स्त्री-पुरूष सारखेच आहेत तर त्यांच्यात एवढे भेद का?

Image
पृथ्वीवरील सगळ्या देशांमध्ये सर्व समाजातील पुरुषासाठी 'मिस्टर' हे एकच संबोधन आहे. स्त्रियांच्या बाबतीत अविवाहित स्त्रिया आपल्या नावापुढे 'मिस' आणि विवाहित स्त्रिया आपल्या नावामागे 'मिसेस' या शब्दाचा प्रयोग करते. 'मिस्टर' संबोधनाने विवाहित आणि अविवाहित पुरुष ओळखता येत नाही. त्याउलट मात्र 'मिस लीना' आणि 'मिसेस बीना' यात कोण विवाहित आहे हे लगेच लक्षात येते. स्त्री विवाहित आहे की अविवाहित हे तिच्या नावातच सामावले आहे. विवाह स्त्रीसाठी नक्कीच महत्त्वाचा आहे. मात्र, पुरुषांच्या बाबतीत हे आढळत नाही.  विधवा आणि विधूर पुरुषांतही हेच दिसते. व‍िधवेला अंगावरील सर्वच अलंकार उतरवावे लागतात. इतकेच काय पण जीवनातील 'रंग'ही बाजूला ठेवावे लागतात. पण पुरुषाला मात्र कशाचीच बंदी नाही. काही समाजात तर विधवांनी मांसाहार करण्यावरही बंदी आहे.   जोडीदार मिळणे आणि त्याने सोडून जाणे याचे नियम दोघांसाठी भिन्न का? स्त्रीला बरेच काही त्यागावे लागते. असे का? तिच्या आसपासच वावरणारा पुरूष मात्र बंधनहीन आहे. असे का?   नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थस...

मराठी माणसावर हात उचलण्याची हिम्मत होतेच कशी ?

मराठी माणसावर हात उचलण्याची हिम्मत होतेच कशी ? 

हल्ले- प्रतिहल्ले चालले तर मुंबईत अशांतता होईल. त्याचा उद्योगधंद्यावर परिणाम वाईट होईल. फेरीवाल्यांकडून जो मार खालला तो मनसेच्या कार्यकर्त्यांनी नव्हे तर मराठी माणसाने खाल्ला आहे असे म्हणावे लागेल. 




