त्या वस्तुचा दर्जा जास्त महत्त्वाचा असतो हे शहाणपण आलं असावं. कारण, काहीही असोत ग्राहक वेगळं काहीतरी म्हणतायत असं युनिव्हर्सिटी ऑ इलिनॉईसमधील जॉन विट्‍र्झ यांचं सर्वेक्षण सांगतंय. जवळपास 900 जाहिरातींचे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणात असे दिसून आले की पूर्वीप्रमाणे लोक आता सेक्‍श्युअल अपीलकडे बघून वस्तू खरेदी करत नाहीत. वस्तू खरेदी करतानाचे ग्राहकांचे निकष बदलले आहेत. निव्वळ काहीतरी सेक्‍श्युअल कन्टेन्ट जाहिरातीत आहे म्हणून वस्तुची खरेदी करणारे ग्राहक शून्य टक्के असल्याचंही या सर्वेक्षणात लक्षात आलं आहे. इंटरनॅशनल जर्नल ऑ ऍडव्हर्टीझिंगच्या ऑनलाइन पोर्टलवर हे सर्वेक्षण तपशिलाने देण्यात आलेले आहे.
– प्रतिक गंगणे, पुणे  http://www.dainikprabhat.com

Comments

Popular posts from this blog

अतिविचारांनी जगण्याचा तोल बिघडतो

श्रीमंतापेक्षा गरीबच जास्त दयाळू

माणूस सर्वांत जास्त एकाकी आणि असुरक्षित तरीही गर्विष्ठ