मुंबईतील एल्फिस्टन रेल्वेस्थानकावरील पूल कोसळल्यापासून फेरीवाल्यांविरोधात राज ठाकरे यांच्या मनसेंने फेरीवाला हटावची जी मोहीम सुरू केली, ती अद्याप थांबलेली नाही. मराठी विरूद्ध अमराठी हा जुनाच वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मराठीच्या मुद्यावर तर राज खूपच आक्रमक झालेले दिसतात.
एकीकडे आपला नेता रणांगणात उतरा असा आदेश देतो. मात्र मनसैनिक पूर्ण तयारीनिशी लढण्यासाठी रणांगणात उतरत नसल्याने शत्रू पक्षासमोर घायाळ होताना दिसत आहे. काहीही असो मराठी माणसावर हात उचलण्याची हिम्मत होतेच कशी ? ती ही मुंबईत. मराठी माणूस रक्तबंबाळ होतो हे चित्र मराठी माणसाला पाहून काय वाटले असेल.
डरकाळ्या वाघाच्या फोडायच्या आणि मार खावून यायचा याला मराठी माणूस म्हणता येणार नाही. मऱ्हाठे म्हणजे मरतील पण हटणार नाही असे बोलले जाते. लढायला निघालेले आधुनिक मावळे फेसबूक आणि सोशल मीडियावर जो राज यांच्या नावाने धिंगाना घालत आहे. तो पाहून तर हसावे की रडावे असा प्रश्‍न पडतो.
येथे नागाची एक गोष्ट आठवली. एकदा नाग देवाकडे गेला आणि तो म्हणाला, "" मी दंश करतो म्हणून मला लोक नावं ठेवतात. मला लोकांनी घाबरू नये. त्यांनी माझ्याजवळ यावे असे मला वाटते. मी आजपासून चांगले वागायचे ठरविले आहे. तशी आज्ञा द्या देवा ! '' त्यावर देव म्हणाला,"" काहीच अडचण नाही. तू निश्‍चितपणे चांगला वागू शकतो. पण, तू नाग आहेस हे विसरू नको ! झाले नागमहाराज चांगले वागायला लागले. त्याने फुत्कारणे बंद केले. मात्र लोक त्याला दगड मारू लागले. पुढे तर लोकांचे दगड खाऊन तो गंभीर जखमी झाला. शेवटी तो देवाकडे गेला आणि म्हणाला, "" देवा ! लोकांनी बघा. माझी काय अवस्था केली आहे ?
त्यावर देव म्हणाला, "" दगड मारणाऱ्यांविरोधात तू फणा काढून नको असे मी कधी सांगितले होते. जे तुझ्यावर दगड घेऊन हात उगारतील त्यांना तू दंश केला पाहिजे. तू नागोबा आहेस. हे मी तुला सांगितले होते.'' त्यानंतर नागाने पुन्हा आपली तिच सळसळ सुरू ठेवली. फणा काढू लागताच लोक त्याला घाबरू लागले. हात उगारणारे त्याला घाबरायला लागले. अशीच काहीशी अवस्था मनसेची झाली आहे.
राजा कायद्यांने संघर्ष करा. मराठीसाठी आग्रही राहा. परप्रांतियांच्या मुजोरीला जशास तसे उत्तर द्या असे आदेश देत असताना मनसेचे नेबळट कार्यकर्ते मार खाऊन रक्तबंबाळ होताना दिसत आहेत. गेल्या महिन्याभरात परप्रांतियांनीही आपली ताकद मुंबईत चालते हे मनसेला दाखवून दिले आहे. मनसेच्या राजकारणाचा शिवसेनाही आनंद लुटत आहे की काय असे चित्र आहे. ज्या शिवसेना आणि मनसेचा मुंबईत दरारा आहे. त्याच मराठी माणसाच्या मुंबईत जे चित्र पाहण्यास मिळत आहे ते काही खरे नाही.
माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेनाही मराठी माणूस मार खात असताना का गप्प आहे ? मुंबईत मराठी माणूस ताट मानेने उभा राहिला पाहिजे याची काळजी ठाकरे घराणे नेहमीच घेत आली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असे पर्यंत मराठी माणसाच्या केसाला धक्का लावण्याची हिम्मत कोणामध्ये नव्हती. मग आताच असे का व्हावे ? कुठे गेला आधुनिक मावळ्यांचा मर्दपणा. रडत येणारा शिवसैनिक मला आवडत नाही असे बाळासाहेब म्हणत असंत. आताचे कार्यकर्ते फुशारक्‍या मारतात. लढायचे सोडून रडत बसतात. कसे लढणार महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी ? महाराष्ट्र ही संताची आणि शुरांची भूमी आहे असे आपण अभिमानाने सांगत आलो. आपण मुद्दाम कोणाच्या वाटेला जायचे नाही आणि नादाला लागला तर सोडत नाही अशी आपली संस्कृती. कार्यकर्त्यांच्या ताकदीवर नेता यशस्वी होत असतो. जर कार्यकर्तेच रडके निघाले तर नेता मोठा होणार कसा आणि तुम्हाला न्याय देणार कसा ?
काही दिवसापूवी मालाड येथे मनसेच्या कार्यकर्त्यांने मार खाल्ला. आता विक्रोळीत दुकानावर मराठी पाटी लावा असा अशी पत्रके वाटणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाला. तिघांपैकी विश्‍वजित ढोलम हा गंभीर जखमी झाला. या सर्व घटनानंतर राज ठाकरे हे चांगलेच संतप्त झाले आहेत. कार्यकर्ते मार खातातच कसे असा सवालही त्यांनी केला आहे.
वास्तविक, राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्यावर घेतलेल्या भूमिकेविषयी मतभेद असू शकतात. त्यामध्ये गैर असे काही नाही. मात्र माय मराठीसाठी जर याच राज्यात कोणी आग्रह करीत असेल. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करीत असेल. मराठी पाट्या लावा असे आवाहन करीत असेल तर त्याला प्रतिसाद द्यायला हवा. मराठीचा आग्रह धरणाऱ्यांवर जर कोणी हात उचलत असेल तर जशास तसे उत्तर मग परप्रांतियच काय मराठी असेल तरी द्यायला हवे. परप्रांतिय ज्याप्रमाणे मुंबईत मराठी माणसाला रक्तबंबाळ करीत आहे तसे मराठी माणूस उत्तरप्रदेश, बिहार किंवा इतर कुठल्या राज्यात करू शकतो का ?
फेरीवाल्याच्या मुद्यावर आज विशेषत: मुंबईत मराठी -अमराठी जो वाद सुरू आहे. मनसेचे कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत. कधी ते हातात कायदा घेतात तर कधी कायद्याने आंदोलन करतो असा दावा करीत आहेत. या वादातूनच संघर्ष उफाळून येत आहेत. या वादातूनच हल्लेप्रतिहल्ले सुरू आहेत.
मराठी माणसाने नागासारखेच वागले पाहिजे. त्यांने योग्यवेळी फणा हा काढलाच पाहिजे. अन्यथा जखमी नागासारखी अवस्था मुंबईतील मराठी माणसासारखी होऊ शकते. राज ठाकरे लढा म्हणतात पण, लढाण्याच बळच त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उरले आहे की नाही असा प्रश्‍नही यानिमित्ताने पडतो आहे.
शेवटी असे म्हणावे लागेल, की कुठलेही आंदोलन करताना कायदा कोणीच हातात घेऊ नये तसेच फेरीवाल्यानी सुद्धा घेऊ नये. मात्र, मुंबईमध्ये पहिल्यांदा असे घडायला लागले. फेरीवाले प्रतिहल्ले चढवायला लागले ही धोक्‍याची घंटा आहे. हल्ले- प्रतिहल्ले चालले तर मुंबईत अशांतता होईल त्याचा उद्योगधंद्यावर परिणाम वाईट होईल. फेरीवाल्यांकडून जो मार खालला तो मनसेच्या कार्यकर्त्यांनी नव्हे तर मराठी माणसाने खाल्ला आहे असे म्हणावे लागेल.

 

 

Comments

Popular posts from this blog

अतिविचारांनी जगण्याचा तोल बिघडतो

श्रीमंतापेक्षा गरीबच जास्त दयाळू

माणूस सर्वांत जास्त एकाकी आणि असुरक्षित तरीही गर्विष्ठ